मुंबई लोकलचे तीन तेरा, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; पश्चिम रेल्वेही कोलमडली
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सध्या मध्य रेल्वेच्या लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. यामुळे प्रवाशी संतप्त झाले आहेत.
Mumbai Local Train Update : मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलची सेवा कोलमडली आहे. लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना सिग्नल मिळत नसल्याने मध्य रेल्वेचा मोठा खोळंबा झाला आहे. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सध्या मध्य रेल्वेच्या लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. यामुळे प्रवाशी संतप्त झाले आहेत.
मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलची सेवा कोलमडली आहे. लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना सिग्नल मिळत नसल्याने मध्य रेल्वेचा मोठा खोळंबा झाला आहे. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सध्या मध्य रेल्वेच्या लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. यामुळे प्रवाशी संतप्त झाले आहेत.
ऐन सुट्टीत मुंबई लोकल कोलमडली
यंदा दिवाळीत सलग सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे बहुतांश नागरिक हे सुट्टीत फिरायला जाण्याचा प्लॅन आखत असतात. त्यात आज विकेंड असल्याने अनेक नागरिक घराबाहेर पडले आहेत. मात्र ऐन सुट्टीत मुंबई लोकल कोलमडली आहे. त्यामुळे जर तुम्ही घराबाहेर पडणार असाल, तर ही बातमी एकदा नक्कीच वाचा,.
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेवरील गाड्या 15-20 मिनिटं उशिराने धावत आहेत. लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना सिग्नल मिळत नसल्याने लोकल उशिराने सुरु आहेत. कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अनेक लोकल या 10 ते 15 मिनिट उशिराने सुरु आहेत. तसेच मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावर धावणाऱ्या लोकलचा वेगही आज मंदावला आहे.
पश्चिम रेल्वेरील वाहतूक धीम्या गतीने
तर दुसरीकडे पश्चिम रेल्वेरील वाहतूकही विस्कळीत झाली आहे. सध्या विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणारी वाहतूक 5 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहेत. तर धीम्या गतीने धावणऱ्या लोकलही 10 मिनिटं उशिराने सुरु आहेत. पश्चिम रेल्वेवर गर्डरचे काम सुरु आहे. त्यामुळे लोकल उशिराने धावत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबईकरांनो घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलचे वेळापत्रक नक्की पाहा. अन्यथा तुमचा आजचा प्लॅन रद्द करावा लागू शकतो.