Mumbai Rail Accident Local Timetable : मुंबईकरांसाठी मोठी घोषणा, दादरच्या अपघातानं लोकलच्या टाईम टेबलमध्ये मोठा बदल, चेक केलात का?

मध्य रेल्वेच्या माटुंगा रेल्वे स्थानकात शुक्रवारी रात्री गदग एक्स्प्रेस आणि चालुक्य एक्स्प्रेस या दोन गाड्यांची टक्कर झाली होती. मुंबईतील लोकल सेवेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज याचा फटका बसताना दिसत आहे.

Mumbai Rail Accident Local Timetable : मुंबईकरांसाठी मोठी घोषणा, दादरच्या अपघातानं लोकलच्या टाईम टेबलमध्ये मोठा बदल, चेक केलात का?
दादर स्टेशनजवळ दोन एक्सप्रेस एकमेकांवर आदळल्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 10:26 AM

मुंबई : मध्य रेल्वेच्या (central railway) माटुंगा रेल्वे स्थानकात (matunga station) शुक्रवारी रात्री गदग एक्स्प्रेस आणि चालुक्य एक्स्प्रेस या दोन गाड्यांची टक्कर झाली होती. मुंबईतील लोकल सेवेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज याचा फटका बसताना दिसत आहे. कारण, या अपघातामुळे मध्य रेल्वेची (railway) वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. मुंबईत लोकल आज वेळापत्रकानुसार चालणार आहे. काल रुळावरून तीन डबे घसरल्याने रेल्वे प्रवासावर त्याचा थेट परिणाम होत आहे. मुलूंड ते कुर्ला अंतर पार करण्यासाठी एक तास 25 मिनिटांचा कालावधी लागत असल्याने ट्रेन सुपर स्लो झाली आहे.  दादर-माटुंगा रेल्वे अपघातामुळे आज मुंबई उपनगरीय रेल्वेवरील मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण / कर्जत/ कसारा) लोकल रविवार वेळापत्रकानुसार चालवण्यात येणार. गरज असल्यास पर्यायी मार्गाचा अवलंब करा, अशा रेल्वे प्रशासनाच्या प्रवाश्यांना सुचना आहेत.

चाकरमान्यांची लटकंती

काल रात्री रेल्वेचा खोळंबा झाल्यानंतर चाकरमान्यांना प्रचंड गर्दीतून प्रवास करावा लागला. लांबच्या ठिकाणी राहणाऱ्या प्रवाशांनी एसटीचा धावा करत एसटीने घरी जाणे पसंत केले. त्यामुळे प्रवाशांना रात्री उशिरा घरी पोहोचावं लागलं. आधीच रात्री उशिरा घरी पोहोचलेल्या चाकरमान्यांनी नेहमीप्रमाणे लोकल सुरू होतील या आशेने सकाळीच स्टेशन गाठले. मात्र, सकाळीही लोकलचा खोळंबा झालेला पाहून चाकरमानी चांगलेच वैतागले होते. त्यामुळे त्यांना पुन्हा लोकलच्या प्रचंड गर्दीतून प्रवास करावा लागला.

अपघाता थेट परिणाम

काल रात्री हा अपघात झाल्यानंतर अजूनही रेल्वे सेवा पूर्ववत झालेली नाही. घसरलेल्या एक्सप्रेसचे दोन डबे रुळावर आणण्यात रेल्वे कर्मचाऱ्यांना यश आलं आहे. तर एक डब्बा रेल्वे रुळावर आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे त्याचा लोकल सेवेवर अजूनही परिणाम झालेला आहे. अजूनही लोकल सेवा उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना एक्सप्रेस (लांब पल्ल्याच्या गाड्या) मधून प्रवास करण्यास मध्य रेल्वेने मुभा दिली आहे. त्यामुळे प्रवासी आहे त्या पासवर किंवा तिकीटावर रेल्वेची पुढील सूचना येईपर्यंत एक्सप्रेसने प्रवास करू शकणार आहेत.

इतर बातम्या

Shani Gochar 2022 | शनी बदलणार आपली रास , या लोकांच्या आयुष्यात होणार उलथापालट

केंद्र सरकारचा मसुदा : गृहनिर्माण क्षेत्रात दूरसंचार पायाभूत सुविधा उभारणे अनिवार्य

अहमदनगरमध्ये साकारतेय राज्यातले सर्वात मोठे आयसीयू सेंटर; गुगल इंडिया, इस्कॉनचा पुढाकार

'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.