मुंबई : बनावट टीआरपीच्या आरोपांनी आधीच अडचणीत आलेल्या रिपब्लिक टीव्हीच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे (Mumbai Police Summons Republic TV in case of mob gathering ). आता रिपब्लिक टीव्हीवर अभिनेत्री कंगना रनौतच्या घराबाहेर गर्दी जमवण्याचा गंभीर आरोप झाला आहे. या प्रकरणी मुंबई पुलिसांनी रिपब्लिक टीव्हीला समन्स पाठवलं आहे. या प्रकरणात 15 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीच्या रिपोर्टरला समन्स पाठवलं आहे. कंगना रनौतचं घर खार पोलीस स्टेशन अंतर्गत येतं. रिपब्लिक टीव्हीवर कंगनाच्या घराबाहेर लोक जमवून त्यांना भडकावल्याचा आरोप आहे. या प्रकरणात जबाब नोंदवण्यासाठी मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीच्या रिपोर्टरला समन्स पाठवलं आहे.
मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी म्हटलं आहे, “या प्रकरणात रिपब्लिकच्या रिपोर्टचा जबाब महत्त्वाचा आहे. त्यांना समन्स मिळाल्यावर तात्काळ पोलिस स्टेशनला हजर होण्यास सांगण्यात आलं आहे. गर्दी जमवून भडकावल्याच्या आरोपाखाली चौकशीसाठी खार पोलिसांनी आतापर्यंत 15 पेक्षा अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. त्यांचीही कसून चौकशी सुरु आहे.
बंगला पाडकामाच्या दिवशी काय झालं होतं?
9 सप्टेंबर रोजी बीएसमीने बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या पाली हिल्स येथील कार्यालयातचं बेकायदेशीर बांधकाम पाडलं होतं. बीएमसीची ही कारवाई सुरु असताना त्या ठिकाणी काही लोकांनी जमा होऊन गोंधळ घातला होता. यानंतर मुंबई पोलिसांनी या सर्वांना तेथून पिटाळून लावले. याच प्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास केला असता ही गर्दी रिपब्लिक टीव्हीचे रिपोर्टरने जमा केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे संबंधित रिपोर्टरला पोलिसांनी चौकशीसाठी समन्स पाठवलं आहे. या चौकशीनंतर मुंबई पोलीस पुढील कारवाई करणार आहे.
संबंधित बातम्या :
‘असत्यमेव जयते’, टीआरपी घोटाळ्यावरुन संजय राऊत यांचा रिपब्लिक टीव्हीवर हल्लाबोल
Mumbai Police Summons Republic TV in case of mob gathering out of Kangana Ranaut Home