LIVE | सलग 3 दिवस सुट्या असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची गर्दी

| Updated on: Dec 28, 2020 | 11:52 PM

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, लाईव्ह अपडेट, ब्रेकिंग न्यूज, मुंबई-महाराष्ट्रातील मोठ्या घडामोडी एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर (Live Update Breaking News)

LIVE | सलग 3 दिवस सुट्या असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची गर्दी

महाराष्ट्रासह देशातील घडामोडी एका क्लिकवर

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 28 Dec 2020 11:52 PM (IST)

    सलग 3 दिवस सुट्या असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची गर्दी

    सलग 3 दिवस सुट्या असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची गर्दी, रात्री 8 .30 पर्यंत चालली प्रक्रिया, आज तब्बल 194 अर्ज दाखल, दुपारी 3 पर्यंत होती अर्ज भरण्याची वेळ, मात्र त्रुटी सह इतर कामाला लागला वेळ ..

  • 28 Dec 2020 09:44 PM (IST)

    रत्नागिरीमध्ये पतीने पत्नीवर केले वार, परिसरात भीतीचं वातावरण

    – रत्नागिरी शहरातील भर वस्तीतील धवल कॉम्प्लेक्स परिसरात ही घटना घडली

    – सोमवारी संध्याकाळी उशिरा ही घटना घडली

    – पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने केले वार

    – पोलीस घटनास्थळी रवाना

    – पती पोलिसांच्या ताब्यात

  • 28 Dec 2020 09:41 PM (IST)

    डीसी डिजाइनचे फाउंडर दिलीप छाबड़िया यांना मुंबई क्राइम ब्रांचने केली अटक

    प्रसिद्ध कार डिजाइनर आणि डीसी डिजाइनचे फाउंडर दिलीप छाबड़िया यांना मुंबई पोलीस क्राइम ब्रांचने केली अटक, आरोप काय आहे ? कुठल्या गुन्ह्याअंतर्गत अटक केली. याबद्दल माहिती देण्यास पोलिसांचा नकार,  उद्या मुंबई पोलीस पत्रकार परिषद घेण्याची शक्यता

  • 28 Dec 2020 08:11 PM (IST)

    नाशिकमध्ये नायलॉन दोऱ्यामुळे महिलेचा मृत्यू

    नाशिकमध्ये नायलॉन दोऱ्यामुळे महिलेचा मृत्यू, कामावरून दुचाकीवर घरी जात असताना द्वारका पुलावर घडली घटना, नायलॉन मांज्याला बंदी असतांना सर्रासपणे होत आहे वापर

  • 28 Dec 2020 07:50 PM (IST)

    कांदा निर्यातीवरील बंदी १ जानेवारीपासून हटवणार

    कांदा निर्यातीवरील बंदी हटणार १ जानेवारीपासून निर्यातबंदी हटणार केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

  • 28 Dec 2020 07:49 PM (IST)

    कांदा निर्यातीवरील बंदी उठवली, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

    केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठवली आहे.

  • 28 Dec 2020 07:47 PM (IST)

    दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे मुंबईत पडसाद

    – कांग्रेसकडून आंदोलनात शहिद झालेल्या कुटूंबियांना शहिदांचा दर्जा द्या या मागणीसाठी चेंबूरमध्ये स्लमसेलकडून श्रद्धांजली सभेचं आयोजन – माजी खासदार एकनाथ खडसे यांनी शेतकर्यांना शहिदांचा दर्जा द्या, अशी केली मागणी

  • 28 Dec 2020 07:27 PM (IST)

    राज्य सरकारकडून 31 डिसेंबरसाठी मार्गदर्शक सूचना जारी

  • 28 Dec 2020 07:26 PM (IST)

    सातारा, महाबळेश्वर, पाचगणीत 31 डिसेंबरला रात्री 10 नंतर कार्यक्रम सुरु ठेवण्यास बंदी

