LIVE | साई भक्तांसाठी आनंदाची बातमी, वर्षाअखेरीस साई मंदिर राहणार खुलं

| Updated on: Dec 29, 2020 | 11:51 PM

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, लाईव्ह अपडेट, ब्रेकिंग न्यूज, मुंबई-महाराष्ट्रातील मोठ्या घडामोडी एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर (Live Update Breaking News)

LIVE | साई भक्तांसाठी आनंदाची बातमी, वर्षाअखेरीस साई मंदिर राहणार खुलं
Follow us on

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

 

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 29 Dec 2020 11:24 PM (IST)

    दुचाकीवरून जाणाऱ्या पोलीस हवालदाराला डंपरची धडक, जागीच मृत्यू

    दिंडोशी वेस्टन एक्सप्रेस हायवेवर गाडीवरून जात असणाऱ्या पोलीस हवालदार पांडुरंग सकपाळ यांना डंपरने धडक दिली. त्यांना जवळच्या कूपर रुग्णालयात दाखल केले असताना मृत्यु घोषित करण्यात आले आहे.

  • 29 Dec 2020 10:29 PM (IST)

    वर्षाअखेरीस साई मंदिर राहणार खुले

    – भाविकांच्या आणि ग्रामस्थांच्या मागणीनंतर मंदिर राहणार खुले
    – सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो भाविक येतात साई दरबारी
    – मंदिर स्वच्छेतेसाठी रात्री 11.25 ते 11.55 या वेळेत राहणार दर्शनासाठी बंद
    – शिर्डी साईबाबा संस्थानचा निर्णय
    – साईभक्तांना दिलासा
    – साई मंदिर दर्शनासाठी खुले राहणार असल्याने 31 डिसेंबर ची शेजारती आणि 1 जानेवारी रोजी काकड आरती रद्द


  • 29 Dec 2020 10:07 PM (IST)

    दादा भुसे यांना कोरोनाची लागण, ट्वीट करून दिली माहिती

  • 29 Dec 2020 10:02 PM (IST)

    मुक्ताईनगरमध्ये 51 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज 373 उमेदवारी अर्ज दाखल

    मुक्ताईनगर तालुक्यातील 51 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज 373 उमेदवारी अर्ज दाखल झाले तर एकूण उमेदवार आतापर्यंत 398 अर्ज दाखल झाले आहेत…

  • 29 Dec 2020 09:04 PM (IST)

    साईबाबांना कोट्यवधींचं दान, मागील 14 दिवसांत दानपेटीत रोख 3 कोटी 17 लाखांचं दान

    साईबाबांना कोट्यवधींचं दान, मागील 14 दिवसात दानपेटीत रोख 3 कोटी 17 लाखांचं दान
    – तर 93 ग्राम सोने आणि 4 किलो चांदी ही दान
    – 15 डिसेंबर ते 28 डिसेंबर दरम्यान आलेल्या दानाची‌ मोजदाद
    – मागिल वर्षाच्या तुलनेत कमी प्रमाणात ‌दान
    – तिन दिवसाआड होणारी काउटींग तब्बल 14 दिवसानंतर
    – मात्र कोरोना संकटातही कोटयवधींच दान
    – दानात ऑनलाइन द्वारे मिळालेल्या दानाचा समावेश नाही

  • 29 Dec 2020 07:40 PM (IST)

    संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना 5 जानेवारीला हजर राहण्यासाठी ईडीचे नवे समन्स

    संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना 5 जानेवारीला हजर राहण्यासाठी ईडीकडून नवे समन्स बजावण्यात आले आहे.

  • 29 Dec 2020 06:29 PM (IST)

    मुंबई महापालिकेतील शाळा,महाविद्यालय 15 जानेवारीपर्यंत बंद राहणार

    मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालय 15 जानेवारी पर्यत बंद राहणार आहेत. मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.  मुंबईतील कोरोना परिस्थिती नियंत्रणात असली तरी अन्य देशात असलेली कोरोनाची परिस्थिती पाहता खबरदारी म्हणून 15 जानेवारी पर्यंत शाळा बंद ठेवण्यात येतील.

