BMC Election | बहुप्रतिक्षित मुंबई महापालिका निवडणूक कोणत्या महिन्यात? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं!
Devendra Fadnavis on BMC Election | एएनआयच्या पॉडकास्टमध्ये बोलतांना देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणूक बद्दल मोठे वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूका का रखडल्या आणि निवडणूका केव्हा होतील, त्याबद्दल अंदाच व्यक्त केला आहे.
मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आणि काही राज्यापेक्षा अधिक महसूल जमा करणारी मुंबई महानगरपालिका गेल्या अनेक महिन्यांपासून लोकनियुक्त शासनापासून वंचित आहे. आधी कोरोना संकटामूळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका रखडल्या. त्यानंतर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे आला. त्यामुळे पुन्हा निवडणूका लांबणीवर पडल्या. त्यामुळे मुंबई महापालिकाच्या निवडणूका केव्हा होतील असा प्रश्न सर्वांनात पडला आहे. अशातच देवेंद्र फडणवीस यांनी ANI ला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत मुंबई महापालिका निवडणुकीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
उद्धव ठाकरे गटाने न्यायालयात दिलेल्या अनेक याचिकांमुळे निवडणूका लांबल्या आहेत. आमच्यावर आरोप केले जातात आम्ही निवडणूका लांबवल्या आहेत, यात काहीही तथ्य नाही. आम्ही निवडणूका लांबवल्या नाहीत. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणूका होतील, असा अंदाज देवेंद्र फडणवीस यांनी वर्तवला आहे.
निवडणूका लवकरात लवकर झाल्या पाहिजेत, असं माझ मत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकी संदर्भात एक याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यासोबतच उद्धव ठाकरे गटाने बऱ्याच याचिका न्यायालयात दाखल केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या सर्व याचिका एकत्र करून स्टेटस को दिला आहे. या स्टेटस को मुळे या निवडणूका होऊ शकल्या नाहीत. ज्यावेळी स्टेटस को हटवला जाईल आणि न्यायालय निकाल देईल त्यानंतर निवडणूका होतील, असंही फडणवीस म्हणाले.
No one can stop the release of that movie which has got censor certificate from the censor board and we will make sure it is not stopped. सेन्सॉर बोर्डाने ज्या चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र दिले आहे त्या चित्रपटांना प्रदर्शित होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही आणि आम्ही त्याला… pic.twitter.com/OMlQJr52s7
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 4, 2023
उद्धव ठाकरे प्रत्येक वेळी बोलतात निवडणुका का घेत नाहीत, तुम्हीच न्यायालयात याचिका दाखल करतात, त्या याचिका मागे घ्या. याचिका मागे घेतल्याने स्टेटस को हटेल, त्यामुळे लवकर निर्णय होईल आणि निवडणुका होतील. उद्धव ठाकरे आमच्यावर आरोप करतात, तुम्ही निवडणुका घ्यायला घाबरतात, पण निवडणुका घेणे आमच्या हातात नाही. माझ्या अंदाजाने ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये न्यायालयाचा निकाल येईल त्यानंतर लगेचच निवडणुका होणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.
मुंबई महापालिकेची स्थिती
मुंबई महानगरपारिकेत 2017 साली 227 वॉर्ड होते, त्यापैकी शिवसेनेला 84, भाजपला 82, काँग्रेस 31, राष्ट्रवादी काँग्रेस 9, मनसे 7 आणि इतर पक्षांना मिळून 14 जागा मिळाल्या होत्या. आता शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे यंदाचे मुंबई पालिकेचे समिकरण बदलले आहे. यंदा मुंबई पालिकेच्या निवडणुकीत अधिक चुरस असणार आहे.
भाजपचा मुंबईत 150 जागा जिंकण्याचा निर्धार
देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी मुंबई पालिकेच्या 150 जागा जिंकू असा नारा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हा नारा कायम असल्याचं म्हटलं आहे. हिंदुत्त्व हा आमचा मुद्दा नसून, ती आमची विचारधारा आहे. भाजप हिंदुत्त्ववादी आहे. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मतं मागतो, मुंबई महापालिका जिंकणारच असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी ANI च्या पॉटकास्टवर बोलताना व्यक्त केला.