Mumbai Rain : अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या, वाहनावरं पांढऱ्या पावडरची चादर, मुंबईकरांची चिंता वाढली?

राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट आहे. तर,मुंबईसह (Mumbai) कोकणात अवकाळी पाऊस पडत आहे. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या इशाऱ्याप्रमाणं मुंबई, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसानं हजेरी लावली आहे.

Mumbai Rain : अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या, वाहनावरं पांढऱ्या पावडरची चादर, मुंबईकरांची चिंता वाढली?
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 3:01 PM

मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट आहे. तर,मुंबईसह (Mumbai) कोकणात अवकाळी पाऊस पडत आहे. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या इशाऱ्याप्रमाणं मुंबई, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसानं हजेरी लावली आहे. हवामानातील अमुलाग्र बदलाचा मुंबईकरांना फटका बसल्याचं दिसून आलं आहे. पार्किंगमधे धुतलेल्या गाड्यांवर पसरली पांढऱ्या रंगाची (White Powder layer) चादर पसरलेली पाहायला मिळाली. ढगाळ वातावरणाचा गाडी मालकांना फटका बसल्याचं यानिमित्तानं समोर आलं आहे. मुंबईत दुचाकी , चारचाकी आणि घरांवर पांढऱ्या पावडरचं साम्राज्य पाहायला मिळालं. यामुळं मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे. पांढऱ्या रंगाची पावडर नेमकी कशाची आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. येत्या 24 तासांत अरबी समुद्रात वादळी वारे वाहणार असं जरी सांगण्यात आलं असेल तरी मुंबईकरांना याची कोणतीच माहिती नसल्याने अनेकांनी याबाबत चिंता व्यक्त केलीय.

पावडर नेमकी कशाची

मुंबईतीलदुचाकी, चारचाकी आणि घरांवर पांढऱ्या पावडरचं साम्राज्य दिसून आलं. त्यामुळं मुंबईकरांच्या चिंतेत भर पडलीय. ही पावडर कसली, असा सर्वसामान्यांना प्रश्न पडलाय. हवामान विभागाकडून अद्याप स्पष्टपणे काही सांगण्यात आलं नाही. शिवसेना खासदार संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांनी सरकारकडे यासंबंधित चौकशी करून यावर खुलासा करण्याची मागणी केली आहे.

मुंबईत पावसाच्या हलक्या सरी

मुबईतील दादर , लोअर परेल, महालक्ष्मी आणि आसपासच्या भागात पावसाच्या हलक्या सरींमुळे हवामानात गारवा वाढल्याचं पाहायला मिळालं. मुंबई, ठाणे पालघरसह उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगावच्या काही भागाला पावसाने पुन्हा झोडपले आहे. मुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळालं यापूर्वी थंडी काही प्रमाणात कमी झाली होती. मात्र, आज कोसळलेल्या सरींमुळे हवेत पुनेहा गारवा निर्माण झालाय. यात्या काही दिवसात किमान तापमान 15 अंशापर्यंत पोहोचणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले तालुक्यातील अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. अवकाळी पावसामुळे आंबा, काजू उत्पादक शेतकरी चिंतेत असल्याचं दिसून आलं.

इतर बातम्या:

Balasaheb Thackeray Jayanti: मोदी, शहा, फडणवीसांवर बाळासाहेबांनी कुंचल्यातून फटकारे लगावले असते; राऊतांचा घणाघात

Balasaheb Thackeray | उभ्या महाराष्ट्रावर गारूड करणारा बाळासाहेब नावाचा झंझावात…!

Mumbai Rain due to unseasonal rain white powder layer found on car and vehicles

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.