Fake Message Alert | मुंबई पोलिसांच्या नावे फेक मेसेज व्हायरल, दोघं बाहेर पडल्यास अटक होण्याचे दावे खोटे

मुंबई पोलिसांकडून येणाऱ्या अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा आणि खोटे मेसेज आपले मित्र, नातेवाईक यांना फॉरवर्ड करु नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे

Fake Message Alert | मुंबई पोलिसांच्या नावे फेक मेसेज व्हायरल, दोघं बाहेर पडल्यास अटक होण्याचे दावे खोटे
Follow us
| Updated on: Jun 30, 2020 | 7:52 AM

मुंबई : मुंबईत नवे नियम लागू झाल्याचे खोटे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र कुठल्याही अफवा पसरवणाऱ्या फेक मेसेजवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी मुंबईकरांना केलं आहे. (Mumbai Police Warns not to believe Fake Message on Social Media about New Guidelines)

मुंबई पोलिसांच्या नावाने व्हायरल होणाऱ्या खोट्या मेसेजविषयी खुद्द मुंबई पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन माहिती दिली आहे. आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी दोघं जण बाहेर पडल्यास त्यांना अटक होण्याचे दावे खोटे असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

काय आहेत फेक मेसेजमधील खोटे दावे?

-“कोणतीही आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी केवळ एका व्यक्तीस बाहेर जाण्याची परवानगी, त्यानंतर बाहेर जाणार्‍यास अटक केली जाईल”

-“सोसायटी आणि जवळपासच्या परिसरात देखील फिरण्याची परवानगी नाही”

-“ज्येष्ठ नागरिक एकटेच राहिल्यास कृपया मुंबईला *पोलिस नंबर* वर कॉल करा”

-“जर एखादी व्यक्ती आवश्यक वस्तू खरेदीसाठी वाहन वापरताना आढळली, तर त्यांचे वाहन जप्त केले जाईल”

हेही वाचा : मुंबईत विनामास्क फिरल्यास 1 हजार रुपये दंड, पालिकेचा निर्णय

फेक मेसेजमध्ये धादांत खोटे दावे करण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून येणाऱ्या अधिकृत माहितीवर विश्वास ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी केले आहे. असे मेसेज आपले मित्र, नातेवाईक किंवा प्रियजनांना फॉरवर्ड न करण्यासही पोलिसांनी बजावले आहे.

दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबईत मास्क लावण्याचे बंधन कायम आहे. जर कोणी मुंबईत विनामास्क फिरताना आढळले, तर त्याच्याकडून 1 हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

कोणत्याही कारणासाठी रस्ते, कार्यालये, दुकाने, बाजार, दवाखाने, रुग्णालये यासारख्या सार्वजनिक ठिकाणी वावरताना प्रत्येक नागरिकाने मास्क लावणे बंधनकारक आहे. कार्यालयीन वापराच्या किंवा खासगी वाहनातून प्रवास करताना देखील प्रत्येकाने मास्क लावणे आवश्यकच आहे. सार्वजनिक वाहतूक साधनांमधून प्रवास करतानाही मास्क लावणे गरजेचे आहे. कोणत्याही बैठकीला किंवा एकत्र येताना तसेच कार्यस्थळी मास्क लावल्याशिवाय उपस्थित राहणे हे नियमांच्या विरुद्ध मानले जाईल.

संबंधित बातम्या :

Lockdown Extension | कन्फ्युजन नको, 31 जुलैपर्यंत वाढवलेल्या लॉकडाऊनबद्दल सर्व काही

लॉकडाऊन वाढवल्यानंतर टप्प्याटप्याने शिथीलता, राज्यात काय सुरु, काय बंद?

(Mumbai Police Warns not to believe Fake Message on Social Media about New Guidelines)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.