Mumbai News : कुर्ल्यात गोडाऊनला भीषण आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू
अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रय्तन सुरू आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कुर्ला | 28 सप्टेंबर 2023 : मुंबईत आगीचे सत्र सुरूच आहे. गुरूवारी पहाटेच्या सुमारास मुंबईतील कुर्ला येथील एका गोडाऊनला भीषण आग (fire at kurla) लागली. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या दहा गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीने प्रयत्न करत आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. सुदैवाने या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
#WATCH | A fire broke out at a scrap godown in Mumbai’s Kurla area. 10 fire tenders arrived on the spot: Mumbai Fire Brigade pic.twitter.com/BL8rot6bNb
— ANI (@ANI) September 28, 2023
दादर येथेही लागली होती आग
मुंबईत सध्या अनेक दिवसांपासून विविध ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडतच आहेत. गेल्या आठवड्यात दादर येथे एका इमारतीत आग लागून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. दादर पूर्वेकडील हिंदू कॉलनीतील एका 15 मजली निवासी इमारतीच्या 13व्या मजल्यावर शनिवारी सकाळी आग साडेआठच्या सुमारास ही आग लागली. आगीमुळे सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीचा श्वास गुदमरून ते बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने सायन रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सचिन पाटकर असे मृत व्यक्तीचे नाव असून ते 60 वर्षांचे होते.
( डिस्क्लेमर : ही बातमी अपडेट होत आहे.)