पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत, तांत्रिक बिघाडामुळे लोकल उशिराने
पश्चिम रेल्वेवरील भाईंदर स्थानकादरम्यान मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे ही 15 ते 20 मिनिट उशिराने धावत आहेत.
मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलची सेवा कोलमडली आहे. ऐन कामाला जाण्याच्या वेळेस पश्चिम रेल्वेचा मोठा खोळंबा झाला आहे. पश्चिम रेल्वेवरील भाईंदर स्थानकादरम्यान मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे ही 15 ते 20 मिनिट उशिराने धावत आहेत. यामुळे चाकरमान्यांचे हाल होताना दिसत आहे.
पश्चिम रेल्वेवरील भाईंदर या स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर चर्चगेटकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. विरार ते चर्चेगेट या दिशेने धावणाऱ्या लोकल धीम्या गतीने धावत आहेत. तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.
Point No. 104/103 on Up slow line & Dn fast line at Bhayandar station was failed in the morning. The technical issue was resolved at 6.30 hrs. Trains over that particular section are running late by 10-15 minutes late.
— Western Railway (@WesternRly) July 30, 2024
पश्चिम रेल्वेने ट्वीट करत दिली माहिती
पश्चिम रेल्वेने ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे. यात त्यांनी पश्चिम रेल्वे मार्गावर असलेल्या भाईंदर स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाला. सकाळी 6.30 च्या दरम्यान हा बिघाड झाला होता. यामुळे विरारहून चर्चेगेटकडे जाणाऱ्या आणि चर्चेगेटहून विरारकडे येणाऱ्या येणारी वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे.
हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे. पण लोकल पुर्वपदावर येण्यासाठी थोडा वेळ लागेल. त्यामुळे सध्या या मार्गावरील वाहतूक ही 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरु आहे. यामुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत, असे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे.
प्रवाशांचा मोठा खोळंबा
दरम्यान सकाळी लाखो चाकरमानी हे मुंबई लोकलने प्रवास करत ऑफिस गाठतात. मात्र अचानक हा बिघाड झाल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांना ऑफिसला जायला, तसेच विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजमध्ये जाण्यास उशीर होत आहे. यामुळे अनेक कर्मचारी संतप्त झाले आहेत. तसेच रेल्वे उशिराने धावत असल्याने स्टेशनवरही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.