Mumbai Metro 2A, metro 7 : मुख्यमंत्र्यांनी दाखवला मेट्रोला हिरवा झेंडा, पहिलं तिकीट काढून प्रवासही केला
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या हस्ते मुंबई मेट्रो 2A, (Mumbai Metro 2A) आणि मेट्रो 7 (Mumabi metro 7) या दोन्ही मार्गिकेचे उद्घाटन झाले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या.
मुंबई : आज गुढी पाडव्याला मुंबईकरांना मोठं गिफ्ट मिळालं आहे. कारण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या हस्ते मुंबई मेट्रो 2A, (Mumbai Metro 2A) आणि मेट्रो 7 (Mumabi metro 7) या दोन्ही मार्गिकेचे उद्घाटन झाले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या. ऐन उन्हाळ्यात ही मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत आल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मेट्रोला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याच मेट्रोतून प्रवास केला आहे. यावेळी पहिलं तिकीट काढून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रोत प्रवेश केला. यावेळी इतर मान्यवरही सोबत होते. यावेळी ही पहिली मेट्रो फुलांनी सजवण्यात आली होती. आरे कॉलनी ते कुरार स्थानकादरम्याने मुख्यमंत्र्यांनी हा प्रवास केला आहे.
नव्या मेट्रोचा मार्ग
मुख्यमंत्र्यांच्या प्रवासाचा व्हिडिओ
@CMOMaharashtra inaugurates #MetroLine 2A and 7. @AjitPawarSpeaksand @AUThackeray @mieknathshinde @AslamShaikh_MLA we’re also present for the event. These metro lines will reduce the burden of #MumbailocalTraina @MMRDAOfficial pic.twitter.com/nfC91Ozx8X
— Mayuresh Ganapatye (@mayuganapatye) April 2, 2022
किती वेळाने मेट्रो असणार?
या मेट्रोचं आज जरी उद्घाटन झालं असलं तरी उद्यापासून ही मेट्रो सर्वसामान्य मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे. या मार्गावर दर 11 मिनिटांनी मेट्रो सुटणार आहे. आरे आणि डहाणूकरवाडी स्थानकादरम्यान दररोज 150 मेट्रो फेऱ्या असतील.डहाणूकरवाडीहून पहिली ट्रेन सकाळी 6 वाजता आणि आरेहून पहिली ट्रेन सकाळी 6.30 वाजता सुटेल. तर शेवटची रात्री 9 वाजता सुटेल.आरेहून शेवटची मेट्रो रात्री 9.35 ची सुटेल, अशी माहिती देण्यात आली आहे.
अजित पवारांची भाजपवर टीका
अजित पवार यांनी यावेळी भाजपवर तोफही डागली आहे. कोणत्याही बॅनरबाजीला महत्व देण्याची गरज नाही, लोकांचं हीत महत्वाचे आहे. केलेलं काम सार्थकी लागलं आहे. अजूनही काही प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेत येत आहेत, अशी प्रतिक्रिया यावेळी अजित पवारांनी दिली आहे.
अनिल परब काय म्हणाले?
मुंबईकरांसाठी हे गुढी पाडव्याचंं महाविकास आघाडीकडून देण्यात आलेलं हे गिफ्ट आहे. अशी प्रतिक्रिया यावेळी अनिल परब यांनी दिली. तसेच श्रेयवादाबाबत विचरले असता आज गुढी पाडवा आहे. आज चांगला दिवस आहे. हा कुठलाही राजकीय कार्यक्रम नाही. त्यामुळे तुमच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेला गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देतो असेही अनिल परब म्हणाले.
sharad pawar on bjp: धर्माच्या नावावर माणसामाणसांमध्ये फूट पाडली जातेय; शरद पवारांचा हल्लाबोल
Nawab Malik : नवाब मलिक यांनी सुप्रीम कोर्टात मागितली दाद; ईडीच्या कारवाईला दिले आव्हान