‘ती’ तर केवळ नौटंकी होती; भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा

Pravin Darekar on Uddhav Thackeray Statement About Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला नसल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या विधानावर भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. भाजप नेत्याने ठाकरेंवर निशाणा साधलाय. वाचा सविस्तर...

'ती' तर केवळ नौटंकी होती; भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 20, 2024 | 7:31 PM

देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करून दिल्ली जाण्याचा शब्द दिला होता. मात्र तो शब्द पाळला गेला नाही, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीत दावा केला. त्यांनी हा दावा करताच भाजपकडून जोरदार प्रत्युत्तत दिलं जात आहे. भाजपचे वरिष्ठ नेते प्रविण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत जोरदार हल्लाबोल केला आहे. मला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचंय, हे ठाकरेंनी म्हणणं ही केवळ त्यांची नौटंकी आहे, असं प्रविण दरेकर म्हणालेत.

ठाकरेंवर हल्लाबोल

एक गोष्ट अत्यंत स्पष्ट झाली की उद्धव ठाकरे नेहमी बोलायचे की मला एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचा आहे आणि त्यामुळे ते जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा उद्धव ठाकरे या शिवसेनेला मुख्यमंत्री त्यांनी केलं स्वतः मुख्यमंत्री झाले आणि आता नेमकं स्पष्ट झालंय हे त्यांच्या मनामध्ये आदित्य ठाकरे यांना सुद्धा मुख्यमंत्री करायचं होतं म्हणजे हा दुसरा शिवसैनिक घरात लावून आदित्य ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पोटामध्ये आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं होतं आहे हे महाराष्ट्रातील जनतेसमोर स्पष्ट झालं आहे, असं दरेकरांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्रिपदाच्या वक्तव्यवरून खोचक टोला

मला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचंय हे केवळ त्यांची नौटंकी आहे. त्यांना त्यांच्या घरातलाच मुख्यमंत्री व्हावा, असं वाटत होतं.ते स्वतः मुख्यमंत्री झाले. आदित्यला करण्याची इच्छा आहे. भविष्यात महिला म्हणून रश्मी ठाकरेंना आणतील. त्याच्यामुळे शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं आहे, हे बाळासाहेबाचं स्वप्न होतं. पण उद्धव ठाकरे जे करतायेत ते राजकारण स्वतःसाठी करतायेत. हे त्यांनी स्वतःच्या वक्तव्यातून मुलाखतून स्पष्ट केलेलं आहे, असं प्रविण दरेकर टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हणालेत.

बाळासाहेबांनी तर खऱ्या शिवसैनिकांना मुख्यमंत्री केलं ना… मनोहर जोशी, नारायण राणे यांना मुख्यमंत्री केलं. परंतु तुम्हाला दुसऱ्या शिवसैनिकाला काही द्यायची दानत नाहीये. तुम्हाला स्वतः व्हायचंय म्हणून बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार सोडला. या भाजपबरोबर लढून निवडून आलात. त्यांना सोडून जाऊन तिकडे मुख्यमंत्रीपदाच्या लाचारीसाठी खुर्चीसाठी इकडे गेला. आता तुम्ही स्पष्ट केलंय की आदित्यला मुख्यमंत्री करायला होत, असं म्हणत प्रविण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलं आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.