उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीच्या अजून एका बड्या नेत्याला रुग्णालयातून डिस्चार्ज

राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तटकरे यांनी स्वत: ट्वीट करुन ही माहिती दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीच्या अजून एका बड्या नेत्याला रुग्णालयातून डिस्चार्ज
उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी भल्या पहाटे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी बारामतीत पोहोचले.
Follow us
| Updated on: Nov 02, 2020 | 4:03 PM

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनावर मात केली आहे. आजच त्यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली आहे. आता अजित पवार यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तटकरे यांनी स्वत: ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. (NCP MP Sunil Tatkare get discharged from hospital)

कार्यकर्ते आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांचे ट्विटरवरुन आभार

“मला इस्पितळातून डिस्चार्ज मिळाला असून काही दिवस मी विलगीकरणात राहणार आहे. आपल्या शुभेच्छांमुळे प्रकृती उत्तम असून या काळात माझी काळजी घेणारे डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. या कोविड योद्ध्यांच्या सेवावृत्तीला व कार्याला माझा सलाम!” असं ट्वीट खासदार सुनील तटकरे यांनी केलं आहे.

सुनील तटकरे यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय आणि अन्य कर्मचाऱ्यांचेही आभार तटकरे यांनी ट्वीटद्वारे मानले आहेत.

मंगळवारी तटकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

सुनील तटकरे यांची सोमवारी कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील रुग्णालयात दाखल झालो आहे, असं तटकरे यांनी म्हटलं होतं.

संबंधित बातम्या:

अजित पवारांनंतर राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता कोरोना पॉझिटिव्ह

Ajit Pawar Corona Recovery | उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त, सुप्रिया सुळेंकडून डॉक्टरांसह कार्यकर्त्यांचे आभार

NCP MP Sunil Tatkare get discharged from hospital

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.