परतीच्या पावसाने दाणादाण, मुंबई, पुण्यासह राज्यभरात पावसाचा जोर

मुंबई, ठाणे, पुणे यासह इतर राज्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत (Mumbai Rain) आहे. तसेच पुणे शहरात आणि धरण परिसरात रात्रभरापासून पावसाची (Mumbai Rain) संततधार पाहायला मिळत आहेत.

परतीच्या पावसाने दाणादाण, मुंबई, पुण्यासह राज्यभरात पावसाचा जोर
Follow us
| Updated on: Sep 25, 2019 | 10:09 AM

मुंबई : मुंबई, ठाणे, पुणे यासह इतर राज्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत (Mumbai Rain) आहे. तसेच पुणे शहरात आणि धरण परिसरात रात्रभरापासून पावसाची (Mumbai Rain) संततधार पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत खडकवासला धरण क्षेत्रात 75 मिमी, पानशेत धरण क्षेत्रात 59 मिमी, वरसगाव धरण क्षेत्रात 57 मिमी आणि टेमघर धरण क्षेत्रात 52 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

येत्या 4 ते 5 तासात मुंबईसह, पालघर, विरार, मिरा-भाईंदर, ठाणे, कल्याण, भिवंडी परिसरात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पुणे : 

पुण्यातील अनेक घर, पार्किंग आणि रस्त्यावर पाणी साचल्याने पुणेकरांची तारांबळ उडाली आहे. गेल्या 12 तासात येरवडा, कोंढवा, खडी मशीन चौक, शांतीनगर, कोंढवा, अंगराज ढाबा, डेक्कन कॉलेज, कात्रज स्मशानभूमी, खडकीबाजार, रेल्वे पुल यासारख्या 24 ठिकाणी पाणी साचले आहे. तर पुण्यात जवळपास 13 ठिकाणी वाऱ्यामुळे झाड किंवा फांदी पडल्याच्या घटना (Pune Rain) पाहायला मिळत आहे.

कराड : 

रात्रभर कोसळणाऱ्या परतीच्या पावसाने कराड शहरासह ग्रामीण भागाला झोडपून काढलं आहे. कराड विटा रोडवर पावसाचे पाणी साचल्याने हा रोड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तसंच कराड शहरातील रस्त्यावर पाणीच पाणी पाहायला मिळत आहे.

सांगली :

सांगलीतील कडेगाव तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे हणमंतवडिये येथील नांदणी नदीवरील पूल प्रथमच पाण्याखाली गेला आहे. मुसळधार पावसामुळे गुहागर-विजापूर महामार्ग गेल्या दोन तासापासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तसेच खानापूर तालुक्यातील येरळा नदीला आणि ओढ्याला पूर आला आहे. भाळवणी – शिरगाव रोडवरील येरळा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.