मुंबईत भरधाव डंपरने तिघांना उडवले, एकाचा मृत्यू
एका भरधाव डंपरने रस्त्यावरील तीन पादचाऱ्यांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली (Mumbai lower parel Accident) आहे.
मुंबई : एका भरधाव डंपरने रस्त्यावरील तीन पादचाऱ्यांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली (Mumbai lower parel Accident) आहे. यात एका 45 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काल (24 फेब्रुवारी) रात्री उशिरा करी रोड परिसरात हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, काल (24 फेब्रुवारी) रात्री जवळपास 11.30 वाजता करी रोड स्टेशन बाहेर एका भरधाव डंपरने तिघांना चिरडले. यात 45 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर आहेत. जखमींवर नायर रुग्णालयात उपचार सुरु (Mumbai lower parel Accident) आहे.
या प्रकरणानंतर स्थानिक नागरिकांना आक्रमक पावित्रा धारण करत रस्ता बंद केला. रात्री 11 नंतर अनेक मोठेमोठे डंपर या रस्त्यावरुन जातात. हे डंपर चालवणारे अनेक ड्रायव्हर हे नशेत असतात.
या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. दरम्यान पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली आहे. हा चालक नक्की नशेत होता का? याबाबत पोलीस तपास सुरु आहे. अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली (Mumbai lower parel Accident) नाही.