उद्धव ठाकरेंना अरे तुरेची भाषा, ‘चायनीज’सेना म्हणत डिवचलं; नितेश राणे यांची सनसनाटी पत्रकार परिषद
Nitesh Rane on Uddhav Thackeray : राहुल गांधींच्या परदेश दौऱ्याच्या चौकशीची मागणी अन् ठाकरे गटाला डिवचलं; नितेश राणे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
मुंबई : भाजपचे नेते नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी उद्धव ठाकरेंवर घणघात केलाय. अरे तुरेची भाषा वापरली आहे. तसंच चायनीज शिवसेना म्हणत ठाकरे गटाला डिवचलं आहे. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र डागलंय.तसंच काँग्रेस नेते सध्या अमेरिकेत आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या चौकशीची मागणीही नितेश राणे यांनी केली आहे.
नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना अरे तुरेची भाषा वापरली आहे. उद्धव ठाकरे जनपथवर उद्धव ठाकरे साडी घालून जायचा का? हिx@#%चं प्रमुख यांना म्हणायचं का? , असं राणे म्हणाले आहेत.
चायनीज शिवसेनेचा नेता! त्यांची शिवसेना चायनीज, असं म्हणत नितेश राणे यांनी शिवसेनेला डिवचलं आहे. तसंच राहुल गांधी यांच्या दौऱ्याची चौकशी व्हावी, अशी मागणीही केली आहे.
ओडीसामधल्या अपघातावर आजच्या सामना अग्रलेखात भाष्य करण्यात आलं आहे. त्यावर, ओडीसा अपघाताबद्दल सामनामध्ये आणि आज पत्रकार परिषदेत गरळ ओकण्याचा काम केलं आहे. सामना वृत्तपत्र राज्य सरकारकडून 50 लाखांची जाहिराती घेतं.महापालिकेत सर्वात जास्त जाहिराती यांच्या पेपरला जातात. सरकारी तुकड्यावर जगणाऱ्यांनी हे बोलणं उचित नाही, असं नितेश राणे म्हणालेत.
नैतिकतेची भाषा करतात. मग तुमच्या मालकाच्या सरकारमध्ये लोकांचे जीव गेले तेव्हा पश्चताप झाला का?आमचे रेल्वे मंत्री तिथं रात्रभर होते. ते चांगलं काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यापेक्षा तुझ्या मालकाने काय केलं सांग. यांचे मालक परदेशीं फिरत आहेत. तेही कोविड काळात केलेल्या भ्रष्टाचाराच्या पैशापासून… दुसऱ्यांना नैतिकता शिकवता मालकाने कधी राजीनामा दिला का? , असं म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊतांवर तोफ डागली आहे.
खरी शिवसेना दिल्लीत जात नाही म्हणता मग तुमचा मालक जनपथवर किती वेळा गेला? दिल्लीला मातोश्रीची मम्मी आहे का? सीबीआय चौकशीवर बोलता मग श्रीधर पाटणकरबद्दल बोला ना…, असं आव्हानच राणेंनी दिलंय.
शरद पवारांनी यांची कानातुन रक्त काढेपर्यंत लायकी काढली आहे. म्हणून आता अजित पवार यांच्याबद्दल बोलत नाहीत. एक इंटरनल सर्व्हे मविआचा झाला आहे.यात शिवसेनेला बावीस जागा आणि मविआ पडेल असं दिसतंय येणाऱ्या निवडणुकीत 22 चे दोन कसे होतील बघा, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.