मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत, तांत्रिक बिघाडामुळे गाड्या उशिराने

सध्या सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक उशिराने सुरु आहे. सध्या स्लो आणि फास्ट या दोन्ही मार्गावरील गाड्या उशिराने धावत असल्याचे पाहायला मिळत आहे.

मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत, तांत्रिक बिघाडामुळे गाड्या उशिराने
मुंबई लोकल
Follow us
| Updated on: Nov 14, 2024 | 8:10 AM

Mumbai Local Running Late : मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलची सेवा विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड झाल्याने सध्या लोकल वाहतूक उशिराने धावत आहे. सकाळी कामाला जाण्याच्या वेळेस मध्य रेल्वेचा मोठा खोळंबा झाल्याने स्थानकांवर मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

दोन्ही मार्गावरील गाड्या उशिराने

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेची वाहतूक आज सकाळपासून विस्कळीत झाली आहे. कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी वाहतूकदरम्यान तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे सध्या सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक उशिराने सुरु आहे. सध्या स्लो आणि फास्ट या दोन्ही मार्गावरील गाड्या उशिराने धावत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सध्या मध्य रेल्वेच्या कल्याण, डोंबिवली, दिवा, ठाणे या स्थानकांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ऐन सकाळी कामाला जाण्याच्या वेळेस मोठा गोंधळ झाल्याने प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. डोंबिवली स्थानकावर पहाटेच्या वेळेस कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.

प्रवाशांचा मोठा खोळंबा

मध्य रेल्वेवरुन प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असते. सकाळी लाखो चाकरमानी हे मुंबई लोकलने प्रवास करत ऑफिसमध्ये पोहोचतात. मात्र अचानक हा बिघाड झाल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. त्यामुळे अनेक प्रवाशांना ऑफिसला पोहोचायला, तसेच विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजमध्ये जाण्यास उशीर झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे अनेक कर्मचारी संतप्त झाले आहेत. तसेच रेल्वे उशिराने धावत असल्याने स्टेशनवरही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

तोडगा नाही

दरम्यान गेल्या काही वर्षांपासून मध्य रेल्वे विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढलं आहे. त्यात उशिरा येणाऱ्या ट्रेन, मर्यादित लोकल, लोकल डब्ब्यांची संख्या आणि सातत्याने होणारे तांत्रिक बिघाड यामुळे मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा सतत खोळंबा होतो. ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी काहीशी परिस्थिती मध्य रेल्वेची झाली आहे. दररोज मध्य रेल्वेच्या गाड्या उशिरा धावत असल्याने प्रवाशांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र अद्याप यावर कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.