  • 29 Dec 2020 06:11 PM (IST)

    ग्रामपंचायतीचे उमेदवारी अर्ज ऑफलाईन भरण्यास परवानगी द्या: सुधीर मुनगंटीवार

    ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑफलाईन अर्ज सादर करण्‍याची परवानगी द्यावी, अशी मागणी भाजप नेते माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. त्याबाबत मुनगंटीवार यांनी मुख्‍य निवडणुक अधिका-यांना पत्र लिहिले.

  • 29 Dec 2020 06:09 PM (IST)

    ग्रामपंचायत निवडणूक: उमेदवारी अर्ज ऑफलाईन स्वीकारण्याची उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

    उस्मानाबाद जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीचा अर्ज भरण्यास इंटरनेटसह अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने उमेदवारी अर्ज ऑफलाईन पध्दतीने स्वीकारण्यात, यावेत अशी मागणी काही इच्छुक उमेदवारांनी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा याकडे केली आहे. निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस असून इंटरनेट व सर्व्हर अनेक वेळा बंद असल्याने अनेक ग्रामपंचायतीतील उमेदवारांचे अर्ज भरले गेलेले नाहीत. अर्ज भरले न गेल्यास हे उमेदवार निवडणूकीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • 29 Dec 2020 06:00 PM (IST)

    भाजप नेते राजेंद्र गावित यांच्या घरी नंदूरबार एसीबीचा छापा

    भाजप नेते राजेंद्रकुमार गावित आणि त्यांच्या पत्नी ईला गावित यांच्याविरोधात बेहिशोबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. त्यानंतर राजेंद्रकुमार गावित यांच्या नटावद आणि तळोदा येथील घरी एसीबीनं छापा टाकला आहे. एसीबीनं कॅमेऱ्यासमोर कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही.

  • 29 Dec 2020 05:53 PM (IST)

    शिर्डीतून बेपत्ता झालेली इंदूरची महिला तीन वर्षानंतर प्रियकरासोबत सापडली

    इंदूरची दिप्ती सोनी तीन वर्षांपूर्वी शिर्डीतून बेपत्ता झाली होती. तिचा पती मनोज सोनीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मानव तस्करी बाबत न्यायालयाने चिंता व्यक्त केली होती. तब्बल साडेतीन वर्षांनी मध्य प्रदेशच्या इंदूरमध्येच दिप्ती सापडली. प्रियकर ओमप्रकाश चंदेल सोबत दिप्ती निघून गेल्याचा शिर्डी पोलिसांनी खुलासा केला. विवाहापूर्वी दिप्ती आणि चंदेलचे प्रेमसंबध होते.पत्रकार परिषदेत अतिरिक्त पोलीस अधिक्षक दीपाली काळे यांनी ही माहिती दिली.

  • 29 Dec 2020 05:43 PM (IST)

    गृह मंत्रालयानं राज्यसरकारला दिले संचारबंदी लागू करण्याचे अधिकार

    कोरोना संक्रमण रोखण्यासाठी राज्य रात्र संचारबंदी लावू शकते. राज्य सरकार आवश्यक असल्यास संचारबंदीवर निर्णय घेऊ शकते.केंद्रीय गृह मंत्रालयाकडून राज्यांना परवानगी

  • 29 Dec 2020 05:34 PM (IST)

    नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का; भाजपचे तीन नगरसेवक शिवसेनेत करणार प्रवेश

    नवीन गवते , दिपा गवते आणि अपर्णा गवते हे भाजपचे नगरसवेक लवकरच शिवबंधन बांधणार आहेत. थोड्याच वेळात वर्षा निवासस्थान येथे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत औपचारिक पक्षप्रवेश होणार आहे. भाजप नेते गणेश नाईक यांचे हे नगरसवेक खंदे समर्थक आहेत.

