VIDEO: मुंबईत मुलीने धोका दिल्याचं सांगत डोक्याला बंदुक लावलेल्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?

आपल्याला मुलीने धोका दिल्याचा दावा करत डोक्याला बंदुक लावलेल्या मुलाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर एकच खळबळ उडाली.

VIDEO: मुंबईत मुलीने धोका दिल्याचं सांगत डोक्याला बंदुक लावलेल्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Follow us
| Updated on: Jun 10, 2021 | 6:35 PM

मुंबई : आपल्याला मुलीने धोका दिल्याचा दावा करत डोक्याला बंदुक लावलेल्या मुलाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर एकच खळबळ उडाली. आता पोलिसांनी याची चौकशी करुन सत्य समोर आणलंय. मुंबईतील अंधेरी स्टेशनच्या रुळावर धोकादायक स्टंट करणाऱ्या युवकास रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियावर स्टंटचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली. अटक केलेल्या स्टंटमॅनचे नाव अरमान शेख असं आहे. त्याला घाटकोपर भागातून अटक करण्यात आली (Mumbai Police arrest youth doing stunt on Andheri railway track for publicity).

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आरोपी तरुण मंद प्रकाशात बंदूक घेऊन रेल्वे रुळाजवळ बसलेला दिसत आहे. त्याच्या मागून एक ट्रेन जात आहे. यादरम्यान तो एक गन उचलतो आणि स्वत:वर गोळीबार करतो. या दरम्यान तो रडल्याचा अभिनय करतो. दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो बंदूक त्याच्या कानाजवळ ठेवतो आणि स्वत:वर गोळी झाडल्यासारखं भासवत ट्रॅकच्या मध्यभागी पडतो.

अंधेरी स्थानकाच्या ट्रॅकवर व्हायरल व्हिडीओचं शुटिंग

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांच्या तपासात हा व्हिडीओ अंधेरी स्थानकाच्या ट्रॅकवर चित्रित केल्याचं स्पष्ट झालं. ही माहिती मिळताच रेल्वे पोलिसांच्या पथकाने आरोपी अरमान शेख याला अटक केली. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोन्ही व्हिडिओ 8-10 दिवसांपूर्वी तयार केले गेले होते. 8 जून रोजी आरोपीने सोशल मीडियावर हे व्हिडीओ पोस्ट केले, अशी माहिती रेल्वे पोलीस अधिकारी दत्तात्रय निकम यांनी दिलीय.

धोकादायक व्हिडीओ शूट करत प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्टंट

आरोपींने सोशल मीडियावर हा धोकादायक व्हिडीओ शूट करत प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला. यासाटी त्यानं अभिनय देखील केला, पण पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर लगेचच त्याचा सर्व अभिनय बंद झाला. आता त्याने आपली चूक मान्य करून माफी मागितली आहे. आरोपींनी आणखी बरेच स्टंट केल्याचे व्हिडीओही समोर आले आहेत. त्याच्याविरोधात मुंबई पोलिसात स्टंट केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी स्टंटमॅनला अटक केल्यानंतर रेल्वे पोलिस त्याच्याबरोबर आणखी कोण आहेत, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, जे असे प्राणघातक स्टंट करतात.

हेही वाचा :

भरधाव गाडीच्या खिडकीत लटकून मद्यपान, मुंबईत तीन स्टंटबाजांना बेड्या

VIDEO : Tik Tok व्हिडीओचा नाद नडला, बाईकवर स्टंट करताना तोंडावर पडला

VIDEO : पुतण्याच्या वाढदिवशी सलमानचा काळजाचा ठोका चुकवणारा स्टंट

व्हिडीओ पाहा :

Mumbai Police arrest youth doing stunt on Andheri railway track for publicity

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.