भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईसह राज्यातील इतर भागात सकाळपासून पावसानं (Mumbai Rains) हजेरी लावली आहे. हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबई आणि कोकणमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस बरसला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा तुंबलेली पाहायला मिळाली. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले होते. तर राज्यातील अनेक भागातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. (Mumbai Rain Live Updates Maharashtra Weather Forecast Update In Marathi 12 June 2021 Heavy Rain Alert By IMD Monsoon Updates)
वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी सोसाट्याच्या वार्यासह जोरदार पाऊस
जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस
वाऱ्यासह पाऊस कोसळत असल्यामुळे वीज खंडित होण्याची भीती
मुंबई : मुंब्र्यात पाच मजली इमारतीच्या कॉलमला तडे
श्री साई अपार्टमेंट ही इमारत पालिकेच्या वतीने खाली करण्यात आली
इमारतीच्या कॉलममध्ये गेले आहेत तडे
या इमारतीला तडे गेल्यामुळे इमारत धोकादायक म्हणून सर्व परिवारांना बाहेर काढण्यात पालिकेला यश आले.
याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग घटनास्थळी पोचले आणि त्यांनी कारवाई केली. सध्या या 36 परिवरांना एका शाळेत राहण्याची सोय करण्यात आली आहे.
ही इमारत आधी पासून महापालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत होती.
सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात जोरदार पाऊस
सकाळपासून होते ढगाळ वातावरण शहरातील अनेक रस्ते जलमय
उद्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट
उद्या मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर सातारा येथे आँरेज अलर्ट
रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्ट
ढग दक्षिणेकडे वळल्याने मुंबईचा रेड अलर्ट आँरेज अलर्टमध्ये बदला
मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाची माहिती
उद्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट
उद्या मुंबई , ठाणे , पालघर , सिंधुदुर्ग , पुणे ,कोल्हापूर सातारा आँरेज अलर्ट
रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्ट
अतिवृष्टीचे ढगांनी दक्षिणेकडे वळल्याने मुंबईचा रेड अलर्ट आँरेज अलर्ट मध्ये बदला
मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाची माहिती
ठाण्यात पडत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर आज ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी अचानक ठाणे शहराचा दौरा केला. या पाहणी दौऱ्यात अतिवृष्टीमुळे शहरात रस्त्यावर वाहून आलेल्या कचरा आणि पडलेल्या झाडांच्या फांद्या उचलणे, फुटपाथवरील अतिक्रमणे तात्काळ हटविण्यासोबतच पावसाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या इतर उपाययोजना करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी संबंधित विभागास दिले. सेच ज्या ठिकाणी चेंबर्सवर झाकणे नाहीत तेथे तात्काळ चेंबर्सची झाकणे बसविण्याच्या सूचनाही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या.
सध्या कोरोनाचा संसर्ग कमी असला तरी पावसाळ्यात साथीच्या रोगांचा पादुर्भाव होवू नये यासाठी वेळोवेळी साफसफाई, औषध फवारणी, इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या. आजच्या पाहणी दौ-यात महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व ठिकाणाच्या मेट्रोच्या कामांची पाहणी केली. मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी बॅरिकेटिंगमुळे पाणी साचण्याची शक्यता असल्याने पाणी अडणार नाही यासाठी बॅरिकेटिंगची उंची वाढविण्याच्या सूचना मेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान १३ मे पर्यंत अतिवृष्टीचा ईशारा देण्यात आला असून या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, विजेचे खांब तसेच रस्त्यावरील झाडांपासून दूर राहण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे .
नवी मुंबई :
खारघरमधील पंडवकडा परिसरात सकाळपासून पर्यटकांची गर्दी केल्यानंतर पोलिसांची कारवाई
पांडवकडा धबधबा बंद असल्याने गोल्फ कोर्समागील परिसरात झाली होती गर्दी
पर्यटकांसह गाडीवर सुद्धा करण्यात आली कारवाई
विंकेडची मज्जा घेण्यासाठी पर्यटक पडले होते घराबाहेर
मात्र खारघर पोलिसांकडून खारघर हिल, पांडवकडा परिसरात जाण्यास मज्जाव
आदेश झुगारून पर्यटक भर पावसात घराबाहेर
मुलांच्या हट्टामुळे घराबाहेर पडावे लागते
आणखीन किती दिवस घरामध्ये कोंडून राहायचं?
नागरिकांचा प्रशासनाला सवाल
जालना :
जालना भाजप कार्यकर्त्यांनी ऊर्जा मंत्री नितिन राऊत यांना दाखवले काळे झेंडे
राजेश टोपे आणि बबनराव लोणीकर यांच्या 132 के.व्ही. उपकेंद्र बाबतीतला वाद
राजेश टोपे यांच्यावरिल राग भाजप कार्यकर्त्यांनी ऊर्जा मंत्री नितिन राऊत यांच्या गाड्या अडवून व्यक्त केला
राजेश टोपे यांनी बबनराव लोणीकर यांच्या मतदारसंघातील उपकेंद्र त्यांच्या मतदारसंघात हलवन्यात आल्याचा होता वाद.
काळे झेंडे दाखवनारे सर्व कार्यकर्ते बबनराव लोणीकर गटाचे.
रत्नागिरी :
दापोली तालुक्यातील – मुरुड येथील समुद्रकिनाऱ्यावरील वादग्रस्त साई रिसॉर्टची केंद्रीय पथकाकडून पहाणी
राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री वादाच्या भोवऱ्यात
कोविड काळात कोट्यावधी रुपये खर्च करून अनिल परब यांनी समुद्रकिनारी बेकायदेशीर प्रॉपर्टी खरेदी करुन साई रिसॉर्ट बांधले असल्याचा माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आरोप
माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत पर्यावरण केंद्रीय पथकाने आज केली पहाणी..
केंद्रीय पथकाच्या अहवालावर साई रिसॉर्टचे भवितव्य ठरणार
जळगाव : भुसावळ तालुक्यातील हातनूर धरणाचे 8 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. विदर्भ, मध्यप्रदेशमध्ये पाऊस झाल्याने हातनूर धरणाचे दरवाजे उघडले. तापी नदी काठच्या गावांना हातनूर प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा, हातनुर प्रशासनाचे अभियंता महाजन यांनी दिली माहिती
नवी मुंबईतील एतिहास साक्षीदार असलेली वास्तू ढासळली
बेलापूर किल्ल्याचा बुरुज ढासळला
जोरदार पावसाने नवी मुंबई मनपा समोरील किल्ल्याचा बुरुज ढासळला
एतीहासिक पेशवेकालीन बेलापुर किल्ल्याचा होता टेहळणी बुरूज
हा किल्ला चिमाजी आप्पा यांनी बांधला होता
या किल्ल्यावरून शत्रूवर नजर ठेवली जात होती
नवी मुंबईतील एतिहास साक्षीदार असलेली वास्तू ढासळली
– ‘हवामान विभागाने अतिवृष्टीच्या इशारा दिल्याने पेरणी करु नका’
– अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं बियाणं वाया जाऊ शकतं
– दुबार पेरणीचं संकट टाळायचं असेल तर पेरणी करु नका
– कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन
– नागपूरसह संपूर्ण विदर्भात १२ जून पर्यॅत अतिवृष्टीचा इशारा
– पाऊस पडल्याने शेतकरी खरीप पेरणीच्या तयारीत
नवी मुंबई
नवी मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग
खारघर मधील पंडवकडा परिसरात सकाळपासून पर्यटकांची गर्दी
पांडवकडा धबधबा बंद असल्याने गोल्फ कोर्स मागील परिसरात छोट्या मोठ्या धबधब्यावर मोठी गर्दी
विंकेडची मज्जा घेण्यासाठी नागरिक आपल्या मुलांसह घराबाहेर
मात्र खारघर पोलिसांकडून खारघर हिल, पांडवकडा परिसरात जाण्यास मज्जाव
आदेश झुगारून पर्यटक भर पावसात घराबाहेर
मुलांच्या हट्टामुळे घराबाहेर पडावे लागते
आणखीन किती दिवस घरामध्ये कोंडून राहायचं
नागरिकांचा प्रसानाला सवाल
मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाचा जोर वाढलाय
सुरक्षेच्या दृष्टीने जूहू चौपाटीवर जाण्यास मज्जाव
ढगांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात
समुद्रात लाटा उसळण्यास सुरुवात झालीय
जूहू चौपाटीवरुन आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी
पुढचे तीन तास धोक्याचे !
मुंबई , रायगड , ठाणे , पालघर जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा
३० ते ४० किलोमीटर वादळी वार्यासह मध्यम ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
मोठ्या झाडाच्या खाली उभे राहू नका – हवामान विभाग
बाहेर पडताना स्वताची काळजी घ्या – हवामान विभाग
ठाणे -ठाणे महापौर नरेश म्हस्के यांच्या शासकीय निवासस्थानातील वडाचे 2 झाड कोसळले,
सतत होत असलेल्या पावसामुळे हे वडाचे झाड बाजूला असलेल्या एका दुसऱ्या वडाच्या झाडावर कोसळल्याने दोन्ही झाडे धोकादायक परिस्थितीत,
सुदैवाने झाड च्या बाजूला कोसळले त्या बाजूला बंगला नव्हता,
बाजूलाच असलेल्या एका छोट्या हॉटेलवर झाड कोसळले असून अजूनही धोकादायक परिस्थितीत आहे,
ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि ठाणे अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले असून स्वतः महापौर नरेश म्हस्के देखील पाहणी करण्यास आले आहेत,
मुंबई अहमदाबाद महामार्गावर मालजीपाडा परिसरात साचले पाणी
मुंबई आणि गुजरात च्या दिशेने जाणारी वाहतूक संथगतीने सुरू
नवी मुंबईत पावसाची धुवाधार बरसात
झाड़ पडल्याने गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
रात्रीच्या सुमारास कोपरखैरणे येथील घटना
मोठी वृक्ष कोसळल्याने 4 ते 5 गाड्यांचे मोठे नुकसान
रात्री बाराच्या सुमारास घडली घटना
घटनास्थळी त्वरीत अग्निशमन दल हजर
अतिवृष्टीच्या हुलकावणीने रत्नागिरी जिल्ह्याला दिलासा मिळालाय
हवामान खात्यानं रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी केला होता
मात्र पहाटेपासून पावसानं पुर्णतः विश्रांती घेतलीय
रात्री जोरदार सरींवर सरींनी कोसळणाऱ्या पावसानं आज पहाटेपासून पुन्हा एकदा हुलकावणी दिलीय
काल देखील सकाळनंतर पावसानं विश्रांती घेतली होती
मात्र दुपारच्या सत्रात पावसाची दमदार बॅटिंग पहायला मिळाली
मात्र आज देखिल पहाटेपासून पावसानं दडी मारलीय
त्यामुळे २०० मिलिमिटर पेक्षा अधिक पाऊस काही तासात पडण्याची हवामान खात्याची भविष्य़वाणी खरी झाली नाही
पण अतिवृष्ट्रीच्या हुलकावणीने रत्नागिरीकरांना मात्र दिलासा मिळालाय
ठोसेघरचा धबधबा मोहक दृश्य
महाराष्ट्राने पर्यटन विभागाने व्हिडोओ केला शेअर
सातारा जिल्हाततील ठओसेघरचा व्हिडोओ केला शेअर
भारतातील सर्वात उंच धबधब्यापेकी एक आहे ठोसेघरचा धबधबा
महाराष्ट्रातील पर्यंटन स्थळापैकी एक आहे ठोसेघरचा धबधबा
मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरवात झालीये
– सायन पुलाखाली पाणी साचलंय
– सायनहून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर साचलं पाणी
– मुंबईच्या सायन, दादर, कुर्ला, चुनाभट्टी, धारावी परीसरात जोरदार पाऊस सुरु
– येत्या ४ दिवसात मुंबईत जोरदार पावसाचा हवामान खात्याचा इशारा
नवी मुंबई, पनवेलमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात
पावसाचा लपंडाव सुरूच
कधी रिमझिम तर कधी जोरदार पाऊस
पावसासह सर्वत्र धूकेही पसरले
वसई : वसई विरार नालासोपाऱ्यात रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने परिसर जलमय झाला आहे
शहरातील सकल भागातील रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत.
