Mumbai Rain Live Updates | मुंबईत पावसाला पुन्हा सुरुवात, लोअर परेल भागात पाऊस सुरु
भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईसह राज्यातील इतर भागात सकाळपासून पावसानं (Mumbai Rains) हजेरी लावली आहे. हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबई आणि कोकणमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईसह राज्यातील इतर भागात सकाळपासून पावसानं (Mumbai Rains) हजेरी लावली आहे. हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबई आणि कोकणमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काम मुंबईला जोरदार पावसाने झोडपलं. मुसळधार पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा तुंबलेली पाहायला मिळाली. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले होते. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले होते. (Mumbai Rain Live Updates Maharashtra Weather Forecast Update In Marathi 10 June 2021 Heavy Rain Alert By IMD Monsoon Updates)
LIVE NEWS & UPDATES
-
वाशिम जिल्ह्यातील जोरदार पाऊस सुरू, मानोरा तालुक्यातील नदीला पूर
वाशिम : वाशिम जिल्ह्यातील जोरदार पाऊस सुरू असून मानोरा तालुक्यातील नदीला पूर तर कारंजा मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागात पावसाचे पाणीच पाणी….कारंजा नगर परिषद ने पावसाळ्यापूर्वी नाल्याची साफ सफाई केली नसल्यामुळे मुख्य रस्त्यातवर सखल पाणी असल्याने अनेक वाहधारकाना कसरत करून वाहन चालविण्याची वेळ आली आहे…तर दुसरीकडे मालेगाव तालुक्यातील शिरपूर इथं मुख्य बाजारपेठ पाण्याचा तलाव झाला आहे…. -
मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर पावसाची हजेरी
महाराष्ट्र: मुंबई में भारी बारिश हुई। तस्वीरें 'वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे' की हैं। #mumbairain pic.twitter.com/Q1d2jgmyfe
— ANI_HindiNews (@AHindinews) June 10, 2021
-
-
मुंबईत पावसाला पुन्हा सुरुवात, लोअर परेल भागात पाऊस सुरु
मुंबईत भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली आहे. लोअर परेल भागात पाऊस सुरु आहे.
-
मुंबईच्या इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर पुन्हा कांक्रिट मिक्सर उलटला
– मुंबईच्या इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर पुन्हा कांक्रिट मिक्सर उलटला – २० टन कांक्रिट मिक्सरला काढताना अग्निशमक दल, वाहन चालकांची ऊडाली दमछाक… – २ तासांपासून हायवेवर ट्रॅफिक जॅम… – कालही याच ठिकाणी टेंपो पलटला होता… काल झालेल्या मुसळधार पावसानुंल् रस्त्यावर आॅईल पसरलंय, आणि त्यानेच गाडी स्लीप झाली असा दावा वाहन चालकाने केलाय
-
अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात
– अमरावती जिल्ह्यात वादळी पावसाला सुरुवात…
– खरिप हंगामासाठी अमरावतीत शेतकऱ्यांची लगबग…
– विजेच्या कळकळासह वादळी पाऊस
– दमदार पावसामुळे शेतकरी सुखावला
– विदर्भात 13 जून पर्यंत अतिवृष्टीचा इशारा
-
-
चंद्रपूर शहर-जिल्ह्यात पावसाची मुसळधार हजेरी, काही तासात देखील दमदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज
चंद्रपूर –
शहर-जिल्ह्यात पावसाची मुसळधार हजेरी
हवामान खात्याने दिला होता पावसाचा इशारा
सकाळपासून ऊन असलेले वातावरण अचानक बदलले
ढगांच्या गडगडाटासह पावसाची सुरुवात
पहिल्याच जोरदार पावसाने नागरिकांची केली त्रेधा
मिळेल त्या ठिकाणी आश्रय शोधत थांबले नागरिक
आगामी काही तासात देखील दमदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज
-
कालपासून पडणाऱ्या पावसाने नालासोपाऱ्यात दाणादाण उडवली
नालासोपारा –
कालपासून पडणाऱ्या पावसाने नालासोपाऱ्यात दाणादाण उडवली
नालासोपारा पूर्व ते पेल्हार फाटा या मुख्य रस्त्यावर फूट दोन फुटांचे खड्डे पडले आहेत
त्यात कालपासून पाऊस पडत असल्याने खड्ड्यात पाणी साचल्याने खड्डे आणि त्यात पाणी यामुळे वाहनधारकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे
-
वसई-विरारमध्ये रात्रीपासून पाऊस, शहरातील अनेक सकल भागातील रस्ते पाण्याखाली
वसई-विरारमध्ये रात्रीपासून सुरु असणाऱ्या पावसाने शहरातील अनेक सकल भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत
नालासोपारा पूर्व आचोळे रोड वर गुढगाभर पाणी साचले आहे. गुडगा भर पाण्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. वाहतूक कोंडी हि होत आहे
आभाळ पूर्ण भरलेले असून दुपार च्या नंतर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता
सध्या शहरात सकल भागातील रस्त्यात पाणी साचलेले आहे…पण पूरपरिस्थिती मात्र नाही
हवामान खात्याच्या अंदाज प्रमाणे पावसाचा जोर वाढला तर पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे
-
लिबाग, महाड, सुधागड, नागोठणे, पेण रोहा परिसरात पाऊस नाही
रायगड
अलिबाग, महाड, सुधागड, नागोठणे, पेण रोहा परिसरात पाऊस नाही.