    सातारा, महाबळेश्वर,पाचगणी या पर्यटनस्थळांमध्ये 31 डिसेंबरच्या रात्री 10 नंतर कोणतेही कार्यक्रम सुरू ठेवण्यास बंदी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 144 कलमांतर्गत सातारा जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, सातारा जिल्हयातील सर्व हॉटेल व्यावसायिकांना देखील रात्री 11 पर्यंतच हॉटेल्स चालू ठेवण्याची  परवानगी, आज रात्रीपासून आदेश लागू

  • 28 Dec 2020 07:21 PM (IST)

    4 जानेवारीपासून शाळा सुरु करण्याची तयारी सुरु, पुण्याच्या महापौरांची मोठी घोषणा

  • 28 Dec 2020 05:16 PM (IST)

    राज्यपालनियुक्त आमदारांबाबत महाविकासआघाडीकडून दोन वेळा विचारणा : सूत्र

    राज्यपालनियुक्त आमदारांबाबत महाविकासआघाडीकडून दोन वेळा विचारणा, सूत्रांची माहिती, कित्येक दिवस होऊनही राज्यपालांकडून 12 आमदारांच्या यादीवर सही नाही. त्यामुळे महाविकासआघाडीकडून 15 दिवसात आमदारांची नियुक्ती करावी अशी विनंती केली होती. मात्र अद्याप यावर सही न केल्याने महाविकासआघाडी सरकारने दोनदा विचारणा केली.

  • 28 Dec 2020 05:13 PM (IST)

    उद्धव ठाकरेंची ‘वर्षा’वर बैठक, अजित पवार बैठकीतून बाहेर

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक, उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीतून बाहेर पडले. संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंत, विश्वास नांगरे-पाटील, अजोय मेहता अद्याप ‘वर्षा’वरच उपस्थित

  • 28 Dec 2020 05:10 PM (IST)

    उद्धव ठाकरे-संजय राऊतांची बैठक, ‘वर्षा’वर तासाभरापासून खलबत

    शिवसेना नेते संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक, उपमुख्यमंत्री अजित पवार, विनायक राऊत, अरविंद सावंत, विश्वास नांगरे-पाटील, अजोय मेहतांची उपस्थिती, ‘वर्षा’वर महत्वाची खलबते सुरू

  • 28 Dec 2020 03:41 PM (IST)

    संजय राऊत प्रतिसाद देणं का टाळतात? : किरीट सोमय्या

    मी शिवसेनेच्या संजय राऊत यांची पत्रकार परिषद ऐकली. ते प्रतिसाद देणं टाळत का आहेत? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्याने केला आहे. एचडीआयएलकडून त्यांच्या कुटुंबियांना ५५ लाख रुपये का मिळाले? जो पीएमसी बँक फ्रॉड मनी आहे. एचडीआयएलसोबत त्यांचा काय संबंध आहे? प्रवीण राऊत? जो पीएमसी ठेवीदारांशी संबंधित पैसा आहे, तो फ्रॉड मनी हे परत करतील का? असेही किरीट सोमय्यांनी सांगितले.

    वर्षा संजय राऊत यांना 24 नोव्हेंबर 2020, 11 डिसेंबर 2020 आणि 29 डिसेंबर 2020 रोजी ईडीसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. माधुरी प्रवीण राऊत यांना एचडीआयएलकडून 55 लाख रुपये मिळाले. यानंतर ते वर्षा संजय राऊत यांना ट्रान्सफर करण्यात आले, असेही किरीट सोमय्या म्हणाले.

