प्रवाशांनो कृपया लक्ष द्या..! आज रेल्वेच्या तिन्हीही मार्गांवर मेगाब्लॉक, वेळापत्रक कसं असणार?

आज रविवार असल्याने असंख्य मुंबईकर हे फिरण्यासाठी, शॉपिंगसाठी घराबाहेर पडतात. तुम्हीही आज असाच काही प्लॅन केला असेल तर थोडं थांबा... कारण आज रेल्वेच्या तिन्हीही मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे.

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या..! आज रेल्वेच्या तिन्हीही मार्गांवर मेगाब्लॉक, वेळापत्रक कसं असणार?
railway localImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jan 12, 2025 | 8:31 AM

Mumbai Local Mega Block News : आज रविवार असल्याने असंख्य मुंबईकर हे फिरण्यासाठी, शॉपिंगसाठी घराबाहेर पडतात. तुम्हीही आज असाच काही प्लॅन केला असेल तर थोडं थांबा… कारण आज मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर, मध्य आणि पश्चिम अशा तिन्हीही रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे, तसेच अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी आज तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

मध्य रेल्वेचे वेळापत्रक काय?

मुंबई उपनगरीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेवर आज विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी १२.३० वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. या काळात अनेक लोकल या उशिराने सुरु असतील. तर काही रेल्वे लोकल या रद्द करण्यात येतील. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

मध्य रेल्वेने आज मेगाब्लॉक घेतल्याने अप मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे डायव्हर्शन करण्यात येणार आहे. अनेक अप मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे येथे अप जलद मार्गावर वळवल्या जातील. तसेच विद्याविहार स्थानकावर सहाव्या लाईनवर वळवल्या जातील. या सर्व गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. ट्रेन क्र. 13201 पटणा -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस आणि ट्रेन क्र. 17221 काकीनाडा -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस या गाड्यांचे डायव्हर्शन केले जाईल.

तसेच डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या विद्याविहार स्थानकावर डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील, ठाणे येथे पाचव्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील ट्रेन क्र. 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपुर एक्सप्रेस, ट्रेन क्र. 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस- जयनगर पवन एक्सप्रेस आणि ट्रेन क्र. 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस -तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे.

ट्रान्स हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक

मध्य रेल्वेसोबतच अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर देखभाल दुरुस्तीच्या अभियांत्रिकी कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी आणि ठाणे ते नेरुळ या स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे. आज सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. वाशी येथून सकाळी १०.२५ वाजल्यापासून नेरुळ येथून सायंकाळी ०४.०९ वाजता ठाण्याच्या दिशेने सुटणाऱ्या अप ट्रान्स हार्बर लाईन सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी ४.०७ पर्यंत वाशी/नेरूळ/पनवेलच्या दिशेने डाउन ट्रान्स हार्बर सेवा रद्द होतील.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.