अविनाश माने, प्रतिनिधी टीव्ही 9 मराठी, मुंबई | 19 डिसेंबर 2023 : मोस्ट वाँटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यावर विषप्रयोग झाल्याच्या बातम्या येत आहेत. यावर मुंबई पोलिसांनी महत्वाचं स्टेटमेंट दिलं आहे. दाऊदवर विषप्रयोग झाला की नाही? यावर मुंबई पोलिसांकडून प्रतिक्रिया समोर आली आहे. दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग करण्यात आल्याचं समाजमाध्यमांवर प्रसारित झालेलं वृत्त ही केवळ अफवा आहे, असं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे. मुंबई पोलिसांनी याबाबत चौकशी केली. तेव्हा त्यात कोणतंही तथ्य नसल्याचं निष्पन्न झालं आहे.
दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाल्याच्या बातम्या कालपासून येत होत्या. दाऊदची तब्येत खालावल्याचंही बोललं जात होतं. मात्र या सगळ्याबाबत मुंबई पोलिसांनी चौकशी केली. दाऊद नेमका कसा आहे? यावर मुंबई पोलिसांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. दाऊदवर विषप्रयोग झाला नसल्याचं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे. गेल्या आठवड्यात दाऊद इब्राहिम पाकिस्तानातील रुग्णालयात वैद्याकीय तपासणीसाठी गेला होता. मात्र आता तो घरीच असल्याचं पडताळणीत निष्पन्न झालं आहे. यापूर्वीही अनेक वेळा दाऊदच्या मृत्यूबाबतच्या खोट्या बातम्या पेरण्यात आल्या होत्या, असंही मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
काल पाकिस्तानमध्ये इंटरनेटसेवा बंद होती. याचा थेट दाऊदच्या तब्येतीशी संबंध जोडण्यात आला. दाऊदवर विषप्रयोग झाल्यानेच पाकिस्तानातील इंटरनेटसेवा बंद असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता मुंबई पोलिसांकडून दाऊदवर विषप्रयोग झाला नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. एका पाकिस्तानी महिला पत्रकाराने दाऊदवर विषप्रयोग झाल्याची पहिली बातमी दिली. पाकिस्तानी पत्रकार आरजू काजमी हिने तिच्या यूट्यूब चॅनलवर सर्वात आधी दाऊदबाबतची बातमी दिली. ‘भेजा फ्रॉय’ या शोमध्ये आरजूने दाऊदवर विषप्रयोग झाल्याचा दावा केला.
दाऊदला विष दिलं गेलं आहे. तसंच दाऊदची प्रकृतीही गंभीर आहे. मात्र याबाबत उघड बोलण्याची हिंमत पाकिस्तानमध्ये कुणी करत नाही, असा दावा आरजू काजमी या पत्रकाराने आपल्या व्हीडिओमधून केला आहे. मात्र मुंबई पोलिसांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे. दाऊदवर विषप्रयोग झाल्याच्या बातम्या खोट्या असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.