दहिसर पश्चिम ते भाईंदर पश्चिम जोडणाऱ्या 45 मीटर रुंदीच्या एलिवेटेड रोडचे टेंडर निघाले, मुंबई कोस्टल रोडचा शेवटचा टप्पा सुरु

मुंबई महानगर पालिकेने या योजनेची माहीती आपल्या ट्वीटर हॅण्डलवर दिली आहे. मुंबई कोस्टल रोड योजनेचा हा अंतिम टप्पा असून यामुळे मुंबईकरांना दहीसर ते भाईंदर चांगला शॉर्टकट उपलब्ध होणार आहे.

दहिसर पश्चिम ते भाईंदर पश्चिम जोडणाऱ्या 45 मीटर रुंदीच्या एलिवेटेड रोडचे टेंडर निघाले, मुंबई कोस्टल रोडचा शेवटचा टप्पा सुरु
Dahiser west to Bhayandar west (1)Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jul 25, 2023 | 10:33 PM

मुंबई | 25 जुलै 2023 : मुंबईचे शेवटचे टोक समजले जाणाऱ्या दहिसरला भाईंदरशी जोडणारा एलिवेटेड रस्ता तयार करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने टेंडर काढले आहे. दहिसर पश्चिम ते भाईंदर पश्चिम असा 45 मीटर रुंदीचा हा एलिवेटेड उन्नत स्वरुपाचा मार्ग येत्या चार वर्षांत बांधण्याची मुंबई महानगर पालिकेची योजना आहे. या मार्गामुळे मुंबई ते अहमदाबाद महामार्गावरील वाहनांची गर्दी कमी होणार आहे.

मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचा शेवटचा टप्पा असलेल्या दहीसर पश्चिम ते भाईंदर पश्चिम या दोन टोकांना एलिवेटेड मार्गिकेने जोडण्याची मुंबई महानगर पालिकेची योजना आहे. या मार्गिकेसाठी मुंबई महानगर पालिकेने मागविलेल्या वित्तीय निविदांमध्ये सर्वात कमी बोली लार्सन एण्ड टुब्रोने लावली आहे. त्यामुळे लवकरच या मार्गाचे काम सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबई महानगर पालिकेचे ट्वीटर पाहा : –

मुंबई महानगर पालिकेने या योजनेची माहीती आपल्या ट्वीटर हॅण्डलवर दिली आहे. मुंबई कोस्टल रोड योजनेचा हा अंतिम टप्पा असून यामुळे मुंबईकरांना चांगली कनेक्टीविटी उपलब्ध होणार आहे. ही उन्नत स्वरुपाची मार्गिका चार वर्षांत बांधून तयार होणार आहे. सध्या वेर्स्टन एक्सप्रेस हायवे वगळता मीरा भाईंदरला बृन्मुंबई क्षेत्राशी जोडणाऱ्या दहीसर चेक नाक्यावरुन पाच किमीच्या प्रवासाला सुमारे अर्धा तास लागतो. मुंबई ते अहमदाबाद हायवे पश्चिम उपनगर आणि मीरा-भाईंदरसाठी जोडणारा एकमेव मार्ग आहे.

मुंबई ते अहमदाबाद हायवेची गर्दी कमी होणार 

मुंबई ते अहमदाबाह हायवे राष्ट्रीय महामार्ग असल्याने त्यावर सतत वाहनांची वर्दळ सुरु असते. नवा एलिवेटेड मार्ग तयार झाल्यास मुंबई ते अहमदाबाद मार्गावरील ट्रॅफिकचा भार कमी होण्यास मदत होणार आहे. दहिसर पश्चिमेचा भाग या मार्गाने भाईंदर येथील पश्चिम बाजूस जोडला गेल्यास मुंबई ते अहमदाबाद महामार्गावरील गर्दी कमी होईल मुंबई महानगर पालिकेने म्हटले आहे.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.