संजय राऊत यांनीही उच्चारली ‘ती’ शिवी, शिवीचं समर्थनही; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत म्हणाले, हे तर गद्दार हृदयसम्राट!
Sanjay Raut on Datta Dalvi Arrest and CM Eknath Shinde : दत्ता दळवी यांच्या वक्तव्याचं समर्थन करत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे गद्दार असल्याचं राऊत पुन्हा एकदा म्हणाले आहेत. हे तर गद्दारहृदयसम्राट, असं राऊतांनी म्हटलंय.
मुंबई | 29 नोव्हेंबर 2023 : ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी दत्ता दळवी यांच्या अटकेचा निषेध केला आहे. तसंच दत्ता दळवी यांच्या वक्तव्याचं समर्थन संजय राऊत यांनी केलं आहे. दत्ता दळवी यांनी जे वक्तव्य केलं. त्यात काहीही चूक नाही. धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांच्या तोंडी ही शिवी आहे. तिथे सेन्सॉर बोर्डाने या शिवीवर आक्षेप घेतला नाही. मग दळवी यांच्या वक्तव्यावर आक्षेप का?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
राऊतांनी ‘ती’ शिवी उच्चारली
दत्ता दळवी यांच्या अटकेचा खासदार संजय राऊत यांनी तिखट शब्दात निषेध केला. दळवी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका करताना भो#X असा उल्लेख केला. या शिवीवर आक्षेप घेत दत्ता दळवी यांनी अटक करण्यात आली आहे. संजय राऊत यांनी तीच शिवी आज पुन्हा एकदा उच्चारली आहे. तसंच धर्मवीर चित्रपटात ही शिवी वापरली जाऊ शकते. तर मग दळवींच्या विधानावर आक्षेप का? शिंदेगट हे मुद्दाम करत आहे. मात्र त्यांनी ध्यानात ठेवावं की काहीही झालं तरी आगामी निवडणुकीत त्यांची हार पक्की आहे, असं संजय राऊत म्हणाले.
दत्ता दळवी यांना अटक
शिवसेना ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांना अटक झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी गेले होते. तिथे लावण्यात आलेल्या बॅनरवर शिंदे यांचा उल्लख हा ‘हिंदुहृदयसम्राट’ असा केला होता. त्यावर ठाकरे गटाने तीव्र आक्षेप घेतला. भांडुपमध्ये झालेल्या कार्यक्रमात दळवी यांनी शिंदेंवर टीका केली. भो#X असा उल्लेख त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला. शिवसेना शिंदे गटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर दळवी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि काहीवेळा आधी दत्ता दळवी यांना अटक झाली आहे.
या अटकेवर राऊतांनी आक्षेप घेतला आहे. आरोपी कुठे तरी पळून जाणार अश्या पद्धतीने दत्ता दळवीं याना अटक करण्यात आली आहे. गद्दार हृदयसम्राट स्वतःला हिंदुहृदय सम्राट स्वतःला समजून घेत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यावरच गुन्हा दाखल व्हायला हवा. जर आज आनंद दिघे आज असते तर त्यांनी चाबकाचे फटके मारले असते, असं संजय राऊत म्हणाले.