पोलिसांची धावपळ फळाला, अक्सा बीचवर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला कंबरेभर पाण्यातून वाचवलं

अक्सा बीचवर (Aksa Beach) 23 वर्षीय तरुणी समुद्रात उडी मारण्याच्या प्रयत्नात (Suicide) असताना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) तिला वाचवलं.

पोलिसांची धावपळ फळाला, अक्सा बीचवर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला कंबरेभर पाण्यातून वाचवलं
Follow us
| Updated on: Jan 06, 2021 | 9:59 AM

मुंबई : मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे अक्सा बीचवर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचा जीव वाचला. 23 वर्षीय तरुणी समुद्रात उडी मारण्याच्या प्रयत्नात होती. मात्र सहाय्यक पोलिस निरीक्षकांनी भर समुद्राच्या पाण्यातून तिला ताब्यात घेतले. (Mumbai Police saves life of girl attempting Suicide at Aksa Beach)

पोलीस उपनिरीक्षक डॉ. दीपक हिंडे यांना काल (5 जानेवारी) याविषयी माहिती मिळाली होती. प्राची शाह नावाची 23 वर्षीय तरुणी अक्सा बीचला स्वतःचा जीव देण्यास जात असल्याचं त्यांना समजलं. त्यांनी तात्काळ मालवणी पोलीस ठाण्याला याविषयी कळवलं.

पोलीस निरीक्षक रजाने आणि महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम यांनी तत्काळ अक्सा बीचवर धाव घेतली. फोटोच्या सहाय्याने पोलिस तिचा शोध घेत होते. इतक्यात एक महिला समुद्रात कंबरेइतक्या पाण्यात जात असल्याचं त्यांना आढळलं. एपीआय कदम यांनी समुद्राच्या पाण्यात जाऊन तिला ताब्यात घेतले. पोलिसांच्या वक्तशीरपणामुळे तरुणीचा जीव बचावला. त्यामुळे दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

फेसबुकमुळेच धुळ्यातील युवक बचावला

फेसबुकवर लाईव्ह येऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या धुळ्यातील युवकाचे प्राण आयर्लंडचे फेसबुक अधिकारी आणि महाराष्ट्र पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे वाचले. 23 वर्षीय युवक टोकाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत असताना फेसबुक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधून त्यांनी संबंधित तरुणाचा जीव वाचवला. यामध्ये मुंबई पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

आत्महत्येचा प्रयत्न करणारा युवक हा धुळे पोलिसातील होमगार्डचा मुलगा असल्याची माहिती आहे. रविवारी रात्री संबंधित 23 वर्षीय तरुणाने फेसबुक लाईव्ह सुरु केले. लाईव्ह चालू असतानाच त्याने स्वतःच्या मनगटाची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रविवारी रात्री 8 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास हा प्रकार घडताना आयर्लंडमधील फेसबुक कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला.

(Mumbai Police saves life of girl attempting Suicide at Aksa Beach)

आयर्लंड अधिकाऱ्यांचा रश्मी करंदीकरांना फोन

फेसबुकच्या अधिकाऱ्यांनी तातडीने मुंबई पोलीस उपायुक्त (सायबर गुन्हे) रश्मी करंदीकर यांना फोन केला. करंदीकरांनी तातडीने पावलं उचलत धुळे पोलिसांशी संपर्क साधला. विशेष म्हणजे अवघ्या 25 मिनिटात स्थानिक पोलिसांनी या तरुणाचा शोध घेतला आणि त्याच्यापर्यंत पोहोचून प्राण वाचवले.

युवक धुळ्यातील ज्या भागातून फेसबुक लाईव्ह करत होता, त्याचे लोकेशन पोलिसांना मिळाले होते. नाशिकचे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर आणि धुळ्याचे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली होती. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पोलीस त्याच्या घरापर्यंत पोहोचले होते.

संबंधित बातम्या :

अक्सा बीचवर सापडलेल्या विवाहितेच्या मृतदेहाचं गूढ उकललं, सासरा गजाआड

फेसबुक लाईव्हमध्ये आत्महत्येचा प्रयत्न, आयर्लंडमधून सूचना, करंदीकरांच्या प्रयत्नांनी युवक बचावला

(Mumbai Police saves life of girl attempting Suicide at Aksa Beach)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.