‘मन की बात’चं गौरवगीत गायलंय ‘या’ मराठी माणसाने; 101 व्या भागात घुमणार मराठी सूर

PM Narendra Modi Mann Ki Baat Song : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मन की बात अन् भारतमातेचं कौतुक; 101 व्या'मन की बात'मध्ये घुमणार मराठी सूर

'मन की बात'चं गौरवगीत गायलंय 'या' मराठी माणसाने; 101 व्या भागात घुमणार मराठी सूर
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 2:59 PM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधतात. यात ते विविध मुद्द्यांवर भाष्य करतात. नुकतं ‘मन की बात’चा शंभरावा भाग प्रदर्शित झाला. येत्या 28 मेला ‘मन की बात’चा 101 वा भाग प्रदर्शित होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर 100 भागांचा गौरव आणि 101 व्या भागाचं स्वागत करणारे ‘मन की बात गौरवगीत’ समोर आलं आहे. जनतेच्या भावनेचं प्रतिबिंब उमटवणाऱ्या या कार्यक्रमाच्या गौरवगीताचा सूर सध्या सर्वत्र घुमतो आहे.

गौरवगीताचे बोल

सौ भागो की सुंदर माला भारत माँ के चरणों मे एक सौ एक वी मन की बात का स्वागत है हर घर घर मे …. मन की बात ये जन की बात ये देश की बात है …. ये बात है सूनहरी राष्ट्रहित से भरी भरी …

असे या गौरवगीताचे बोल आहेत. हे गीत प्रत्येकाच्या मनाला भिडेल, असा विश्वास या गीताचे गीतकार-संगीतकार संजय गीते यांनी व्यक्त केला आहे. अनेक प्रेरणादायी व्यक्तिमत्वांना समोर आणणाऱ्या कार्यक्रमाच्या गौरवगीतातून समाजातील ‘रिअल हिरो ना मानाचा मुजरा करण्यात आला आहे.

या गौरवगीताची गीत-संगीत-संकल्पना संजय गीते यांची असून या गीताला गायिका श्रावणी गीते, संजय गीते यांचा स्वरसाज लाभला आहे. ध्वनिमुद्रण सुमंतजी तर व्हीडिओची जबाबदारी सुमंत वैद्य, वरुण कदम यांनी सांभाळली आहे. भाजप नाशिकचे श्री. गणेश गीते या गीत निर्मितीचे प्रायोजक आहेत. सोर्स म्युझिक स्टुडिओने या गौरवगीताची प्रस्तुती केली आहे.

मराठी सिनेसृष्टीत संगीत दिग्दर्शक म्हणून उत्तम कामगिरी करताना अनेक नाटक मालिका सिनेमाचे संगीत दिग्दर्शन संजय गीते यांनी केलं आहे. लता मंगेशकर, शंकर महादेवन, सुरेश वाडकर अशा अनेक दिग्गजांसोबत त्यांनी काम केलं आहे. कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, मंगेश पाडगांवकर यांच्या कवितांना त्यांनी स्वरबद्ध केलं आहे.

गीत-संगीताच्या माध्यमातून करमणुकीसोबत प्रबोधन व्हावं आणि समाजातील तणावग्रस्त घटकांना सशक्त करावं, यासाठी त्यांनी सुरू केलेले मनशक्ती संगीताचे यशस्वी प्रयोग ते गेली दहा वर्ष सातत्याने करीत आहेत. अशा या प्रयोगशील संगीतकार गायकाने ‘मन की बात’ गौरवगीतातून वेगळा प्रयत्न केला असून रसिकांना तो नक्कीच भावेल यात शंका नाही.

नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीचं यंदा नववं वर्ष सुरू आहे. रेडिओ प्रोग्रॅम, सातत्य, मान्यवरांची यशोगाथा या साऱ्याचंच प्रतिबिंब या गौरवगीतात दिसत आहे. प्रेरणादायी संगीत, वेगवान बिट्स आणि अचूक शब्दांमुळे हे गौरवगीत एक मोटिवेशन साँग ठरत आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये या गीताचे स्क्रीनिंग शो ठेवले जात आहेत.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.