Mumbai Local खाली येऊन म्हशीचा दुर्दैवी मृत्यू! तासभर वाहतुकीवर परिणाम, आता काय परिस्थिती?
Mumbai Local Train Update : शुक्रवारी दुपारी चार वाजून चाळीस मिनिटांनी ही घटना घडली. यामुळे टिटवाळ्याच्या दिशें जाणारी वाहतूक खोळंबली होती.
मुंबई : रेल्वे रुळ ओलांडणं हे सगळ्यांसाठीच धोकादायक. आंबिवली आणि टिटवाळा (Ambiwali Titwala) दरम्यान असाच एक भयंकर अपघात घडला. काही म्हशी लोकलखाली (Mumbai Central Railway Local) आल्यानं म्हशींचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेमुळे आंबिवली-टिटवाळा ही वाहतूक जवळपास तासभर ठप्प झाली होती. शुक्रवारी दुपारी चार वाजून चाळीस मिनिटांनी ही घटना घडली. यामुळे टिटवाळ्याच्या दिशें जाणारी वाहतूक खोळंबली होती. सुरुवातीला नेमकं काय झालं, हे कळायला काहीच मार्ग नव्हता. त्यामुळे प्रवासीही संभ्रमावस्थेत होते. अखेर एक म्हस लोकलखाली आल्याचं लक्षात आलं. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, रेल्वे प्रशासन तातडीनं घटनास्थळी रवाना झाली. मृत झालेल्या म्हशीला (Cattle runover by local train) हटवण्यात आलं आहे. तसंच लोकलखाली येऊन म्हशीचा जीव गेल्यानं हळहळही व्यक्त होतेय. एकूण तीन म्हशी लोकलखाली आल्या होत्या. त्यातील एक म्हस थोडक्यात बचावली आहे.
View this post on Instagram
वाहतूक पूर्ववत करण्याचं आव्हान
खोळंबलेली वाहतुकीमध्ये या मार्गावरील प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागलंय. आता या मार्गावरची वाहतूक पुन्हा एकदा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र या घटनेमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. आता कोलमडलेलं वेळापत्रक पुन्हा पूर्वपदावर आणण्याचं आव्हान मध्य रेल्वे प्रशासनासमोर आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी काय म्हटलं?
मध्य रेल्वेचे पीआरओ शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी चार वाजून चाळीस मिनिटांनी आंबिवली-टिटवाळ्यादरम्यान वाहतूक ठप्प झाली. ही ठप्प झालेली वाहतूक पुन्हा एकदा पूर्ववत करण्यात आली आहे. पाच वाजून चाळीस मिनिटांनी ही वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली आहे. म्हस रेल्वे रुळांवर येऊन ती लोकलखाली आल्यानं मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं होतं. आता मृत म्हशीला हटवण्यात आलं असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
Cattle runover by local train near Titwala station on down line. Time 4.40pm onwards. Cattles removed and train re-started from site at 5.40pm.
Repercussions: Train nos. 22221 , 12161 ,11401 Asangaon, Titwala locals.@drmmumbaicr
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) April 1, 2022
लांब पल्ल्याच्या गाड्यांचं काय?
तासभर वाहतूक खोळंबली होती. आता या विलंबलेल्या वाहतुकीचा फटका टिटवाळ्याच्या दिशेनं जाणाऱ्या लोकल प्रवाशांना बसण्याचीही शक्यता वर्तवली जाते आहे. तसंच लांब पल्ल्याच्या काही गाड्यांवरही याचा फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र या घटनेमुळे रेल्वे रुळ ओलांडणं, जीवघेणं असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
कपडे धुवायचा त्रास वाचवणारी वॉशिंग मशिन जेव्हा जाळ ओकते, प्रत्येकाने पाहावा असा व्हिडिओ
दरोडेखोराचा फिल्मी स्टाईल पाठलाग, जखमी होऊनही पोलिसाने गचांडी धरलीच, कसारा घाटात थरारनाट्य
Pune Crime | बाथरूममध्ये मोबाईल लपवून शिक्षिकेचे केले चित्रीकरण ; पुण्यात अल्पवयीन मुलाचा प्रताप