सिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला
मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. डागडुजीसाठी गेल्या 15 ते 20 दिवस बंद असलेली मुंबई-पुण्यादरम्यानची रेल्वे सेवा आजपासून पुन्हा सुरु होत आहे.
मुंबई : मुंबई-पुणे (Mumbai-Pune train) दरम्यान प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. डागडुजीसाठी गेल्या 15 ते 20 दिवस बंद असलेली मुंबई-पुण्यादरम्यानची रेल्वे सेवा आजपासून पुन्हा सुरु होत आहे. या मार्गावर बंद ठेवण्यात आलेल्या 12 रेल्वेगाड्या पुन्हा धावणार आहेत. मुंबई-पुण्यादरम्यानच्या 5 गाड्या पुन्हा सुरु होणार आहेत. यामध्ये सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, इंटरसिटी एक्स्प्रेस, इंद्रायणी एक्स्प्रेस या मुंबई-पुणे प्रवाशांच्या हक्काच्या गाड्यांचा समावेश आहे.
कोणत्या गाड्या पुन्हा ट्रॅकवर?
17032 मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस सुरु होणार
12701 ECf 2 मुंबई-हैदराबाद अप- डाऊन सुरु होणार
17415 व 17416 कोल्हापूर-तिरुपती येता जाता सुरु होणार
11052 कोल्हापूर-सोलापूर आजपासून पुन्हा धावणार
11303 कोल्हापूर-मंगळुरू आजपासून पुन्हा सुरु होणार
19 ऑगस्टपासून सर्व गाड्या धावणार
दरम्यान या मार्गावरील आणखी काही गाड्या तूर्तास बंद आहेत, ज्या 19 ऑगस्टपासून पूर्ववत होतील. 19 ऑगस्टपासून बंद केलेल्या सर्व 17 गाड्या या मार्गावरुन धावणार आहेत.
कर्जत ते लोणावळादरम्यान दुरुस्तीच्या कारणास्तव हा महा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. 26 जुलैपासून 15 दिवस या मार्गावर एकही गाडी धावली नाही.
पुणे-मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. दररोज या मार्गावर शेकडो प्रवासी प्रवास करत असतात. त्यातच रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असते. यामध्ये नोकरदार वर्ग, विद्यार्थी आणि व्यापारी यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. त्यामुळे जवळपास 15-20 दिवस या मर्गावर रेल्वे धावली नसल्याने प्रवाशांना रस्ते मार्ग निवडावा लागला.
संबंधित बातम्या
डेक्कन, प्रगती, कोयना, सह्याद्रीसह 9 एक्स्प्रेस 15 दिवसांसाठी रद्द