VIDEO : किशोरी पेडणेकरांचं मिशन झिरो, विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांची कानउघडणी

किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना चांगलंच खडसावलं आहे. (Kishori Pednekar Distribute masks)

VIDEO : किशोरी पेडणेकरांचं मिशन झिरो, विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांची कानउघडणी
किशोरी पेडणेकर
Follow us
| Updated on: Feb 21, 2021 | 12:07 AM

मुंबई : राज्याची राजधानी असलेल्या मुंबईला पुन्हा कोरोनाचा विळखा बसू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मात्र तरीही काही सर्वसामान्य नागरिकांकडून कोरोना नियमावलीचे पालन केले जात नाही. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना चांगलंच खडसावलं आहे. (Mumbai Mayor Kishori Pednekar Distribute masks to citizens)

गेल्या काही दिवसांपासून राज्यात काही विभागात कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. महापौर पेडणेकर यांनी आज संध्याकाळी दादर पश्चिमच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळ अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी रस्त्यावर विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना मास्कचे वाटप केले.

नागरिकांनी मास्क वापरणे, हात धुणे तसेच सामाजिक अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा वापर करणे गरजेचे झाले आहे. पण तरीही काही नागरिक विना मास्कचा मुक्तपणे वावर करीत आहे. तर काही नागरिक मास्क वापरतांना नाकाखाली तसेच गळ्याभोवती गुंडाळलेल्या अवस्थेत घालतात. अशाप्रकारे मास्कचा वापर करणे चुकीचे आहे, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

kishori pednekar

किशोरी पेडणेकर

नागरिकांनी कोरोना नियंत्रणासाठी व्यवस्थितरित्या आणि नियमितपणे मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करा, असे महापौर म्हणाल्या. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे यंत्रणा कोरोना नियंत्रणासाठी जोमाने कामाला लागली आहे. या यंत्रणेला नागरिकांचे सहकार्य मिळणे तेवढेच गरजेचे असल्याचे महापौरांनी सांगितले. (Mumbai Mayor Kishori Pednekar Distribute masks to citizens)

मुंबईकरांसाठी काळजी केंद्र, महापौर पेडणेकरांचं मिशन झिरो

दरम्यान किशोरी पेडणेकर यांनी स्वतःच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घातली आहे. यापुढे कुठल्याच सार्वजनिक कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय महापौर पेडणेकर यांनी घेतला.  कोरोनाचं नव्याने वाढलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, सोशल डिस्टन्सिंगसाठी महापौरांनी हे पाऊल उचललं. इतकंच नाही तर 1 मार्चपासून नगरसेवकांना लस देण्यात येईल, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.

दरम्यान, आता गृह विलगीकरणात कुणाला न ठेवत आता आम्ही सर्वांना काळजी केंद्रात ठेवणार आहोत. तसंच परदेशातून येणारे आणि पळून जाणाऱ्या नागरिकांवर आम्ही गुन्हा दाखल केला जाणार आहे, असं महापौरांनी सांगितलं. (Mumbai Mayor Kishori Pednekar Distribute masks to citizens)

संबंधित बातम्या :

1 मार्चपासून नगरसेवकांना लस, स्वत:च्या कार्यक्रमांवर बंदी, मुंबईकरांसाठी काळजी केंद्र, महापौर पेडणेकरांचं मिशन झिरो

आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये विलगीकरण, महापौरांकडून हॉटेलची पाहणी

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.