  • 29 Dec 2020 05:26 PM (IST)

    वसई विरार महापालिकेची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

    वसई विरार महापालिका क्षेत्रात मागील 24 तासात केवळ 23 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आलाय. तर, 34 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 2 जणांचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वसई विरारमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 29 हजार 156 तर कोरोनामुक्त झालेल्या रुगणाची संख्या 27 हजार 953 आहे. सध्या 320 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वसई विरार मध्ये आजपर्यंत 883 लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

  • 29 Dec 2020 05:21 PM (IST)

    नागपूर जिल्ह्यातील हिंगणा एमआयडीतील कंपनीला आग

    नागपूर जिल्ह्यातील हिंगणा एमआयडीतील कंपनीला आग लागली आहे.फर्निचरच्या कंपनीला आग लागली असल्याची माहिती आहे. औद्योगिक वसाहतीतील घटना असल्याने
    परिसरात अनेक कंपन्या असल्यानं चिंता वाढलीय. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

  • 29 Dec 2020 03:18 PM (IST)

    BMC च्या अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक ताज हॉटेलला झुकतं माप, रवी राजांचा आरोप

    हॉटेल ताजच्या समोरचा रस्ता आणि फुटपाथ दोन्ही सुरक्षेच्या कारणास्तव अतिक्रमण केले आहे.या विषयावर एक व्यक्ती लोकायुक्त कडे याबाबत तक्रार केलीय. लोकायुक्त दिलेल्या निर्णय नंतर पालिकेने रस्त्याबाबत कुठलीही पॉलिसी तयार केली नाही. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक ताज हॉटेलला झुकते माप दिल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवि राजा यांनी केलाय.

  • 29 Dec 2020 03:17 PM (IST)

    संजय राऊतांना भेटण्यासाठी अनिल परब सामनामध्ये दाखल

    संजय राऊत यांना भेटण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब सामनात दाखल, ED समन्स बाबत कायदेशीर बाबींवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

  • 29 Dec 2020 01:58 PM (IST)

    प्रकाश आंबेडकर यांना ऐक्य करायचं नसेल तर त्यांनी एनडीए ला पाठिंबा द्यावा : आठवले

    औरंगाबाद : रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांची ओळख आहे. ती ओळख मी कधीही पुसणार नाही. अनेक लोक रिपब्लिकन पक्षाची ओळख पुसत आहेत. तो द्रोह मी कधीही करणार नाही. रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य होऊ शकणार नाही. प्रकाश आंबेडकर यांनी वंचितचा प्रयोग केला पण त्यांचा एकही माणूस निवडून आला नाही. फक्त मतं खाण्यासाठी हा प्रयोग झाला.

  • 29 Dec 2020 01:55 PM (IST)

    नामांतर लढ्यात आम्ही तडजोड केली, शेतकऱ्यांनीही तडजोड करावी : आठवले

    औरंगाबाद : शेतकऱ्यांनी तडजोड करायला पाहिजे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरात आम्हीदेखील तडजोड केली होती, असे आठवले म्हणाले. तसेच, शेतकरी कायदे मागे घेतले तर संसद आणि संविधानाला महत्त्व राहणार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.

  • 29 Dec 2020 01:47 PM (IST)

    नागपूरच्या वाठोडा परिसरात एकाची धारदार शस्त्राने हत्या, संशयित फरार

    नागपूर : नागपूरमधील वाठोडा परिसरात एकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. श्रावणींनगरमधील मैत्री बौद्धविहार येथे ही हत्या झाली आहे. मृत तरुणाचे नाव आसिफ असून तो हसनबागचा रहिवासी आहे. जुन्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, या घटनेतील संशयित फरार आहे.

  • 29 Dec 2020 01:18 PM (IST)

    गुजरातमध्ये भाजपला मोठा धक्का, खासदार मनसुख बसावा यांचा राजीनामा

    गुजरातमध्य़े भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप खासदार मनसुख बसावा यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. बसावा अनेक दिवसांपूसन वरिष्ठ नेत्यांशी नाराज असल्यामुळे त्यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

  • 29 Dec 2020 01:10 PM (IST)

    महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार , आर्थिक मदतीची मागणी

    नाशिक : नायलॉनच्या मांजामुळे काल सायंकाळी मृत्यू झालेल्या महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे. काल सायंकाळी दुचाकीवरून घरी जात असताना मुलीचा मृत्यू झाला होता. शासनाकडून आर्थिक मदत मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.

  • 29 Dec 2020 01:09 PM (IST)

    भुजबळ, वडेट्टीवार यांची हकालपट्टी करा, मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी

    मुंबई : छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार मराठा, धनगर समजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठा समाज यापुढे शांत बसणार नाही. अशा मंत्र्यांना ठोकून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आम्ही राज्यपालांना भेटलो. पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनाही भेटणार आहोत.

  • 29 Dec 2020 12:43 PM (IST)

    रजनीकांत नव्या पक्षाची घोषणा करणार नाहीत, 31 डिसेंबरला करणार होते घोषणा

    मुंबई : सुपरस्टार रजनीकांत यांनी नवीन पक्षाच्या घोषणेबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. 31डिसेंबर रोजी ते नवीन पक्षाची घोषणा करणार होते. मात्र, आता ते पक्षाची घोषणा करणार नाहीत.रजनीकांत यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांनी नवीन पक्षाची घोषणा करणार नसल्याचं सांगितलं आहे.

  • 29 Dec 2020 12:35 PM (IST)

    उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस, नागपूरमध्ये एकूण 130 ग्रामपंचायतींच्या निवडणुका

    नागपूर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचे शेवटचे दोन दिवस उरले आहेत. त्यामुळे इच्छूक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी केली आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत 15 टक्केच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. जिल्ह्यात एकूण 130 ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होणार आहे.

  • 29 Dec 2020 12:30 PM (IST)

    ॲमेझॉन कार्यालय तोडफोड प्रकरण, मनसे कार्यकर्त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी

    मुंबई : ॲमेझॉन कार्यालय तोडफोड प्रकरणी अटक झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांना अंधेरी कोर्टात थोड्याच वेळात हजर करण्यात येणार आहे. तोडफोड प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्यांना जामीन अर्जावर येथे सुनावणी करण्यात येणार आहे. यावेळी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे, अखील चित्रे संतोष धुरी अंधेरी कोर्टात उपस्थित असतील.

  • 29 Dec 2020 12:00 PM (IST)

    मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक राज्यपालांच्या भेटीला, दोन मंत्र्यांच्या राजीनाम्यांची मागणी

    मुंबई : मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या 15 समन्वयकांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. या भेटीत ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचं काम मंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ करत असल्याची राज्यपालांकडे तक्रार करण्यात आली आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांना सांगून या दोन्ही नेत्यांचे राजीनामे घ्यावेत अशी मागणी या समन्वयकांनी केली आहे.

  • 29 Dec 2020 11:55 AM (IST)

    निर्यातबंदी उठताच कांद्याच्या दरामध्ये 500 रुपयांनी वाढ, शेतकरी सुखावला

    नाशिक : कांदा निर्यातीवरी बंदी उठताच कांद्याचे दर 400 ते 500 रुपयांनी वाढले आहेत. नाशिक बाजार समितीत कांद्याला प्रतीक्विंटल 2800 रुपये भाव मिळाला आहे. तर येथे कांद्याचा सरासरी भाव 2000 रुपये मिळाल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. केंद्र सरकारने काल कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेतल्याने ही भाववाढ झाली आहे.

  • 29 Dec 2020 11:13 AM (IST)

    मेट्रो कारशेड संदर्भात नवीन समितीच्या शिफारशीनुसार निर्णय

    मुंबई : बिकेसीच्या कारशेड संदर्भात अद्याप कोणताही प्रस्तावपुढे आलेला नाही. तसेच बीकेसीच्या जागेवर कारशेड व्हावं अशी कोणतीही शिफारस आलेली नाही. त्यामुळे कारशेड संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. पर्यावरणवाद्यांनीही बीकेसीॉची जागा अनुकूल असु शकते, असे सांगितले होते. त्यामुळे आता नव्या समितीने केलेल्या शिफारशीनुसारच मेट्रो कारशेडवर निर्णय होणार आहे.

  • 29 Dec 2020 11:09 AM (IST)

    बिबट्या विहिरीत पडल्यामुळे खबळबळ, वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन

    सिंधुदुर्ग : वेंगुर्ले म्हापण येथे एका विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची घटना घडली. सुरेश चव्हाण यांच्या राहत्या घरालगत असणाऱ्या विहिरीमध्ये बिबट्या पडला होता. ही विहीर 40 फूट खोल असून वनविभागाने या बिबट्याला यशस्वीरित्या बाहेर काढले आहे.

  • 29 Dec 2020 11:09 AM (IST)

    ब्रिटनहून परतलेल्या महिलेला कोरोना, मुंबईत उपचार सुरु

    रायगड : ब्रिटनहून परतलेल्या एका महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाबाधित महिला आणि तिचा पती दोघे मूळचे खारघर येथील आहेत. मुंबईत गेल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीमध्ये पतीचा अहवाल निगेटिव्ह तर पत्नीचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. दरम्यान, कोरोनाबाधित महिलेवर मुंबईमध्ये उपचार सुरु आहेत. बाधित महिलेला कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण झाली आहे का?, याची तपासणी केली जाणार आहे.

  • 29 Dec 2020 10:35 AM (IST)

    देवी भराडीमातेचा यात्रोत्सव 6 मार्चला, कोरोनामुळे यात्रा साध्या पद्धतीने

    सिंधुदुर्ग : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवी भराडीमातेची यात्रा साध्या पद्धतीने होणार आहे. ही यात्रा येत्या 6 मार्चला भरणार आहे. 6 मार्चला भरणारा यात्रोत्सव फक्त आंगणे कुटुंबियाच्या उपस्थितीत होणार आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणाहून श्री देवी भराडीमातेचे दर्शन घ्यावे असे आवाहन आंगणे कुटुंबीयांनी केले आहे.

  • 29 Dec 2020 10:29 AM (IST)

    ज्यांच्याकडे लपवण्यासारखं काही असतं ते भाजपमध्ये जातात : राऊत

    आमच्याकडे लवण्यासारखे काही नाही. ज्यांच्याकडे लपवण्यासारखं असतं ते भाजपमध्ये जातात. मी शिवसैनिक आहे. शिवसेनेतच राहणार. हे सरकार पाच वर्षे टिकणार : संजय राऊत

  • 29 Dec 2020 10:27 AM (IST)

    मला धमकावणारा अजून जन्माला आला नाही : राऊत

    कार्यालयात जाण्यासाठी दोन ते चार दिवसांचा वेळ मागणार आहे. आमच्याकडे लवण्यासारखं काही नाही. आम्ही मध्यमवर्गीय आहोत. मला धमकावणारा आजून जन्माला आला नाही. मला धमकावणारा राहणार नाही.

  • 29 Dec 2020 10:22 AM (IST)

    आम्ही कायद्याला मानतो, कायद्याचा आदर करतो: संजय राऊत

    देशात कायदा मोठा आहे. कायदा दबावाखाली असला तरी आम्ही कायद्याचा करतो.

  • 29 Dec 2020 09:57 AM (IST)

    राऊत यांच्या पत्नींनी ईडीला पत्र पाठवलं नाही, कार्यालयात जाण्यावरही निर्णय नाही

    मुंबई : राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी ईडीला अद्याप कोणतेही पत्र पाठवलेले नाही. तसेच ईडीच्या कार्यालयात जाण्याबाबात कोणताही निर्णय झालेला नाही अशी माहिती संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी दिली आहे. दरम्यान, ईडीच्या कार्यालयात जाण्याबाबत लवकरच निर्णय घेणार अससल्याचे त्यांनी सांगितले आहे.

  • 29 Dec 2020 09:15 AM (IST)

    रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेच्या अडचणींत वाढ, बोठेविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

    अहमदनगर : रेखा जरे खून प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. एका महिलेने ही तक्रार केली आहे. नोकरी घालविण्याची भीती घालून दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप या महिलेने बोठे याच्यावर केला आहे. तसेच नोकरी न दिल्याने वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित करून आपली बदनामी केल्याचा आरोपही या महिलेने केला आहे.

  • 29 Dec 2020 08:57 AM (IST)

    वर्षा संजय राऊत यांचे ईडीला पत्र, हजेरीसाठी अधिक वेळ देण्याची मागणी

    मुंबई : शिवसेना खासदर संजय राऊत यांच्या पत्नी ईडी कार्यालयात हजर राहणार नसल्याची माहिती. राऊत यांच्या पत्नींनी ईडीला कालच पत्र पाठवल्याची माहिती. राऊत यांच्या पत्नींनी हजर राहण्याठीची वेळ वाढवून मागितली आहे.

