मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. चार ते पाच फोन आल्याची माहिती आहे. पोलीस चौकशी करणार असल्याची माहिती आहे. हे सगळे फोन आजच आलेत. स्वातंत्र्यदिनी त्यांना असे धमकीचे फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अंबानी कुटुंब या प्रकरणी पोलिसात तक्रार देणार असल्याची माहिती आहे. डी. बी मार्ग पोलीस स्टेशन (D. B Marg Police Station) इथं ते तक्रार दाखल करणार असल्याची माहिती आहे. रिलायन्स हॉस्पिटलच्या (Reliance Hospital) लॅन्डलाईनवरून ही धमकी देण्यात आल्याची माहिती आहे. हे धमकीचे फोन करणारी व्यक्ती मनोरुग्ण असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मुकेश अंबानी आणि कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. चार ते पाच फोन आल्याची माहिती आहे. पोलीस चौकशी करणार असल्याची माहिती आहे. अंबानी कुटुंब या प्रकरणी पोलिसात तक्रार देणार असल्याची माहिती आहे. डी. बी मार्ग पोलीस स्टेशन इथं ते तक्रार दाखल करणार असल्याची माहिती आहे. रिलायन्स हॉस्पिटलच्या लॅन्डलाईनवरून ही धमकी देण्यात आल्याची माहिती आहे. हे धमकीचे फोन करणारी व्यक्ती मनोरुग्ण असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
अंबानींना धमकीचा फोन आल्यानंतर पोलीस अलर्ट झाले आहेत. त्यांनी रिलायन्स हॉस्पिटलमध्ये जात चौकशी केलीय. ज्या फोनवर फोन आणि ज्या व्यक्तीने फोन उचलला त्यांच्याकडून अधिक माहिती घेतली जात आहे. फोन करणारी व्यक्ती ही मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती असल्याचं पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलं आहे. पोलिसांनी चौकशी सुरू केली असून फोन करणारी व्यक्ती कोण याचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती आहे.
अंबानी यांना धमकीचे चार ते पाच फोन आले. या फोनची चौकशी सुरू करण्यात आली आहे. हे सगळे फोन आजच आलेत. स्वातंत्र्यदिनी त्यांना असे धमकीचे फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. येत्या तीन तासात अंबानी कुटुंबियांचा संपवणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांचं एक पथक रिलायन्स रुग्णालयात दाखल झालंय. या प्रकरणात रिलायन्स हॉस्पिटलच्या एका कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवला जात आहे.
“आम्हाला आठ फोन कॉल आले होते. आम्ही या धमकी देणाऱ्या फोन कॉलला दुर्लक्ष न करता गांभीर्यानं घेतलं असून फोन करणाऱ्या व्यक्तीबाबत चौकशी केली जाईल. फोन कॉलची माहिती पोलिसांना तात्काळ दिली. रिलायन्स हॉस्पिटलच्या सुरक्षा रक्षकांनाही याची माहिती देण्यात आली आहे”, असं पॉस्पिटल प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आलं आहे.