मुंबई: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईत सर्वसामान्य नागरिकांसाठी अद्याप लोकलसेवा सुरु करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबईकरांना प्रवासासाठी ‘बेस्ट’ बस हाच बेस्ट पर्याय ठरतो आहे. अनलॉकला सुरुवात केल्यानंतर सामान्य नागरिकांना बेस्ट बसने प्रवासाची मुभा देण्यात आली. आता बेस्टची प्रवासी संख्या 23 लाखांवर पोहोचली आहे. ही प्रवासीसंख्या अजून वाढवण्यासाठी यंदा कोणतीही भाडेवाढ न करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. (No fare increase this year from BEST)
लॉकडाऊनपूर्वी बेस्टमधून रोज 30 लाखाच्या आसपास प्रवासी प्रवास करत होते. सध्या ही संख्या 23 लाखांवर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. मोठ्या शहरात रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत सर्वासामान्यांसाठी अद्याप लोकल सुरु करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबईकर नागरिक बेस्ट बसद्वारेच प्रवास करताना पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनपूर्वी म्हणजे 9 मार्च 2020 ला बेस्टची प्रवासी संख्या 30 लाख 88 हजार 834 इतकी होती. तर लॉकडाऊन हटवल्यानंतर 20 नोव्हेंबरला 22 लाख 47 हजार 542 प्रवाशांनी बेस्टने प्रवास केला. त्याद्वारे बेस्टला 2 कोटी 3 लाख 39 हजार रुपयाचं उत्पन्न मिळालं आहे.
भाडेवाढ केल्यास प्रवासी पुन्हा बेस्टकडे पाठ फिरवलीतल अशी भीती बेस्ट प्रशासनाला आहे. त्यामुळे आता भाडेवाढीचा कुठलाही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं बेस्ट समितीच्या बैठकीत महाव्यवस्थापकांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
बईची लाईफलाईन अर्थातच मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यावरुन तर्क-वितर्क सुरु आहेत. दिवाळीनंतर मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यामुळे सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करावी की नाही याबाबत विचारविनिमय सुरु आहेत. मात्र मुंबईतील कोरोनाची परिस्थिती पाहून लोकलचा निर्णय होईल, असे वक्तव्य मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी केले आहे.
मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. ही परिस्थिती पाहूनच मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यावर निर्णय घेतला जाईल. पुढील एक किंवा दोन आठवडे मुंबईतील कोरोना स्थितीचा आढावा घेतला जाईल. यानंतर लोकल सुरु करण्याचा विचार केला जाईल, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिली. मुंबई महापालिका आयुक्तांच्या या वक्तव्यानुसार सध्या तरी पालिका प्रशासन आणि राज्य सरकार वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसत आहे.
मुंबईकरांना दिवाळी भेट! बेस्टच्या ताफ्यात येणार अत्याधुनिक डबल डेकर बसेस
मुंबई लोकल सुरु करण्याबाबत वेट अँड वॉच भूमिका, परिस्थिती पाहून निर्णय घेऊ : पालिका आयुक्त
Mumbai Local | मुंबईत कोरोना वाढला, सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर
No fare increase this year from BEST