भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईसह राज्यातील इतर भागात सकाळपासून पावसानं (Mumbai Rains) हजेरी लावली आहे. हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबई आणि कोकणमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस बरसला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा तुंबलेली पाहायला मिळाली. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले होते. तर राज्यातील अनेक भागातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. (Mumbai Rain Live Updates Maharashtra Weather Forecast Update In Marathi 13 June 2021 Heavy Rain Alert By IMD Monsoon Updates)
वाशिम : वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मालेगाव शहरासह शिरपूर परिसरात जोरदार पाऊस
या ठिकाणी खरिपातील पेरणीला येणार वेग
शेतकऱ्यांमध्ये आनंदचं वातावरण
रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची तुफान बॅटिंग
शहरात जोरदार पाऊस, शहराच्या अनेक भागात तुंबापुरी
शहरातल्या मच्छी मार्केट भागात गुडघाभर पाणी
नगरपरिषदेने नालेसफाई न केल्याने अनेक भागात पाणी तुंबले
वाशिम : वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मालेगाव शहरासह शिरपूर परिसरात जोरदार पाऊस, या ठिकाणी खरिपातील पेरणीला येणार वेग, शेतकऱ्यांमध्ये आनंदच वातावरण
चंद्रपूर:विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने शहराला झोडपले,चंद्रपूर जिल्हाभर पावसाची हजेरी, आज सकाळपासून आकाशात होती ढगांची दाटी, दुपारनंतर जोरदार पावसाने नागरिकांची उडवली त्रेधा, मॉन्सून आगमनानंतर जिल्ह्यात सतत पावसाची उपस्थिती आहे.
मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा , पुढच्या तीन तासात जोरदार पावसाचा इशारा
नांदेड , हिंगोली , परभणी , जालना , बीड जिल्ह्यात पुढच्या तीन तासात जोरदार पाऊस
30 – 40 प्रति किलोमीटर वादळी वार्यासह पावसाची इशारा
हवामान खात्यानं दिला इशारा
वाशिम जिल्ह्यातील कामरगाव परिसरात जोरदार पाऊस सुरू झाला आहे.
नागपूर –
नागपुरात मान्सूनचे दमदार आगमन झाले असून 3 दिवसात 96 मी मी पावसाची नोंद
पावसाचा जोर काहीसा ओसरला
ऑरेंज अलर्ट ला येलो अलर्ट मध्ये परावर्तित करण्यात आलं
पावसाचं वातवरण निर्माण असून काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे
मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात
दादर, वडाळा, सायन, माटुंगा भागात जोरदार पाऊस
पश्चिम उपनगरात ढगाळ वातावरण
तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस
आज पावसाने विश्रांती घेतली म्हणून रेल्वेसेवा सामान्य
सेंट्रल वेस्टन हर्बल लाईन तिन्ही मार्गावर सामान्य प्रमाणे लोकल धावत आहे
रत्नागिरी- सकाळपासून पावसाची विश्रांती
रात्रभर रत्नागिरीमध्ये होत्या पावसाच्या कोसळला
हवामान खात्यानं रत्नागिरी जिल्ह्याला दिलाय रेड अलर्ट
आज दिवसभर मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज
किनारपट्टी भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
मुंबईकरांच्या पाणीसाठ्यात वाढ
तलावता जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा
पुढील दीड महिना मुंबईकरांची चिंता मिटली
मोडकसागर- 43,393
तानसा 18,827
मध्य वैतरणा 26, 676
भातसा 81,684
विहार 14,176
तुळशी 4,217
सध्या स्थितीमध्ये तलावांध्ये एकून एक लाख 85 हजार 971 पाणीसाठा शिल्लक आहे
संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट
आज मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आँरेज अलर्ट
रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्ट
अतिवृष्टीचे ढगांनी दक्षिणेकडे वळल्याने मुंबईचा रेड अलर्ट आँरेज अलर्ट मध्ये बदलला
मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाची माहिती