  • 28 Dec 2020 03:24 PM (IST)

    बेळगाव महानगरपालिकेसमोर कन्नड रक्षण वेदीकेच्या कार्यकर्त्यांनी फडकविला लाल पिवळा ध्वज

    बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेसमोर कन्नड रक्षण वेदीकेच्या कार्यकर्त्यांनी  लाल पिवळा ध्वज फडकविला. लाल पिवळा ध्वज हा कन्नड रक्षण वेदीकेचा मानला जातो. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून देखील कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी धिंगाणा करत ध्वज फडकविला. मराठी भाषिकाच्या जखमींवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

  • 28 Dec 2020 02:51 PM (IST)

    भाजपाच्या विरुद्ध बोललं की ईडीची चौकशी लावली जातेय : अनिल देशमुख

    नागपूर : भाजपच्या विरुद्ध जो बोलेल त्य़ाच्या विरोधात ईडीची चौकशी लावली जात आहे. अशा प्रकारे ईडीची चौकशी लावणे बरोबर नाही, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. तसेच, महाराष्ट्रात असं राजकारण कधी पाहिल नसल्याचं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली.

  • 28 Dec 2020 02:19 PM (IST)

    मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, तुम्हाला देश सोडून पळावं लागेल : राऊत

    देश सोडून पळावं लागेल. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. तुमच्यासारखे अनेक लोक मी पाहीले आहेत. काही लोक माझ्याकडे येत आहेत, सरकार पाडणार असल्याचं सांगत आहेत. मी पण त्यांना सांगितलं की सराकर पाडून दाखवा.

  • 28 Dec 2020 02:15 PM (IST)

    आम्ही राजकीय हेतून पुढे जाऊ, याचा सूड घेतला जाणार

    भाजपच्या 120 नेत्यांची यादी तयार आहे. या नेत्यांवर ईडी काय कारवाई करणार मी ते पाहणार आहे.

  • 28 Dec 2020 02:13 PM (IST)

    मी जर तोंड उघडलं तर केंद्रातल्या सरकारला हादरे बसतील

    मला उद्धव ठाकरेंनी सांगितलं की कुटुंबापर्यंत पोहोचायचं नाही. माझ्याकडे सगळ्यांचे हिशोब आहेत. तुमच्या कुटुंबाच्या व्यवहाराचाही आमच्याकडे हिशोब आहे. राजकीय सुडाला राजकीय सुडानेच उत्तर दिलं जाईल. हे प्रकरण तुम्हाला महाग पडेल

  • 28 Dec 2020 02:11 PM (IST)

    बायकांच्या पदराआडून लढाईची मोहीम तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही : संजय राऊत

    महाराष्ट्राचे सरकार टिकू देऊ नका असा इशारा भाजपचे नेते देत आहेत. तुम्ही या सरकारच्या मोहात पडू नका. हे सरकार आम्ही कोणत्याही परिस्थितीत पाडायचं ठरवलं आहे. असं भाजप नेते म्हणत आहेत.  बायकांच्या पदराआडून लढाईची मोहीम तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही : संजय राऊत

  • 28 Dec 2020 02:09 PM (IST)

    भाजपचे तीन नेते ईडी कार्यालयातून कागदपत्रं काढतात आणि ते माहिती लीक करत आहेत : राऊत

    माझ्या माहितीप्रमाणे बाहेरच्या व्यक्तीला ईडी कार्यालयात प्रवेश मिळत नाही. मात्र गेल्या ३ महिन्यांपासून भाजपचे लोक या कार्यालयात चकरा मारत आहेत

  • 28 Dec 2020 02:08 PM (IST)

    सरकारचे खंदे समर्थक असणाऱ्यांच्या कुटुंबीयांनी त्रास : राऊत

    शिवसेनेच्या 22 लोकांच्या नावांची यादी दाखवली गेली त्या लोकांना पिढीच्या नोटिसा जारी करा त्यांच्यावर दबाव आणण हे तंत्र अवलंबलं जातय

  • 28 Dec 2020 02:07 PM (IST)

    वेगवेगळ्या मार्गांनी मला धमकावलं, पण मी त्यांचा बाप : राऊत

    भारतीय जनता पक्षाची तीन लोकं सतत ईडीच्या कार्यालयात जात आहेत. माझ्याकडे पुरावे आहेत. पुराव्यांशिवाय मी बोलत नाही. वेगवेगळ्या मार्गांनी मला धमकावलं, पण मी त्यांचा बाप

