मुंबई महानगर पालिका स्कायवॉकवर दिवाबत्ती लावणार

मुंबई महानगर पालीकेच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील स्कायवॉकवर रोषणाई करण्यात येणार आहे. त्यासाठी 79.68 कोटी रूपयांचा खर्च केला जाणार आहे. तर एकूण 1,705 कोटी रूपयातून मुंबईच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेतले आहे.

मुंबई महानगर पालिका स्कायवॉकवर दिवाबत्ती लावणार
BANDRA-WEST-SKYWALK-(29)Image Credit source: BANDRA-WEST-SKYWALK-(29)
Follow us
| Updated on: Jan 16, 2023 | 11:26 AM

मुंबई : मुंबई महानगर पालिकांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध स्कायवॉकचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. शहरातील सुशोभिकरणाचा भाग म्हणून तब्बल 79.68 कोटी रूपयांचा खर्च केला जाणार आहे. मुंबई महानगर पालिका जिंकण्याच्या धैय्याने भाजपाने शिवसेनेच्या शिंदे गटाच्या मदतीने जोरदार जाहिरातबाजी केली आहे. वर्तमान पत्रात त्यासाठी जाहिरातीचा रतीब घातला जात आहे. यात मुंबईतील स्काय वॉकच्या सुशोभिकरणाची योजना आखण्यात आली आहे. या योजनेनूसार स्कायवॉकची विविध गटात वर्गवारी करण्यात आली आहे. त्यानूसार ए, बी, सी आणि डी अशी वर्गवारी केली आहे.

बोरीवली, अंधेरी, गोरेगाव, सांताक्रुझ (पूर्व) , सांताक्रुझ (पश्चिम) , विलेपार्ले, घाटकोपर (पूर्व ), घाटकोपर (पश्चिम), भांडूप, सायन, कॉटनग्रीन, नानाचौक आणि वडाळा आदी स्कायवॉकवर दिवाबत्ती करण्यात येणार आहे.  इलेक्ट्रोकूल इंजिनिअरींग कंपनीने बोरीवली आणि अंधेरीतील स्कावॉक प्रकाशित करण्यासाठी ‘अ’ श्रेणीची निविदा जिंकली असून 20.52 कोटी रुपये (करासह) त्यासाठी खर्च केली जाईल. याच कंपनीने ‘डी’ श्रेणीसाठी कॉटन ग्रीन, नाना चौक आणि वडाळा येथील स्कायवॉक प्रकाशित करण्यासाठी रु. 17.14 कोटी (करासह) निविदा जिंकली आहे.

एएससी पॉवर प्रा.लि.या कंपनी बी आणि सी गटातील निविदा जिंकली असून बी गटात गोरेगाव, सांताक्रुझ आणि विलेपार्ले येथील स्कायवॉकचा 18.05 कोटीतून तर घाटकोपर, भांडुप, सायन या सी वर्गवारीच्या स्कायवॉकचे 18.52 कोटीतून सुशोभिकरण होणार आहे. या कंपन्या येत्या दोन महिन्यात हे काम संपविणार असून त्यांना तीन वर्षांचे मेन्टेनन्सचे कामही दिले आहे. 1,705 कोटी रूपयातून मुंबईच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेतले आहे. एलईडी स्ट्रीप लाईट, ट्यूब आणि फ्डल लाईट बसविण्यात येणार आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.