ज्या हॉटेलमध्ये आयपीएलची टीम त्याच हॉटेलमध्ये सट्टेबाज ?, पोलिसांकडून तिघांना अटक

आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफ़ाश केला आहे. सट्टेबाजी करणाऱ्या तीन आरोपींना एनएम जोशी पोलिसांनी अटक केली आहे. (mumbai police ipl betting)

ज्या हॉटेलमध्ये आयपीएलची टीम त्याच हॉटेलमध्ये सट्टेबाज ?, पोलिसांकडून तिघांना अटक
IPL GAMBLING
Follow us
| Updated on: Apr 17, 2021 | 4:48 PM

मुंबई : आयपीएलचा 14 वा हंगाम नुकताच सुरु झाला आहे. सर्व सामने अटीतटीचे होत असल्यामुळे त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मात्र, मुंबईमध्ये आयपीएलसंबंधीची गुन्हेगारी विश्वातील एक मोठी घडना समोर आली आहे. आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफ़ाश केला आहे. सट्टेबाजी करणाऱ्या तीन आरोपींना एनएम जोशी पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईचा हायफाय परिसर म्हणून ओळख असलेल्या लोअर परळ भागातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हे तिन्ही आरोपी वास्तव्यास होते. (Mumbai NM Joshi Police arrested three accuse for IPL cricket betting)

मिळालेल्याा माहितीनुसार, मुंबईतल्या लोअर परळ भागात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयपीएलवर सट्टेबाजी सुरु होती. या सट्टेबाजीमध्ये तीन जण सामील होते. त्याची माहिती एनएम जोशी पोलिसांना मिळाली. ही माहिती समजताच पोलिसांनी सापळा रचत या तिन्ही आरोपींना अटक केली. पोलिसांनी ही कारवाई काल (16 एप्रिल) केली होती. पंचतारांकित हॉटेलच्या 27 व्या मजल्यावर एका महागड्या खोलीमध्ये हा सट्टेबाजीचा प्रकार सुरु होता.

या कारवाईत पोलिसांनी तब्बल 8 मोबाईल आणि एक लॅपटॉप जप्त केला आहे. आरोपींना अटक केल्यानंतर त्यांना पोलिसांनी आज (17 एप्रिल) न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष बाब म्हणजे हे आरोपी ज्या हॉटेलमध्ये थांबले होते. नेमक्या त्याच हॉटेलमध्ये आयपीएलची एक टीमसुद्धा थांबली होती, असे सुत्रांनी सांगितले आहे. याबाबत विचारले असता सध्या अटक केलेले आरोपी आणि आयपीएलची टीम हॉटेलमध्ये थांबणे याचा एकमेकाशी काहीही संबंध नाही, असे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, पोलिसांनी या तिघांना अटक केल्यानंतर सट्टाबाजार विश्वातील मोठी साखळी समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. न्यायालयाने तिन्ही आपोरींना पोलीस कोठडी सुनावल्यामुळे आता आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी होणार आहे. या चौकशीतून आणखी महत्त्वाची माहिती समोर येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

इतर बामत्या :

IPL 2021 MI vs SRH Head to Head | मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने, ‘या’ 4 खेळाडूंची कामगिरी निर्णायक ठरणार

IPL 2021 : ड्वेन ब्राव्होने केलेला ‘वाथी कमिंग’ गाण्यावरचा डान्स पाहिलात का?, अंबाती रायुडूही हसून लोटपोट!

IPL 2021 : शेजारी मरीन ड्राईव्ह आणि समुद्राच्या लाटा, धोनी-शाहरुखमध्ये कशावर बाता?, या फोटोची एकच चर्चा!

(Mumbai NM Joshi Police arrested three accuse for IPL cricket betting)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.