  • 28 Dec 2020 02:05 PM (IST)

    भारतीय जनता पक्षाची माकडं कालपासून उड्या मारत आहेत : राऊत

    कालच मी देवेंद्र फडणवीसांचं ऐतिहासिक विधान ऐकलं, काही केलं नसेल तर घाबरायचं कशाला? नोटीस म्हणजे काय ब्रह्मवाक्य आहे का? मी परत सांगतो, आमच्यातील कुणी काहीही केलं नाही. नोटीस येऊद्या किंवा नाही येऊ द्या. आम्ही घाबरत नाही, तुम्ही घाबरायला हवं

  • 28 Dec 2020 02:04 PM (IST)

    राजकारणात समोरासमोर लढण्याची धमक हवी : राऊत

    गेल्या वर्षभरात मी पाहतोय, शरद पवार, प्रफुल्ल पटेल, प्रताप सरनाईक, माझ्या नावाचा तुम्ही गजर करताय कालपासून यांना सातत्याने जे प्रमुख लोक आहेत, जे हे सरकार बनवण्यात आग्रही होते, राजकीय दृष्ट्या ते दबावाला बळी पडत नाहीत, तेव्हा हे असे नोटीस पाठवल्या जातात.. याला फ्रस्टेशन, हतबलता म्हणतात.. राजकारणात समोरासमोर लढण्याची धमक हवी.. छत्रपतींची भूमी आहे, समोरासमोर लढा

  • 28 Dec 2020 02:03 PM (IST)

    राजकारणात समोरासमोर लढायला हवे विरोध हतबल आहेत : राऊत

    एकनाथ खडसे यांना नोटीस आलेली आहे. जे प्रमुख लोक आहेत. भाजपला रोखण्याच्या प्रक्रियेत जे सहभागी आहेत. त्यांना कागदाचे तुकडे पाठवले जात आहे. ही त्यांची हतबलता आहे. त्याचे वैफल्य आहे. राजकारणात समोरासमोर लढायला हवे

  • 28 Dec 2020 02:01 PM (IST)

    आमच्यासाठी ईडीची नोटीस हा महत्त्वाचा विषय नाही : राऊत

    आमच्यासाठी ईडीची नोटीस हा महत्त्वाचा विषय नाही. ईडीची नोटीस येणं म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाने भडास काढणे हे लोकांनी गृहीत धरलं आहे.

  • 28 Dec 2020 01:23 PM (IST)

    नाशिकमध्ये शिवसेना नगरसेवकांची तातडीची बैठक, मनपा निवडणुकीवर चर्चा होणार

    नाशिक : शहरात शिवसेना नगरसेवकांची तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. ही बैठक शिवसेना कार्यालयात होत आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात ही आढावा बैठक घेण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान, येथील स्थानिक नेत्यांनी पालिका निवडणूक स्वबळावर लवढण्याचा पवित्रा घेतला आहे. या बैठकीत त्याबाबत होण्याची शक्यता वर्तवली जातेय. महानगरप्रमुख सुधारक बडगुजर यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरु आहे.

  • 28 Dec 2020 12:41 PM (IST)

    ईडीलाही महाराष्ट्रात येण्याची परवानगी घ्यावी लागावी : मुश्रीफ

    ज्या पद्धतीने सीबीआयला राज्याच्या परवानगी शिवाय राज्यात येता येणार नाही असं न्यायालयाने सांगितलेलं आहे. तशाच प्रकारचा निर्णय ईडीबाबतीत घेण्याची गरज असल्याचे मत ग्राम विकासमंत्री हसम मुश्रीफ यांनी व्यक्त केले. तसेच, ईडीविरोधात लोक रस्त्यावर उतरलीत अशी परिस्थिती असल्याचे म्हणत संजय राऊत यांच्या पत्नीला मिळालेल्या ईडी नोटिशीवर मुश्रीफ यांनी टीका केली आहे.