तर खोपोली-खालापुर, कर्जत परिसरात हलकासा पाऊस आहे सकाळ पासुन.
शासनस्तरावर सज्जता असली तरी आज हवामान खात्याने ईशारा दिल्या प्रमाणे अद्याप रायगड जिल्ह्यात कुठेही वादळी वा-यासह जोरदार व्रुष्टी नाही.
-
पालघरमध्येसकाळपासून पावसाची हजेरी
पालघर –
पालघरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सकाळपासून पावसाची हजेरी कायम
पालघर, मनोर, केळवे, सफाळे सातपाटी भागात पावसाची हजेरी कायम
अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात
-
वसई-विरारमध्ये रात्रीपासून सलग रिमझिम पाऊस सुरु
वसई विरार मध्ये रात्री पासून सलग रिमझिम पाऊस सुरु
आभाळ पूर्ण भरलेले असून दुपार च्या नंतर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता
पूर्ण परिसरात विजांचा कडकडाट सुरु असून आभाळ पूर्णपणे काळेकुट्ट झालेले आहे..
सध्या शहरात सकल भागातील रस्त्यात काही प्रमाणात पाणी साचलेले आहे…पण पूरपरिस्थिती मात्र नाही
हवामान खात्याच्या अंदाज प्रमाणे पावसाचा जोर वाढला तर पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे
-
मुंबईत ढगाळ वातावरण
काल पडलेल्या पावसामुळे मुंबई शहरात अक्षरश: दैना उडाली होती रेल्वे वाहतूक रस्ते वाहतूक मोठा परिणाम झालेला होता अनेक भागात पाणी साचलेले होतं मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागला
आज दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र पाऊस थांबलेला दिसतोय पण ढगाळ वातावरण अजूनही कायम आहे
हवामान खात्यानं आज सुद्धा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे
-
पंढरपुरात दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून एक लाखाचा ऐवज, दागिने लुटले
सोलापूर –
ग्रामीण भागात चोरीचे सत्र सुरूच
पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथे दरोडा
दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून एक लाखाचा ऐवज दागिने लुटले
तर मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती दोन घरफोड्या
एक लाख 17 हजार यांची झाली चोरी
-
औरंगाबादेत मुसळधार, विज पडून 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू
औरंगाबादेत काल झालेल्या मुसळधार पावसात विज पडून एका 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली
औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातल्या बाभूळगाव तरटे या गावात ही घटना घडली आहे
ही 18 वर्षीय तरुणी मका पेरणीसाठी आपल्या कुटुंबासह शेतात गेली असता वीज पडून या तरुणीचा मृत्यू झाला
समृद्धी तरटे असं या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे.
-
रात्रभरापासून रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस, किनारपट्टी भागात पूर्णतः ढगाळ हवामान
रत्नागिरी- रात्रभरापासून जिल्ह्यात सरींवर पाऊस
सकाळपासून पावसाने घेतले विश्रांती
किनारपट्टी भागात पूर्णतः ढगाळ हवामान
आज दिवसभर मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज
मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी
-
फुलंब्री तालुक्यातील पानवडोद गावातील दोन तरुण दुचाकीसह पुरात गेले वाहून
औरंगाबाद –
फुलंब्री तालुक्यातील पानवडोद गावातील दोन तरुण दुचाकीसह पुरात गेले वाहून
फुलंब्री तालुक्यातील फुलमस्ता नदीच्या पुलावरील धक्कादायक घटना
तुफान आलेल्या पुरात नदीच्या पुलावरून दुचाकी घालणे पडले महागात
दुचाकीसह तरुण पुराच्या पाण्यात वाहून जातानाचा व्हिडीओ व्हायरल
सुदैवाने वाहून जाणाऱ्या दोन्ही तरुणांचे वाचले प्राण
-
औरंगाबाद जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जबरदस्त फटका
औरंगाबाद –
औरंगाबाद जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जबरदस्त फटका
अनेक ठिकाणी नदी नाल्यांना आला जोरदार पूर
नदीला आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणी वाहतूकही पडली बंद
वीज कोसळल्यामुळे 4 गाय म्हैस आणि 5 शेळ्यांचा झाला मृत्यू
फुलंब्री तालुक्यात वीज कोसळून एका 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू
मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेत मालमत्तेच जबरदस्त नुकसान
-
मुंबईत आज समुद्राला भरती, 4.26 उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता
मुंबईत आज 12 वाजून 17 मिनिटांनी समुद्राला भरती येणार असून 4.26 उंचीच्या लाटा उसळणार
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री जोरदार पाऊस
सिंधुदुर्ग-
जिल्ह्यात रात्री चांगला पाऊस पडला
मात्र आता पावसाने विश्रांती घेतली आहे
काही भागात ढगाळ वातावरण आहे तर काही भागात सुर्य दर्शन
Published On - Jun 10,2021 7:24 AM





