Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हल्ल्यानंतर निखिल वागळे यांची पहिली फेसबुक पोस्ट; म्हणाले, अर्ध्या तासात चार वेळा पाठलाग करुन आम्हाला…

Nikhil Wagle Facebook Post About attack : देशाचा हिंदू पाकिस्तान होऊ नये म्हणून...; हल्ल्यानंतर निखिल वागळे यांची पहिली फेसबुक पोस्ट... काल पुण्यातील निर्भय बनो या कार्यक्रमासाठी निखिल वागळे पुण्यात होते. यावेळी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. वाचा सविस्तर...

हल्ल्यानंतर निखिल वागळे यांची पहिली फेसबुक पोस्ट; म्हणाले, अर्ध्या तासात चार वेळा पाठलाग करुन आम्हाला...
Follow us
| Updated on: Feb 10, 2024 | 1:45 PM

मुंबई | 10 फेब्रुवारी 2024 : पुण्यातील सिंहगड रोडवर असलेल्या राष्ट्रसेवा दलात वरिष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या ‘निर्भय बनो’ या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर काल रात्री पुण्यात हल्ला झाला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांच्या गाडीची तोडफोड केली. त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. तसंच वागळेंच्या गाडीवर शाई फेकण्यात आली. या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटले. यानंतर निखिल वागळे यांनी पहिली फेसबुक पोस्ट शेअर केला आहे. मदत करणाऱ्यांचे वागळे यांनी आभार मानले आहेत. तसंच हल्ल्यावेळी नेमकं काय झालं? याची हकिकतही निखिल वागळे यांची या पोस्टच्या माध्यमातून सांगितलं आहे.

निखिल वागळे यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी

प्रिय मित्र- मैत्रिणीनो, भावांनो-बहिणींनो,

काल मृत्यू दारात दारात उभा राहिला होता. केवळ तुमच्या प्रेमामुळे वाचलो.

मला इजा होऊ नये म्हणून काचांचे तुकडे रुतले तरी मागे न हटणारा असीम सरोदे.,जीवाची बाजी लावून आमची गाडी हाकणारा आमचा सारथी वैभव, पुढच्या सीटवर बसून हल्ला अंगावर घेणारी ॲड श्रीया, शेवटपर्यंत साथ देणारे विश्वंभर, रस्त्यावर उतरुन हल्लेखोरांशी दोन हात करणारा बंटी, भक्ती कुंभार आणि असंख्य कार्यकर्ते यांचं ऋण मी कसं फेडू? भाजपच्या गुंडाशी दोन हात करणारे राहुल डंबाले, प्रशांतदादा जगताप यांची कुमक..कॅांग्रेसचे अरविंद शिंदे, वंचित आणि आपचे कार्यकर्ते, धोका पत्करुन मला मुंबईत पोहोचवणारा नितीन वैद्य..कुणाकुणाची नावं घेऊ? सगळ्यांचा मी ऋणी आहे.

आजवर सहा हल्ले पचवले. कालचा हल्ला सगळ्यात भयानक होता. दगड, लाठ्याकाठ्या, हॅाकी स्टिक्स, रॅाड्स, अंडी, शाई सगळ्याचा वापर झाला. अवघ्या अर्ध्या तासात चार वेळा पाठलाग करुन आम्हाला घेरण्यात आलं. पोलीसांच्या संगनमताने हा हल्ला झाला. काल आम्ही सगळे वाचलो केवळ फुले-आंबेडकर यांच्या आशिर्वादाने ही माझी श्रद्धा आहे.

आता यापुढचं आयुष्य तुमच्यासाठी. फॅसिजमचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढू. अशा भ्याड हल्लांची भीती बाळगण्याचे आमचे संस्कार नाहीत. या देशाचा हिंदू पाकिस्तान होऊ नये म्हणून पुन्हा जीवाची बाजी लावेन एवढंच इथे सांगतो.

तुमचं सगळ्यांचं ऋण मी कधीच फेडू शकत नाही. कालची सभा यशस्वी करण्यासाठी तुम्ही सगळे झटलात..आभार कसे मानू? जास्त बोलवत नाही. कालच्या धक्क्यातून अजून बाहेर आलेलो नाही. संध्याकाळी तुमच्याशी सविस्तर बोलीनच.

तुमचा,

निखिल

बारामतीत सर्वपक्षीय मोर्चाला सुरुवात, काय म्हणाले धनंजय देशमुख? पाहा
बारामतीत सर्वपक्षीय मोर्चाला सुरुवात, काय म्हणाले धनंजय देशमुख? पाहा.
सतीश भोसलेवर गुन्हा दाखल, मात्र अटक कधी? शिरूरमध्ये जनआक्रोश मोर्चा
सतीश भोसलेवर गुन्हा दाखल, मात्र अटक कधी? शिरूरमध्ये जनआक्रोश मोर्चा.
'छावा' पाहून पसरली अफवा अन् औरंगजेबाचा खजिना लुटण्यासाठी झुंबड
'छावा' पाहून पसरली अफवा अन् औरंगजेबाचा खजिना लुटण्यासाठी झुंबड.
हरिणाच्या मटणासाठी मारहाण, धसांचा कार्यकर्ता 'खोक्या'ची दहशत; काय घडल?
हरिणाच्या मटणासाठी मारहाण, धसांचा कार्यकर्ता 'खोक्या'ची दहशत; काय घडल?.
अश्लील चाळे करणाऱ्याचे वडील म्हणाले; लाज वाटते, त्याने लघुशंका माझ्या
अश्लील चाळे करणाऱ्याचे वडील म्हणाले; लाज वाटते, त्याने लघुशंका माझ्या.
'भुजबळ सडलेल्या डोक्याचा, तो स्वप्न बघून मरेल पण...', जरांगेंनी डिवचलं
'भुजबळ सडलेल्या डोक्याचा, तो स्वप्न बघून मरेल पण...', जरांगेंनी डिवचलं.
पुण्यातील या घटनांमुळे संताप! कुठे अश्लील चाळे,कोयत्यानं हल्ला तर कुठे
पुण्यातील या घटनांमुळे संताप! कुठे अश्लील चाळे,कोयत्यानं हल्ला तर कुठे.
'त्या' प्रकारावरून रूपाली ठोंबरे आक्रमक, 'जसं काय त्याच्या बापाचा...'
'त्या' प्रकारावरून रूपाली ठोंबरे आक्रमक, 'जसं काय त्याच्या बापाचा...'.
पुण्यातील तरूणाच्या अश्लील चाळ्यांवरून वसंत मोरे पोलिसांवरच भडकले
पुण्यातील तरूणाच्या अश्लील चाळ्यांवरून वसंत मोरे पोलिसांवरच भडकले.
'टूरिस्ट म्हणून येतात अन्...', एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
'टूरिस्ट म्हणून येतात अन्...', एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका.