खाडी, समुद्र प्रदूषित, राष्ट्रीय हरित लवादाकडून मुंबई महापालिकेला 30 कोटींचा दंड
खाडी, समुद्र प्रदूषित केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेला 30 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे.
मुंबई : खाडी, समुद्र प्रदूषित केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेला 30 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे (Mumbai Municipal Corporation fined). मुंबई शहरातील सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया न करणे, सांडपाण्यातून घनकचरा, प्लास्टिक समुद्रात, खाडीत मिसळणे, यामुळे पर्यावरणाची हानी झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाने (National Green Tribunal) नुकताच मुंबई महापालिकेला तब्बस 29.75 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे (Mumbai Municipal Corporation fined).
वनशक्ती या पर्यावरण क्षेत्रातील संस्थेचे डी. स्टालिन यांनी 2018 मध्ये राष्ट्रीय हरित लवादामध्ये या संदर्भात याचिका केली होती. शहरातून समुद्रात, खाडीत अनेक ठिकाणी प्रक्रिया न करता सांडपाणी सोडले जात असल्याने पाण्याचे प्रदूषण वाढल्याबद्दल ही याचिका होती.
गेली दोन वर्षे याबाबत लवादाने विविध मुद्दे वेळोवेळी नोंदवले आहेत. तसेच, विविध तज्ज्ञांच्या अहवालांचा त्यासाठी आधार घेण्यात आला. शहरातून रोज समुद्रात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यापैकी 25 टक्के पाणी प्रक्रिया न करताच सोडले जात असल्याचा व्हीजेटीआयच्या अहवालाचा आधार लवादाने घेतला.
सांडपाणी समुद्रात सोडणाऱ्या 85 ठिकाणी पालिकेने पाण्यावर योग्य ती प्रक्रिया करण्याची गरज नमूद केली. ही प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत दर महिन्याला 4.25 कोटी रुपयांचा दंड केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळास भरण्याचा आदेश दिला आहे.
तसेच, आतापर्यंत झालेल्या हानीबद्दल 29.75 कोटी रुपयांचा दंड भरण्यासाठी लवादाच्या निर्णयापासून 30 दिवसांचा अवधी दिला आहे.
Kangana Ranaut | कंगना रनौत विरुद्धच्या खटल्यासाठी मुंबई महापालिकेकडून 82 लाखांचा खर्चhttps://t.co/UnFakspcK0@KanganaTeam @mybmc #KanganaRanaut
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 28, 2020
Mumbai Municipal Corporation fined
संबंधित बातम्या :
मुंबईत 99 हजार फेरीवाल्यांचे जागेसाठी अर्ज, 15 हजार फेरीवाल्यांना हक्काची जागा मिळणार