  • 28 Dec 2020 12:34 PM (IST)

    अडचणी आणल्या तरी आम्ही डगमगणार नाही : शंभूराज देसाई

    कुणी कितीही जाणीवपूर्वक अडचणी आणल्या तरी आम्ही डगमगणार नाहीत. आमच्या समोर असलेल्या विचारांवर आम्ही चालणार,अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. तसेच, ईडीच्या नोटिशीसंदर्भात संजय राऊत सविस्तर बोलतील असेही ते म्हणाले.

  • 28 Dec 2020 11:55 AM (IST)

    पाथर्डी तालुक्यात बस-कारमध्ये अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

    अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील देवराई गावाजवळ पहाटे एका खासगी बस आणि कारचा अपघात झाला. कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला.

  • 28 Dec 2020 11:51 AM (IST)

    ईडीची कारवाई राजकीय हेतूने प्ररित : आदित्य ठाकरे

    मुंबई : संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस मिळाल्यानंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ईडीची कारवाई ही राजकीय हेतून प्रेरित असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसेच, महाविकास आघाडी कशालाही घाबरत नाही. आम्ही राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत, असेही पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.

  • 28 Dec 2020 11:28 AM (IST)

    मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी लक्झरी बसला अपघात, दोघे गंभीर जखमी

    रायगड : मुबंई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी लक्झरी बसला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन जण गंभीर झाले असून 6 जण किरकोळ जखमी झाले आहेत. पुण्याहून मुबंईकडे येत असताना बोरघाटातील खोपोलीजवळ हा अपघात झाला. या अपघातामुळे वाहतूक काही काळासाठी विस्कळित झाली होती

  • 28 Dec 2020 11:16 AM (IST)

    कोणत्याही मिशनसाठी अंबाबाईचे दर्शन घेतले नाही: देवेंद्र फडणवीस

    2020 वर्षे सर्वांना अडचणीचे गेले मात्र येणारे 2021 वर्षे हे सर्वांना आनंदाचे, सुखा समाधानाचे, आरोग्य ऐश्वर्याचे जावो, असं साकडं अंबाबबाईला घातलं आहे. कोणत्याही मिशनसाठी अंबाबाईचे दर्शन घेतले नाही. जेंव्हा कधी ऊर्जेचे गरज असते आशीर्वादाची गरज असते तेव्हा आईचे आशीर्वाद घ्यावे लागतात, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • 28 Dec 2020 10:45 AM (IST)

    अंबाबाई मंदिराचे चारही दरवाजे खुले होणार, सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत दर्शन घेण्यास परवानगी

    कोल्हापूर : सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत अंबाबाई मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हा निर्णय घेतला आहे. भाविकांची गर्दी वाढत असल्याने समितीने हा निर्णय घेतला आहे. तसेच, नवीन वर्षात मंदिराचे चारही दरवाजे खुले केले जाणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली आहे.

  • 28 Dec 2020 10:18 AM (IST)

    इंदोरीकर महाराज यांच्या उंबरे येथील विहिरीत बुडून हरिणाचा मृत्यू

    अहमदनगर : कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या उंबरे येथील विहिरीत बुडून एका हरिणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बिबट्याने पाठलाग केल्याने हरिण विहिरीत पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. दरम्यान, वनविभागाने हरिणाचे शवविच्छेदन करून निंबाळे रोपवाटीकेत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले आहेत.

  • 28 Dec 2020 10:15 AM (IST)

    ईडीची नोटीस म्हणजे राजकारण आहे : संजय राऊत

    मुंबई : “पत्नीला ईडीची नोटीस मिळणे हे राजकारण आहे. या विषयावर शिवसेना भवनात दोन वाजता बोलणार आहे. कालपासून माझ्याकडे ईडीचं कुणीही आलेलं नाही,” असं राऊत म्हणाले. तसेच, भाजप कार्यालयात मी माझा माणूस पाठवला आहे, असे म्हणत त्यांनी भाजपवर खोटक टीका केली.

