मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनावर मात केली आहे. आजच त्यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली आहे. आता अजित पवार यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तटकरे यांनी स्वत: ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. (NCP MP Sunil Tatkare get discharged from hospital)
“मला इस्पितळातून डिस्चार्ज मिळाला असून काही दिवस मी विलगीकरणात राहणार आहे. आपल्या शुभेच्छांमुळे प्रकृती उत्तम असून या काळात माझी काळजी घेणारे डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. या कोविड योद्ध्यांच्या सेवावृत्तीला व कार्याला माझा सलाम!” असं ट्वीट खासदार सुनील तटकरे यांनी केलं आहे.
मला इस्पितळातून डिस्चार्ज मिळाला असून काही दिवस मी विलगीकरणात राहणार आहे. आपल्या शुभेच्छांमुळे प्रकृती उत्तम असून या काळात माझी काळजी घेणारे डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. या कोविड योद्ध्यांच्या सेवावृत्तीला व कार्याला माझा सलाम!
— Sunil Tatkare (@SunilTatkare) November 2, 2020
सुनील तटकरे यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय आणि अन्य कर्मचाऱ्यांचेही आभार तटकरे यांनी ट्वीटद्वारे मानले आहेत.
सुनील तटकरे यांची सोमवारी कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील रुग्णालयात दाखल झालो आहे, असं तटकरे यांनी म्हटलं होतं.
काल माझी करोना चाचणी करण्यात आली असून, आज त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील इस्पितळात दाखल झालो आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन.#Covid_19
— Sunil Tatkare (@SunilTatkare) October 27, 2020
अजित पवारांनंतर राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता कोरोना पॉझिटिव्ह
NCP MP Sunil Tatkare get discharged from hospital