मुंबई आयुक्त इकबाल सिंह चहल यांची ‘फेम इंडिया 2020’ मध्ये निवड, कोरोनाकाळातील उत्तम कामगिरीची दखल

आयुक्त इकबाल सिंह चहल यांची 'फेम इंडिया 2020' मध्ये निवड करण्यात आली आहे. देशातील 50 प्रभावशाली सनदी अधिकाऱ्यांची यामध्ये निवड केली जाते.

मुंबई आयुक्त इकबाल सिंह चहल यांची 'फेम इंडिया 2020' मध्ये निवड, कोरोनाकाळातील उत्तम कामगिरीची दखल
Follow us
| Updated on: Oct 18, 2020 | 8:41 AM

मुंबई : मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या कार्याची पुन्हा एकदा दखल घेण्यात आली आहे. आयुक्त चहल यांची ‘फेम इंडिया 2020’ मध्ये निवड करण्यात आली असून देशातील 50 प्रभावशाली सनदी अधिकाऱ्यांच्या पंक्तीत बसण्याचा बहुमान चहल यांना मिळाला आहे. कोरोना महामारीच्या काळात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे त्यांना हा बहुमान प्राप्त झाला आहे. सप्टेंबर महिन्यात त्यांना ‘आयएसीसी कोव्हिड क्रुसेडर 2020’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची आता ‘फेम इंडिया 2020’ मध्ये निवड झाली आहे.   (Mumbai Municipal Commissioner Iqbal Singh Chahal selected in Fame India 2020)

मुंबई आयुक्त इकबाल चहल यांनी कोरोना महामारीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाला थोपवण्यासाठी त्यांनी ‘चेस द व्हायरस’ ही मोहीम प्रभावीपणे राबवली. या मोहिमेत त्यांनी टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रॅकिंग, ट्रि‍टमेंट आणि क्‍वारंटाईन ही पंचसूत्री अवलंबून प्रत्‍यक्ष काम केले. तसेच, मुंबईतील सर्व आरोग्‍य यंत्रणा, डॉक्‍टर्स, लोकप्रतिनिधी, खासगी दवाखाने, नर्सिंग होम, स्‍वयंसेवी संस्‍था यांच्यात समन्वय साधत मुंबईत कोरोना संसर्ग नियंत्रणात आणला. त्यांच्या या कामगिरीचे केंद्र सरकार, जागतिक आरोग्य संघटना, तसेच जागतिक बँकेनेही कौतुक केले.

धारावी पॅटर्न जगासाठी रोल मॉडेल

मुंबईत धारावीसारख्या झोपडपट्टीबहुल भागात कोरोनाचा प्रसार मोठा प्रमाणात होत होता. त्यावेळी चहल यांनी कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. मोठ्या प्रमाणात टेस्टिंग तसेच ट्रेसिंग केल्याने धारावी येथे कोरोना संसर्ग आटोक्यात आला. त्यांच्या या कार्याचीही दखल घेण्यात आली होती. इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्समार्फत आयएसीसी कोव्हिड क्रुसेडर 2020 – एक्झेम्प्लरी वर्क डन बाय ए ब्युरोक्रॅटस्‌ – इंडिया या संवर्गामध्ये आयुक्त चहल यांना सप्टेंबर महिन्यात पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर आता चहल यांची ‘फेम इंडिया 2020’ मध्ये निवड झाली असून त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. दरम्यान, इकबाल सिंह चहल यांना मिळालेल्या या बहुमानामुळे त्यांचे सर्वत्र कोतुक होत आहे.

संबंधित बातम्या : Unlock | मुंबई महापालिकेकडून अनलॉकची नवी नियमावली, दुकानं-हॉटेल्सच्या वेळेत वाढ

महापौर विरुद्ध आयुक्त वादाला आता नवं वळण; आक्रमक भूमिकेवरुन शिवसेनेतच दुही

बीएमसीच्या ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेत सहभागी व्हा, सिनेकलाकार, साहित्यिकांचं आवाहन

(Mumbai Municipal Commissioner Iqbal Singh Chahal selected in Fame India 2020)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.