महिला सुरक्षा ते अंडरवर्ल्डचा खात्मा, मुंबईच्या नव्या पोलिस आयुक्तांचा ‘अॅक्शन प्लॅन’

परमबीर सिंह यांनी मुंबई पोलिस आयुक्तपदी नियुक्ती केल्याबद्दल राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

महिला सुरक्षा ते अंडरवर्ल्डचा खात्मा, मुंबईच्या नव्या पोलिस आयुक्तांचा 'अॅक्शन प्लॅन'
Follow us
| Updated on: Feb 29, 2020 | 4:13 PM

मुंबई : राज्य सरकारने मुंबई पोलिस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची नियुक्ती केली. यानंतर परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारचे आभार मानले आहेत (Mumbai Police Commissioner Parambir Singh). तसेच यापुढील काळात कशा पद्धतीने काम करणार आहे याची माहिती दिली. यावेळी त्यांनी अंडरवर्ल्डवर नियंत्रण आणण्यासोबतच महिला सुरक्षेवरही भर असेल असं स्पष्ट केलं.

परमबीर सिंह म्हणाले, “राज्य सरकारने माझी मुंबई पोलिस आयुक्त पदावर नियुक्ती केली. हा माझा मोठा सन्मान आहे. या पदावर अनेक मान्यवरांनी काम केलं आहे. त्यासाठी माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी राज्य सरकारचे आभार मानतो. मुंबईत कायदा सुव्यवस्थेची स्थिती चांगली आहे. तिच यापुढेही राहिल यासाठी प्रयत्न करेल. रस्त्यांवरील गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यालाही आमचं प्राधान्य राहिलं. महिलांची सुरक्षा हा अधिक प्राधान्य असलेला विषय आहे. दिवस असो की रात्र महिलांना सुरक्षित वाटायला हवं.”

मागील काळात अंडरवर्ल्डविरोधात चांगलं यश मिळालं आहे. त्यावर पुढे काम करणं आणि जे काही उरले सुरले गुन्हेगार आहेत त्यांच्यावरही नियंत्रण मिळवण्याला प्राधान्य राहिल. मी मुंबई पोलिसांसोबत आधीही काम केलं आहे. संपूर्ण मुंबई पोलिसांचं कुटुंब माझ्यासोबत राहिल. मुंबई पोलिस जगातील उत्कृष्ट पोलिसांपैकी एक आहेत. मुंबई कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यास सक्षम आहेत. या शहराला आम्ही एक चांगली सुरक्षा व्यवस्था देऊ, असंही परमबीर सिंह यांनी नमूद केलं.

परमबीर सिंह म्हणाले, “आधीचे आयुक्त संजय बर्वे यांनी शहरातील कायदा सुव्यवस्था ज्या पद्धतीने सांभाळली तिच पद्धत पुढे नेऊ. महिलांच्या 24 तास सुरक्षेसह अंडरवर्ल्डमधील गुन्हेगारीवरही नियंत्रण ठेऊ. अंडरवर्ल्डबाबत जे काही बाकीचे घटक आहेत त्यावरही काम करु.”

मुंबईत सध्या कुठलं रॅकेट सुरु आहे असं मला वाटत नाही. मुंबई पोलिसांची टिम चांगलं काम करते आहे. एझाज लकडावाला प्रकरणामध्ये तपास सुरु राहिल, असंही परमबीर सिंह यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

Mumbai Police Commissioner Parambir Singh

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.