उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. “महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा देतो. महाराष्ट्रमध्ये विकास होईल अशी प्रार्थना करतो. काँग्रेसने आपल्यावर अन्याय केला आहे. काँग्रेस हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी जाहीरपणे सांगितलं होतं की ज्या दिवशी काँग्रेस सोबत जाण्याची वेळ माझ्यावर येईल, माझ्या शिवसेना नावाचं दुकान हे मी बंद करून टाकेन. आता बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला काय वाटत असेल? प्रॉपर्टीचे मालक उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे असतील. पण विचारांचे मालक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत”, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
“चुकीच्या गोष्टी आपल्याला सांगतात. काय सांगतात? महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला चालले? खरं म्हणजे महाराष्ट्राची ताकदच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांना माहिती नाही. या महाराष्ट्राची क्षमता काय आहे हे त्यांना माहित आहे का? मी त्यांना सांगतो, उद्धवजी ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये या सगळ्या लोकांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आलं तेव्हा मोदीजींचा आशीर्वाद होता. आम्ही 2015 पासून 2019 पर्यंत सातत्याने परकीय थेट गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आणण्याचे काम केलं. देशात आणि राज्यात काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा गुंतवणूकमध्ये चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर होता”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“तुम्ही गुंतवणूकबाबत अडीच तीन वर्ष रडत होते. माझा सवाल आहे, 25 वर्ष महानगरपालिका तुम्ही बोलाल तशी चालली, तुम्ही नेमकं काय दिलं? ते सांगा. या पंचवीस वर्षांमध्ये तुम्ही मुंबईला काय दिलं? मोदींचं राज्य आलं. मोदींनी स्टार्टअप पॉलिसी आणली. महाराष्ट्रामध्ये आम्ही स्टार्टअप पॉलिसी आणली. मला असं वाटतं. तुम्ही ज्याच्या सोबत राहता त्यांची सवय तुम्हाला लागली. आता हे अध्यक्ष आहेत का गल्लीचे नेते आहेत?”, असा टोला फडणवीसांनी लगावला. “कोणाचा बाप आला तरी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही. जोवर चंद्र आहे तोवर मुंबई महाराष्ट्राचीच असणार. तुम्ही कफन चोर आहेत. आता तुमचे घोटाळे बाहेर काढलेत, आगे देखो होता है क्या”, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.