मुंबई : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना (Team India Suresh Raina) आणि सुझान खानची (Sussanne Khan) अटकेनंतर सुटका करण्यात आली आहे. या दोघांना कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. सहार पोलिसांनी ही कारवाई केली होती. मुंबईतील एअरपोर्ट नजीक ड्रग्नफ्लाय या पबमध्ये हाय प्रोफाईल पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीमध्ये बॉलीवूडमधील अनेक सेलेब्रिटी उपस्थित होते. Mumbai Police files FIR against former Team India player for violating Corona rules
Police book 34 people including cricketer Suresh Raina & some other celebrities under Section 188, 269, 34 of IPC & provisions of NMDA after a raid at Dragonfly pub for keeping establishment open beyond permissible time limit & not following COVID norms: Mumbai Police
— ANI (@ANI) December 22, 2020
मुंबईतील एअरपोर्टनजीक ड्रॅग्न फ्लाय पबमध्ये एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीमध्ये अनेकांनी कोरोना नियमांचं उल्लंघन केलं होतं. या पार्टीत अनेकांनी सोशल डिस्टंसच्या नियमाला पायदळी तुडवले. तसेच या पार्टीत उपस्थित असलेल्यांनी मास्कही लावला नव्हता. पोलिसांना सर्व प्रकाराची माहिती मिळताच रात्री साडे तीनच्या दरम्यान या पबवर छापा टाकला. या पब पार्टीत गायक गुरु रंधवा आणि इतर सेलेब्रिटीही उपस्थित होते. कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे सुरेश रैनासह या पब मालकावरही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी रैनावर आयपीसीच्या कलम 188, 269 आणि 34 नुसार कारवाई करण्यात आली.
संबंधित बातम्या :
Suresh Raina | मी सुद्धा तुझ्यासोबत, धोनीपाठोपाठ रैनाचीही निवृत्तीची घोषणा
Sussanne Khan | हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खानविरोधात गुन्हा
Mumbai Police files FIR against former Team India player for violating Corona rules