वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी परदेशात पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी उचललं हे पाऊल

वरळी अपघात प्रकरणात आरोपी मिहिर शाहा परदेशात फरार झाला का., याची चर्चा रंगतेय., खबरदारी म्हणून पोलिसांनी लूकआऊट सर्क्युलर जारी केलंय., आरोपीच्या पित्याला आज जामीन मिळाला. वाचा स्पेशल रिपोर्ट.

वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी परदेशात पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी उचललं हे पाऊल
Follow us
| Updated on: Jul 08, 2024 | 11:55 PM

वरळी हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहिर शाह अजूनही मुंबई पोलिसांच्या हाती लागलेला नाही. आरोपी परदेशात पळून जावू शकतो या शक्यतेनं पोलिसांनी लूक आऊट सर्क्युलर जारी केलंय. वरळीत मासेविक्रेते दाम्पत्याला बीएमडब्लू कारनं धडक दिली. आरोपांनुसार धडकेनंतर कारचालकानं महिलेला दीड ते दोन किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्यानं महिलेचा मृत्यू झाला. त्यावेळी मिहिर शाह हाच गाडी चालवत होता, असा दावा मृत महिलेच्य पतींचा आहे. शिवाय आरोपी मिहिर शाह हा शिंदे गटाचा उपनेता राजेश शहाचा मुलगा असल्यानं कारवाई होईल का? याबाबत शंकाही वर्तवल्या जातायत.

अपघाताआधी आरोपी मिहिर शहानं दारु प्यायली होती. अपघातावेळी गाडीत मिहिर शहा आणि त्याचा ड्रायव्हर होता. मात्र पोलिसांनी ड्रायव्हरला तर अटक केलीय., पण दुसरा आरोपी मिहिर शहा अद्यापही फरार आहे. जर गाडी मिहिर शहा चालवत नव्हता, तर तो फरार का झाला? गाडी ड्रायव्हरकडेच होती. तर ड्रायव्हर फरार का झाला नाही? अपघातावेळी गाडी कोण चालवतं होतं, याबद्दल ड्रायव्हरनं काय जबाब दिला, यावर मुंबई पोलीस मौन का आहेत?

ड्रायव्हिंग सीटवर कोण होतं., याची पडताळणी अपघातावेळचं किंवा अपघाताआधीचं सीसीटीव्ही फुटेज तपासून सांगता येवू शकतं. मात्र त्याचीही ठोस माहिती का दिली जात नाही., असे अनके प्रश्न या घटनेच्या तपासावर उभे राहिले आहेत.

शिंदे गटाचा नेता आणि आरोपी राजेश शाहाला पोलिसांनी आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपात अटक केली होती. मात्र कोर्टानं राजेश शहाला जामीन दिला. पालघर विभागात राजेश शाहाचं मोठं प्रस्थ मानलं जातं. पालघर लोकसभा निवडणुकीत राजेश शाह मोठ्या प्रमाणात सक्रीय होता. त्यामुळेच तपासाच्या आड राजकीय हितसंबंध येणार नाहीत, अशी आशा पीडित कुटुंबियांना आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.