  • 28 Dec 2020 09:27 AM (IST)

    साईबाबांच्या आरतीसाठी 25 हजार रुपयांची देणगी द्या, साई संस्थानने मागणी केल्याचा आरोप

    अहमदनगर : शिर्डी येथील साई मंदिरात आरती करायची असल्यास 25 हजार रुपये देणगीची मागणी केल्याचा आरोप साई स्थांनवर करण्यात आला आहे. हा आरोप दिल्ली येथील महिला भाविकांनी केला आहे. काउंटरजवळ देणगी देण्याचं आवाहन केलं जात आहे. तसेच देणगी दिल्यावर काय सुविधा मिळणार याचेही फलक लावण्यात आल्याचं या महिलांनी म्हटलं आहे.साई संस्थानने याबाबत अजूनतरी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

  • 28 Dec 2020 09:12 AM (IST)

    वंचित बहुजन आघाडीची ग्रामपंचायत निवडणुकीत उडी, बार्शी तालुक्यात निवडणूक लढवणार

    सोलापूर : बार्शी तालुक्यात वंचित बहुजन आघाडी ग्रामपंचायत निवडणूक लढवणार आहे. तशी माहिती येथील पदाधिकाऱ्यांनी केली आहे. राजकीय व्यवस्थेने नाकारल्या सर्व वंचित समाज आणि घटकांना बरोबर घेऊन निवडणुका लढविणार असल्याचे येथील पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. वंचित बहुजन आघाडी काही गावात स्वतंत्र पॅनलसुद्धा उभे करणार आहे.

  • 28 Dec 2020 08:34 AM (IST)

    ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचे शेवटचे दोन दिवस, उमेदवारांची गर्दी

    औरंगाबाद : ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची गर्दी होत आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख दोन दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे ही गर्दी होत आहे. आज आणि उद्या ही गर्दी असेल.

  • 28 Dec 2020 08:28 AM (IST)

    कोल्हापुरात सोन्याचा दर 51,200 तर कोल्हापूरच्या तुलनेत पुण्यात सोने 300 रुपयांनी महाग

    पुणे : कोल्हापुरात सोन्याचा आजचा दर प्रतितोळा 51,200 रुपये आहे. तर चांदीचा दर 66,100 प्रतिकिलो आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या तुलनेत पुण्यात आज सोन्याला चांगला भाव मिळाला आहे. पुण्यात सोन्याचा आजचा दर 51,500 प्रतितोळा आहे. तर चांदीचा दर 68 हजार प्रतिकिलो आहे.

  • 28 Dec 2020 08:23 AM (IST)

    जम्बो कोविड हॉस्पिटलमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी

    पुणे : जम्बो कोविड हॉस्पिटलमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी करण्यात येत आहे. 400 कंत्राटी परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांची पालिकेकडे तशी मागणी केली आहे. तसेच, नायडू रुग्णालयासह पालिकेच्या इतर रुग्णालयांतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही कायम करण्याची मागणी केली जात आहे. फेब्रुवारी महिन्यात जम्बो कोव्हीड हॉस्पीटलमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा करार संपणार असल्यामुळे या मगणीने जोर धरला आहे.

  • 28 Dec 2020 08:20 AM (IST)

    नागपुरात पेट्रोल 23 पैशांनी महागले, डिझेलचा दर प्रतिलिटर 79.88 रुपये

    नागपूर : जिल्ह्यात पेट्रोल आजचा दर 90.56 रुपये प्रतिलिटर आहे. कालच्या तुलनेत पेट्रोल 23 पैशांनी महागले आहे. तर डिझेल 79.88 रुपये प्रतिलिटर दराने डिझेलची विक्री होत आहे.