नालासोपारा पूर्व आचोळे रोड, सेंट्रल पार्क, धानीव बाग, पश्चिमेकडील गास, टाकी पाडा, वसईतील गोलानी नाका, एव्हरशाईन , वसंत नगरी सर्कल, समता नगर, जे बी नगर, विरार पश्चिम विवा कॉलेज रोड वर गुढगाभर पाणी साचले आहे.
पहाटे पासून रिमझिम पाऊस सुरु आहे
मात्र आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहिला तर शहरात हाहाकार माजण्याची शक्यता आहे
नालासोपारा पूर्व स्टेशन परिसरातील सकाळी साडे सात वाजताचे दृश्य आहेत.
शहापूर
शहापूरमध्ये अधून मधून पाऊसाच्या रिमझिम सरी मात्र ढगांचे गरगराट जोरदार चालू
पूर्ण तालुक्याचा वीज पुरव्हठा सकाळी 7 वाजल्या पासून बंद केला गेला आहे
रत्नागिरी – पहाटेपासून पावसाची पूर्णतः विश्रांती
रात्रीपासून अनेक ठिकाणी सरींवर पाऊस
सकाळपासून पूर्णतः ढगाळ वातावरण
आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा
सलग दोन ते तीन दिवस पावसाने मोठ्या प्रमाणात ठाणे शहरात देखील हजेरी लावली आहे
तसेच ते येत्या तीन ते चार दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे
सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे
तर काही ठिकाणी सखल भागात पाणी साचायला देखील सुरवात झाली आहे
मुंबईला जाण्यासाठी ज्या पद्धतीने वाहतूक रस्त्यावरती दिसून येत होती मात्र आज मध्ये त्याप्रमाणे मात्र आज तुरळक प्रमाणात गाड्या रस्त्यावरती धावताना दिसत आहे
तसेच हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे नागरिकांनी घरीच बसून राहावे असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे
अतिवृष्टीचा धोका अखेर टळला
नवी मुंबई, पनवेलमध्ये सकाळपासून रिमझिम पावसाच्या सरी
तर रायगड मध्येही तुरळक ते मध्यम पाऊस
रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात 34 मिमी इतका पाऊस
तर पनवेल मध्ये 29.30 मिमी इतका पाऊस आणि नवी मुंबईत सरासरी 45 मिमी इतका पाऊस
रायगड मध्ये 200 मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता
अति पर्जन्यवृष्टीमुळे 10 ते 11 जून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे होते आदेश
परंतु दोन दिवसात अतिवृष्टी झाली नाही धोका टळला
रायगड जिल्हा कोरोणा बाबत अनलॉक च्या चौथ्या स्थानात असल्याने आज आणि उद्या विकेंड लॉकडाऊन
तिसर्या गटात येण्यासाठी नागरिकांचे सहकार्य गरजेचे- निधी चौधरी
मुंबईत मान्सूनचे आगमन झाले असून गेल्या 1 तासापासून मुंबई आणि मुंबईतील आसपासच्या भागामध्ये जोरदार पाऊस होत आहे
अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलं आहे
त्यामुळे सबवेबाहेर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे