मुंबईसह महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला, दहा वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद

मुंबईत आज किमान तापमान १८.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. जे गेल्या दहा वर्षांतील नोव्हेंबर महिन्यातील सर्वात कमी तापमान आहे. सध्या या गुलाबी थंडीचा मुंबईकर आनंद घेत आहेत.

मुंबईसह महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला, दहा वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद
महाराष्ट्र गारठला
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 8:57 AM

Mumbai Maharashtra Temperature Cold : राज्यात सध्या थंडीचा जोर चांगलाच वाढल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यातील तापमान 10 अंशांच्या खाली नोंदवण्यात येत आहे. मुंबईसह उपनगरातही थंडीची तीव्रता वाढत चालली आहे. मुंबईत आज किमान तापमान १८.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. मुंबईतील हे तापमान गेल्या दहा वर्षांतील नोव्हेंबर महिन्यातील सर्वात कमी तापमान आहे. सध्या या गुलाबी थंडीचा मुंबईकर आनंद घेत आहेत.

मुंबईसह ठाणे, डोंबिवली, कल्याण तसेच पश्चिम उपनगरात गारठा वाढला आहे. मुंबईत बहुतांश ठिकाणी 16 अंशापेक्षा कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी तर तापमानात आणखी घट झाली आहे. तर कुलाब्यात 20 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. मुंबईतील थंडीची तीव्रता पुढील दोन दिवस कायम राहणार आहे. सध्या मुंबईत सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे. मुंबईतील दृष्यमानताही कमी झाली आहे.

मुंबईत यापूर्वी २०१६ मध्ये नोव्हेंबरमध्ये १६.३ अंश सेल्सिअस हे सर्वात कमी तापमान नोंदवले गेले होते. मुंबईत पुढील दोन दिवस तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत दिवसभराचे तापमान सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे मुंबईकरांसाठी दुपारही आल्हाददायक ठरत आहे. आजही मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३ अंश आणि १८ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

थंडी वाढण्याचे कारण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या उत्तर दिशेकडून थंड वारे वाहत आहेत. या वाऱ्यांमुळे वेळेआधीच थंडी महाराष्ट्रात दाखल झाली आहे. त्यातच बंगालच्या उपसागरात ३ डिसेंबरनंतर वातावरण बदलणार आहे. त्यानंतर थंडी कमी होण्याची शक्यता आहे. शनिवारपासून बंगालच्या उपसागरामध्ये दबाव निर्माण होईल आणि वातावरण गरम होईल. त्यामुळे मुंबईत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

महाबळेश्वर, लोणावळ्यापेक्षा पुण्यात कमी तापमान

सध्या महाबळेश्वर, लोणावळ्यापेक्षा पुण्यातील कमी तापमान नोंदवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात थंडीचा जोर वाढला आहे. महाबळेश्वर आणि लोणावळा ही थंड हवेची ठिकाणे म्हणून प्रसिद्ध आहेत. मात्र, सध्या तेथील तापमानापेक्षा पुण्यातील तापमान कमी आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार शुक्रवारी पुण्यात ९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर, महाबळेश्वर येथे १०.५, लोणावळा येथे १७.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. लोणावळा आणि महाबळेश्वर थंड हवेची ठिकाणे म्हणून प्रसिद्ध असली, तरी पुण्यातील तापमान लोणावळा आणि महाबळेश्वरपेक्षा कमी असल्याचे दिसून येत आहे.

पुण्यात सलग तीन दिवस एक आकडी तापमान नोंदवण्यात आले आहे. पुण्यातील शिवाजीनगर परिसरात ९.५ अंश सेल्सिअस हे यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचे निचांकी तापमान ठरले आहे. तसेच, गेल्या चार वर्षांत नोव्हेंबरमध्ये यंदा पहिल्यांदाच सलग तीन दिवस एक आकडी तापमान नोंदवले गेले आहे.

तोरणमाळ परिसरात पर्यटकांची गर्दी

पुण्यासह नंदुरबारमधील सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये तापमानात घट झाली आहे. तोरणमाळ परिसरात तापमान 10 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. थंडीसोबत दाट धुकंही पाहायला मिळत आहे. वीकेंड निमित्त गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी तोरणमाळ परिसरात पर्यटकांची हजेरी पाहायला मिळत आहे.

कोकणात धुक्याची चादर

मुंबई, पुणे पाठोपाठ कोकणातही गुलाबी थंडी पडली आहे. अनेक ग्रामीण भागात सध्या धुक्याची चादर पसरली आहे. यामुळे कोकणातील निसर्गाला चार चाँद लागले आहे. कोकणातील अनेक खेडेगाव धुक्यात हरवली आहेत. कोकणात तापमानाचा पारा हा १७ अंशावर खाली उतरला आहे. त्यामुळेच रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात निसर्ग खुललं आहे. नदीच्या किनारी धुक्याची चादर पसरली आहे. उंचच उंच डोंगर सुद्धा या धुक्याच्या कुशीत गेल्यासारखे वाटत आहे. तापमानाचा पारा घसरल्याने कोकणातल्या अनेक नदींच्या किनारी धुकं पाहायला मिळत आहे. बावनदी इथल्या नदीकाठी निसर्गाचं जणू नंदनवनच पाहायला मिळत आहे.

पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.