अधिवेशनाआधी सर्वात मोठी बातमी : मराठा समाजाला इतके टक्के आरक्षण मिळणार

Maharashtra State Backward Class Draft Assembly Session Maratha Aarakshan Adhiveshan 2024 : राज्य मागासवर्गाचा मसुदा टीव्ही 9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह... या मसुद्यात नेमक्या काय तरतुदी आहेत? मराठा समाजाला किती टक्के आरक्षण मिळणार? विशेष अधिवेशनाआधीची सगळ्यात मोठी बातमी...

अधिवेशनाआधी सर्वात मोठी बातमी : मराठा समाजाला इतके टक्के आरक्षण मिळणार
Follow us
| Updated on: Feb 20, 2024 | 11:25 AM

गिरीश गायकवाड, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 20 फेब्रुवारी 2024 : आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी… मराठा समाजाला किती टक्के आरक्षण द्यायचं याबाबतचा निर्णय झाल्याची माहिती आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10 आरक्षण मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मराठा समाजाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाने जे सर्वेक्षण केलं. त्याबाबत राज्य मागासवर्ग आयोगाने अहवाल तयार केला आहे. या अहवालात 10 टक्के आरक्षण देण्याचा उल्लेख आहे. या अहवालाचा मसुदा टीव्ही 9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह तुम्ही पाहत आहात.

राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील महत्वाच्या बाबी

मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाने तयार केलेल्या मसुद्यात महत्वाच्या बाबी जाणून घेऊयात… या मसुद्यातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्या मागास असल्याचा या मसुद्यात उल्लेख आहे. राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळणार आहे. राज्यातील शिक्षण संस्थांच्या प्रवेशासाठी आरक्षण मिळणार आहे.

मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचा राज्य मागासवर्गाच्या मसुद्यात उल्लेख आहे. मराठा समाजातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी स्वतंत्रपणे आरक्षण राखून ठेवलं आहे. 80 टक्के मराठा समाज आरक्षणासाठी पात्र असल्याचा या मसुद्यात उल्लेख आहे. राज्याच्या लोकसंख्येपैकी मराठा समाजाची लोकसंख्या 28 टक्के आहे. राज्य सरकारी नोकरी आणि शिक्षण संस्थांच्या प्रवेशासाठी आरक्षण देण्यात येणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक

मराठा आरक्षणासाठी बोलावलेल्या विशेष अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बैठक बोलावली होती. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थित होते. तर चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई, तानाजी सावंत, सुरेश खाडे, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, संदिपान भुमरे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, छगन भुजबळ, दादा भुसे हे मंत्री या बैठकीला उपस्थित होते. यावेळी राज्य मागासवर्ग आयोगाने तयार केलेला अहवाल मांडला गेला. मराठा समाजाला कसं आरक्षण देता येईल?, यावर चर्चा झाली.

Non Stop LIVE Update
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.