शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी मविआचं ‘जोडो मारो’ आंदोलन; परवानगी नसतानाही आज रस्त्यावर उतरणार

Mahavikas Aghadi Jode Maro Andolan at Mumbai : मुंबईत आज 'जोडो मारो आंदोलन' केलं जाणार आहे. महाविकास आघाडीकडून हे आंदोलन केलं जाणार आहे. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. वाचा सविस्तर बातमी...

शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी मविआचं 'जोडो मारो' आंदोलन; परवानगी नसतानाही आज रस्त्यावर उतरणार
महाविकास आघाडीImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Sep 01, 2024 | 8:06 AM

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. डिसेंबर 2023 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं. पण उद्घाटनानंतर आठच महिन्यात हा पुतळा कोसळला. त्यावरून महाराष्ट्रभर ढवळून निघाला आहे. लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. विरोधी पक्षानेदेखील आक्रमक भूमिका घेतली आहे. आज मुंबईमध्ये महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात ‘जोडो मारो आंदोलन’ करणार आहे. हुतात्मा स्मारक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत होणाऱ्या या मोर्चाला पोलीसांनी परवानगी दिलेली नाही. मात्र तरिही पुतळा कोसळलं हा शिवरायांचा अपमान आहे. महाराष्ट्र हा अपमान खपवून घेणार नाही, म्हणत महाविकास आघाडी मोर्चा काढण्यावर ठाम आहे.

मविआचं ‘जोडो मारो’ आंदोलन

आज सकाळी 11 वाजता हुतात्मा स्मारकाला वंदन करून मविआच्या आंदोलनाची सुरुवात होणार आहे. तर गेट वे ऑफ इंडिया समोर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत या मोर्चाचा समारोप होईल. सरकारला जोडे मारो आंदोलन महाविकास आघाडी करणार आहे. यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्या सह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित असणार आहेत.

मविआचं आंदोलन कशासाठी? मागण्या काय?

मालवणमध्ये असणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी महाविकास आघाडी रस्त्यावर उतरणार आहे. शिवरायांच्या पुतळ्यात सरकारने भ्रष्टाचार झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे. शिवरायांचा पुतळा तयार करणारा शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. आपटेला पुतळ्याचं कंत्राट कुणी दिलं? याचा खुलासा करण्याची मागणी महाविकास आघाडीची आहे. गेट वे ऑफ इंडिा समोर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा समोर नतमस्तक होऊन माफी मागितली जाणार आहे.

छत्रपती संभाजीनगरात आज पुन्हा भाजप आणि महाविकास आघाडी आमने सामने येण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी महाविकास आघाडीकडून सरकारला ‘जोडे मारो आंदोलन’ केलं जात आहे. तर भाजप महाविकास आघाडीच्या विरोधात जोरदार आंदोलन करणार आहे. भाजप आणि महाविकास आघाडीचे क्रांती चौकात एकाच वेळी आंदोलन करणार आहेत. आज पुन्हा एकदा भाजप आणि महाविकास आघाडीत राडा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात आणि शहरात पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.