हो नाही म्हणता म्हणता अखेर ठरलं; नवाब मलिक आज अर्ज दाखल करणार; कोणत्या पक्षाने दिला AB फॉर्म?

Nawab Malik Will File Application Today : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिवाजीनगर- मानखुर्द या विधानसभा मतदारसंघातून नवाब मलिक आज अर्ज दाखल करणार आहेत. त्यांना एबी फॉर्म देखील देण्यात आला आहे. वाचा सविस्तर बातमी...

हो नाही म्हणता म्हणता अखेर ठरलं; नवाब मलिक आज अर्ज दाखल करणार; कोणत्या पक्षाने दिला AB फॉर्म?
नवाब मलिक, नेते, राष्ट्रवादीImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Oct 29, 2024 | 12:22 PM

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवशी अखेर मुंबईतील शिवाजीनगर- मानखुर्द या विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब झालं आहे. शिवाजीनगर- मानखुर्द या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून त्यांना एबी फॉर्म देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे थोड्याच वेळात नवाब मलिक हे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बऱ्याच दिवसांनपासून सुरु असलेला नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबतचा खल आता थांबला आहे.

मलिकांच्या उमेदवारीला विरोध

नबाव मलिक यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचे आरोप आहेत. या आरोपांमुळे शिवसेना आणि भाजपकडून मलिकांच्या उमेदवारीला विरोध होता. त्यामुळे आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मलिकांच्या उमदेवारीबाबत निश्चितता नव्हती. मात्र आता अजित पवारांनी मलिकांना अखेर उमेदवारी दिल्याचं कळतं आहे. मलिकांकडे एबी फॉर्मदेखील पोहोचला आहे.

शिवाजीनगर- मानखुर्दमध्ये मैत्रीपूर्ण लढत?

शिवसेना शिंदे गटाकडून सुरेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. असं असताना आता मलिक आज अर्ज भरणार आहेत. कालच माध्यमांशी बोलताना कोणत्याही परिस्थितीत आपण निवडणूक लढणार असल्याचं मलिकांनी जाहीर केलं आहे. परिस्थिती निर्माण झाली तर आपण अपक्ष लढण्यास देखील तयार असल्याचं मलिकांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता अखेर अजित पवारांकडून मलिकांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे गट आणि नवाब मलिकांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार? की कुणी उमेदवारी अर्ज मागे घेणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

नवाब मलिक यांच्या उमेदवारीवरून महायुतीत मतभेद होते. नवाब मलिक यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचे आरोप होते. भाजपच्या नेत्यांनी अनेकदा नवाब मलिक यांच्यावर टीका केली होती. त्यांच्यावर आरोप केले होते. अजित पवार भाजपसोबत गेले. त्यानंतर नवाब मलिक यांना जेव्हा जामिन मिळाला. तेव्हा ते अजित पवार गटासोबत गेले. तेव्हापासूनच मलिकांनी महायुतीत येण्याचा शिंदे गट आणि विशेषत: भाजपचा विरोध होता. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्रदेखील लिहिलं होतं. मलिकांच्या विधानसभेच्या उमेदवारीलाही भाजपकडून कडाडून विरोध होता.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.