VIDEO : जोर लगा के हईशा!, मुंबईच्या महापौरांनी रस्सीखेचमध्ये दाखवली ताकद
दक्षिण मुंबईतील डिलाइड रोड येथे भव्य रस्सीखेच स्पर्धा भरवण्यात आली आहे. येथील जागृती मंचाकडून या रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ना. म. जोशी मार्गावरील मुन्सिपल शाळेच्या आवारातील श्रमिक जिमखानाच्या प्रांगणात ही स्पर्धा पार पडत आहे. या स्पर्धेला महापौर किशोरी पेडणेकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.
मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष मोठ्या तयारीला लागले आहेत. राज्यातील सध्याच्या राजकारणाचे या निवडणुकीवर पडसाद उमटण्याची शक्यता आहे. भाजपने या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेचा धोबीपछाड करण्याचा डाव मांडला असताना शिवसेनेनाही मुंबईत आपली ताकद कायम असल्याचे दाखवून देणार आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी आज जणू याचीच प्रचिती आणून दिली. निमित्त होते, ते रस्सीखेच स्पर्धे (Competition)चे. प्रमुख पाहुणे म्हणून या स्पर्धेला उपस्थिती लावलेल्या महापौरांनी थेट रस्सी स्वतःच्या हातात घेतली आणि उपस्थितांना थक्क करून टाकले. (Mumbai Mayor Kishori Pednekar participated in the competition)
डिलाइड रोड येथे भव्य रस्सीखेच स्पर्धा
दक्षिण मुंबईतील डिलाइड रोड येथे भव्य रस्सीखेच स्पर्धा भरवण्यात आली आहे. येथील जागृती मंचाकडून या रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ना. म. जोशी मार्गावरील मुन्सिपल शाळेच्या आवारातील श्रमिक जिमखानाच्या प्रांगणात ही स्पर्धा पार पडत आहे. या स्पर्धेला महापौर किशोरी पेडणेकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. त्यानुसार महापौरांनी हजेरी लावलीच. पण त्याचबरोबर स्वतः सहभागी होत स्पर्धेचे आयोजक आणि सहभागी सर्व संघ व क्रीडारसिकांना आश्चर्याचा धक्का दिला. महापौर पेडणेकर यांनी आपली मुंबईच्या मातीशी व इथल्या मातीतील खेळांशी घट्ट बांधिलकी असल्याचे यावेळी दाखवून दिले. या स्पर्धेत एकूण ६० संघांनी सहभाग घेतला आहे.
महापौरांच्या उत्साहाला उपस्थितांकडून दाद
महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर उपस्थित सर्व लोकांनी महापौरांना उत्स्फूर्त दाद दिली. महापौरांचा कमालीचा उत्साह यावेळी दिसून आला. खरंतर या स्पर्धेला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. मात्र महापौरांनी दाखवलेल्या या ताकदीमुळे त्यांनी जणू विरोधकांना आपण याच ताकदीने महापालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे संकेत दिले आहेत, अशी खुमासदार चर्चा आता रंगू लागली आहे. (Mumbai Mayor Kishori Pednekar participated in the competition)
इतर बातम्या
तेलंगणाचे मुख्यमंत्री ‘केसीआर’ उद्धव ठाकरेंच्या भेटीला; तिसऱ्या आघाडीच्या चर्चेला जोर!