मुंबईचा महापौर आपल्याशिवाय बसू शकत नाही, काँग्रेस नेत्याचा शिवसेनेला इशारा?

येत्या काळात जिल्हानिहाय वॉर्ड ऑफिस कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे. मुंबईत काँग्रेसचा विस्तार झाला पाहिजे. | Aslam Shaikh

मुंबईचा महापौर आपल्याशिवाय बसू शकत नाही, काँग्रेस नेत्याचा शिवसेनेला इशारा?
MCGM Recruitment 2021
Follow us
| Updated on: Dec 28, 2020 | 1:23 PM

मुंबई: आगामी काळात मुंबईचा महापौर काँग्रेसच्या मदतीशिवाय बसू शकत नाही, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी केले. अस्लम शेख यांचे हे विधान शिवसेनेसाठी अप्रत्यक्ष इशारा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. (Aslam Shaik on BMC Election and Mumbai Mayor)

अस्लम शेख यांनी सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, आगामी काळात काँग्रेसच्या मदतीशिवाय मुंबईचा महापौर बसू शकत नाही. येत्या काळात जिल्हानिहाय वॉर्ड ऑफिस कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे. मुंबईत काँग्रेसचा विस्तार झाला पाहिजे. अन्यथा मला पाच वर्षे मंत्रिपदावर राहण्याचा हक्क नाही, असे अस्लम शेख यांनी म्हटले.

भाजप आणि शिवसेनेतील द्वंद्वामुळे मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजप नेत्यांची बैठक पार पडली होती. त्यावेळी मुंबई महानगरपालिकेवर काही करून भगवा फडकावयचाच, असा निर्धार भाजपने व्यक्त केला होता. त्यानंतर शिवसेनेकडूनही स्थानिक नेत्यांना पालिका निवडणुकीच्यादृष्टीने कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले होते.

काँग्रेसकडूनही मुंबईत संघटनात्मक बदल

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्यादृष्टीने काँग्रेसकडून मुंबईत संघटनात्मक बदल करण्यात आले होते. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी (Mumbai Congress President) विधान परिषदेचे आमदार भाई जगताप (Bhai Jagtap) यांची निवड करण्यात आली होती. तर कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी चरण सिंग सप्रा यांची नियुक्ती केली आहे. प्रचार समितीच्या प्रमुखपदी मोहम्मद आरिफ नसीम खान यांची निवड केली. समन्वय समितीच्या प्रमुखपदी डॉ. अमरजित सिंग मनहास यांची नियुक्ती झाली होती.

संबंधित बातम्या:

भाजप येणार, मुंबई घडवणार, मुंबई जिंकण्यासाठी भाजपने रणशिंग फुंकलं

मुंबई महापालिका निवडणुकीत ‘बिहार पॅटर्न’?, शेलारांचे संकेत; शिवसेनेसाठी धोक्याची घंटा

आशिष शेलारांनी महापालिका निवडणुकीचं शंख फुंकलं, BMC वर झेंडा फडकवण्याची तयारी सुरु

(Aslam Shaik on BMC Election and Mumbai Mayor)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.