मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, बदलापूर स्थानकात लोकल ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड
मध्य रेल्वे ही 10 ते 15 मिनिट उशिराने धावत आहेत. यामुळे चाकरमान्यांचे हाल होताना दिसत आहे.
Mumbai Local Train Update : मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलची सेवा कोलमडली आहे. ऐन कामाला जाण्याच्या वेळेस मध्य रेल्वेचा मोठा खोळंबा झाला आहे. मध्य रेल्वेवरील बदलापूर स्थानकात एका लोकल ट्रेनमध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मध्य रेल्वे ही 10 ते 15 मिनिट उशिराने धावत आहेत. यामुळे चाकरमान्यांचे हाल होताना दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर स्थानकात लोकल ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. बदलापुरात सकाळी 7.33 वाजता येणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाला होता. मात्र रेल्वे प्रशासनाकडून लगेचच लोकल ट्रेनचे रॅक बदलण्यात आले. त्यानंतर ही ट्रेन कल्याणच्या दिशेने सोडण्यात आली.
या दरम्यान काही लोकल बदलापूर स्थानकात थांबवण्यात आल्या होत्या. साधारण 5 ते 10 मिनिटे काही लोकल या बदलापूर स्थानकात थांबल्या होत्या. यानंतर लोकल ट्रेनमध्ये झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्त होताच पुन्हा लोकल सेवा पूर्ववत करण्यात आली. सध्या बदलापूरकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल ट्रेन सेवा उशिराने धावत आहेत.
For necessary action escalated to the concerned official @Drmmumbaicr
— RailwaySeva (@RailwaySeva) August 22, 2024
प्रवाशांचा मोठा खोळंबा
दरम्यान सकाळी लाखो चाकरमानी हे मुंबई लोकलने प्रवास करत ऑफिस गाठतात. मात्र अचानक हा बिघाड झाल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. त्यामुळे अनेक प्रवाशांना ऑफिसला पोहोचायला, तसेच विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजमध्ये जाण्यास उशीर झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे अनेक कर्मचारी संतप्त झाले आहेत. तसेच रेल्वे उशिराने धावत असल्याने स्टेशनवरही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.