  • 28 Dec 2020 08:13 AM (IST)

    नागपुरात सोन्याच्या दर प्रतितोळा 48730 तर चांदी प्रतिकिलो 67 हजार 600 रुपये

    नागपूर : सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. येथील सराफा बाजारात सोन्याचा आजचा भाव प्रतितोळा 48730 रुपयांवर आला आहे. तर चांदीचा भाव प्रतिकिलो 67600 रुपये आहे. मागील दोन दिवसांच्या तुलनेत नागपुरात सोन्याच्या दरात आज घसरण झाली आहे. शनिवारी ( 26 डिसेंबर) सोन्याचा दर 51,000 रुपये होता.

  • 28 Dec 2020 07:38 AM (IST)

    नागपुरात प्रक्रिया उद्योग नसल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी संकटात, खर्च 44 हजार तर उत्पन्न 40 हजार

    नागपूर : संत्र्याचे दर पडल्याने विदर्भातील संत्रा उत्पादन संकटात सापडले आहे. संत्र्याचा एकरी उत्पादन खर्च 44 हजार रुपये असून उत्पन्न फक्त 40 हजार रुपये असल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. विदर्भात प्रक्रिया उद्योग नसल्याने संत्रा पिकाल कमी दर मिळत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. त्यातच काटोल येथील संत्रा प्रक्रिया उद्योग मागील 25 वर्षांपासून बंद असल्यामुळेसुद्धा संत्र्याला भाव मिळत नसल्याची खदखद शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

  • 28 Dec 2020 07:32 AM (IST)

    औरंगाबाद महाराज हल्ला प्रकरणात परस्परविरोधी गुन्हे दाखल, आतापर्यंत 15 जण ताब्यात

    औरंगाबाद : जिल्ह्यातील महाराज हल्ला प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. भाविकांना दमदाटी आणि मारहाण केल्याप्रकरणी महाराजांवर तीन कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराजांवरील हल्ला प्रकरणी गावातील 20 नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी 15 गावकऱ्यांना बिडकीन पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

  • 28 Dec 2020 07:29 AM (IST)

    आयर्लंडहून नागपुरात आलेल्या प्रवाशाला कोरोना, नव्या स्ट्रेनची तपासणी होणार

    नागपूर : आयर्लंडवरुन नागपुरात आलेल्या एका प्रवाशाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या प्रवाशावर उपचार सुरु असून त्याला कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण झाली आहे का?, याची तपासणी होणार आहे. आतापर्यंत विदेशातून नागपुरात आलेल्या 5 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. नागपुरात युरोप, मिडल ईस्ट, साऊथ आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांच्या चाचण्या करण्यात येत आहेत.

  • 28 Dec 2020 06:46 AM (IST)

    माथेरान घाटात कारला अचानक आग, प्रवासी सुखरुप

    रायगड : माथेरान घाटात कारला आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत कार पूर्णपणे जळाली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नेरळहून माथेरानकडे जाताना घाटात ही घटना घडली. यावेळी कारने पेट घेतल्याचे लक्षात आल्यानंतर चालकाने कार थांबवली मात्र, मदतकार्य सुरु करण्यापूर्वीच कार जळून खाक झाली होती.

  • 28 Dec 2020 06:41 AM (IST)

    मांडवा बिचवर अडकलेल्या सर्व पर्यटकांची सुटका, पर्यटक मुंबईकडे रवाना

    रायगड : मांडवा येथील बिचवर जवळपास 15 ते 16 पर्यटक अडकेले होते. त्यांची सुटका करण्यात आही. हे सर्व प्रवासी मुंबईकडे रवाना झाले आहेत. तीन कुटुंबातील जवळपास 15 ते 16 प्रवासी मांडवा येथील बिचवर अडकले होते. माडंवा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक धर्मराज सोनके यांनी स्थानिकांच्या मदतीने हे मदतकार्य केले आहे.

Published On - Dec 28,2020 11:52 PM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.