  • 29 Dec 2020 08:53 AM (IST)

    कर्नाटक विधानपरिषदेच्या उपसभापतींची आत्महत्या, राजकीय वर्तुळात खळबळ

    बंगळुरु : कर्नाटक विधानपरिषदेचे उपसभापती एस. एल धर्मगौडा यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांचा मृतहेह रेल्वे रुळावर सापडला. त्यांच्या आत्महत्येमुळे कर्नाटकमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, धर्मगौडा यांचा मृतदेह सापडलेल्या ठिकाणी एक सुसाईड नोट सापडल्याची माहिती आहे.

  • 29 Dec 2020 08:40 AM (IST)

    नागपूर मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने कंबर कसली; बैठका, भेटीगाठी सुरु

    नागपूर : आगामी मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. ही निवडणूक समोर ठेऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बैठाक आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणं सुरु केलं आहे. राष्ट्रवादी येथील मनपा निवडणूक स्वबळावर लढण्याच्या तयारीत असून काँग्रेसने सन्मानजनक जागा न दिल्यास सर्व जागा लढू असा इशार राष्ट्रवादीने काँग्रेसला दिला आहे.

  • 29 Dec 2020 08:34 AM (IST)

    विरारमधील साईनाथ नगर येथील वैष्णवी डोंगराला आग

    ठाणे : विरार पूर्वेकडील साईनाथ नगर येथील वैष्णवी डोंगराला आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग साडेदहाच्या सुमारास लागली आहे. आग मुद्दामहून लावली गेल्याचा संशय येथील नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, आग विझवण्याचे काम सुरु आहे.

  • 29 Dec 2020 07:55 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात नववर्षानिमित्त फटाके फोडण्यावर बंदी, कलम 144 लागू

    नागपूर : जिल्ह्यात नववर्षानिमित्त फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, संपूर्ण जिल्ह्यात कलम 144 लागू करणायत आले असून गर्दीवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. तसेच, नागपूर मनपा क्षेत्रात 5 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत कर्फ्यु लावण्यात आला आहे.

  • 29 Dec 2020 07:50 AM (IST)

    मुंबईसह उपनगरात पारा घसरला, किमान तापमान 14 अंशावर

    मुंबई : मुंबईसह (mumbai) ठाणे, नवी मुंबई सारख्या उपनगरांतील तापमानामध्ये घट झाली आहे. सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना तापमानातील हा बदल जाणवला. मुंबई हवामान खात्याने दिलेल्या ताज्या माहितीनुसार मुंबईमध्ये सध्या कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस असून किमान तापमान हे 14 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. मागील 48 तासांपासून तापनात हा चढउतार दिसून यतोय.

  • 29 Dec 2020 07:49 AM (IST)

    नापगुरात 170 जण विदेशातून परतले, 5 जणांना कोरोना

    नागपूर : नागपुरात महिनाभरात 170 प्रवाशी विदेशातून आले आहेत. मनपाच्या वैद्यकीय पथकाने यापैकी 52 जणांशी केला संपर्क आहे. मनपाने संपर्क केलेल्या एकूण 52 प्रवाशांपैकी 5 जण कोरोनाबाधित असल्याचे आढळले आहे. त्यामुळे इतरही प्रवासशांची तपासणी मनपाकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी मनपाकूडन प्रयत्न सुरु आहेत.

  • 29 Dec 2020 06:16 AM (IST)

    पालघर जिल्ह्यात एकूण 3 ग्रामपंचायतीच्या निवडणुका, येत्या 15 जानेवारीला मतदान

     

    पालघर : जिह्यात एकूण तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे. या 3 ग्रामपंचायतींमध्ये वसई ताल्युक्यातील पाली आणि सत्पाला तर पालघर ताल्युक्यातील सेगवाया ग्रामपंचायतींचा समावेश आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे येथे स्थानिक पातळीवर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढणार की महाविकास आघाडी म्हणून ग्रामपंचायतींच्या निवडणुकीला सामोरे जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.