महापौर किशोरी पेडणेकर यांची तब्येत अचानक बिघडली; छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. छातीत दुखू लागल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Mayor Kishori Pednekar)

महापौर किशोरी पेडणेकर यांची तब्येत अचानक बिघडली; छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल
किशोरी पेडणेकर, महापौर,मुंबई
Follow us
| Updated on: Jul 18, 2021 | 5:17 PM

मुंबई: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. छातीत दुखू लागल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महापौरांच्या कार्यालयातून तशी माहिती देण्यात आली आहे. (Mumbai Mayor Kishori Pednekar admitted to hospital due to chest pain: BMC)

किशोरी पेडणेकर यांना काल रात्रीपासूनच त्रास होत होता. छातीत दुखू लागल्याची तक्रार त्यांनी केली होती. मात्र, हा त्रास अधिक वाढल्याने आज सकाळी त्यांना ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना रुग्णालयात दाखल करताच तातडीने विविध चाचण्या करण्यात आल्या. डॉक्टरांचं एक पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं. मात्र, त्यांना नेमका काय त्रास होत आहे आणि त्यांना कधीपर्यंत डिस्चार्ज होईल याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही.

अॅक्टिव्ह महापौर

महापौर किशोरी पेडणेकर या सर्वात अॅक्टिव्ह महापौर म्हणून ओळखल्या जातात. कोविड संकट काळात त्यांनी स्वत: रुग्णालयांना भेटी देऊन रुग्णालयीन व्यवस्थेची पाहणी केली होती. स्वत: नर्स असल्याने त्यांनी रुग्णांची सेवा करण्याची तयारीही दर्शवली होती. तसेच अनेक बैठका घेऊन आणि तातडीने उपाययोजना करून त्यांनी मुंबईतील कोरोना संख्या नियंत्रणात आणली. डॉक्टरांचं मनोबल उंचावण्यापासून ते रुग्णांच्या भेटीगाठी घेण्यासह अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचं कामही त्यांनी या काळात केलं आहे. मुंबईत कोणतीही घटना घडल्यास पेडणेकर स्वत: त्या ठिकाणी हजर असतात. कामाची व्यस्तता, सततची धावपळ आणि दगदग यामुळेही त्यांची प्रकृती बिघडली असावी असं सांगण्यात येतं. (Mumbai Mayor Kishori Pednekar admitted to hospital due to chest pain: BMC)

संबंधित बातम्या:

भागवत कराड आणि देवेंद्र फडणवीस भेटीत काय घडलं?, हास्यविनोद ते गंभीर चर्चा; ‘हे’ चार फोटो काय सांगतात?

Mumbai Landslide : चेंबूर दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी, पाहा संपूर्ण यादी

Mumbai Rains : नवी मुंबईत मुसळधार पाऊस,12 तासात 200 मीमी पावसाची नोंद

(Mumbai Mayor Kishori Pednekar admitted to hospital due to chest pain: BMC)

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....